राज्य सरकार मार्फत संचलित होणाऱ्या विद्यापीठांचे प्रमुखपद म्हणजेच कुलपती पद राज्यपाल ऐवजी मुख्यमंत्र्यांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे.
पंजाब विधानसभेत विधेयक मंजूर करण्यात आले.
राज्य सरकारने काही विद्यापीठांच्या कुलगुरू पदासाठी सुचविलेल्या नावावरून सरकार व राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यात मतभेद झाले होते.
या पार्श्वभूमीवर पंजाब सरकार तर्फे पंजाब विद्यापीठ कायदा दुरुस्ती विधेयक 2023 विधेयक विधानसभेत सादर करण्यात आले.
यावर अल्प प्रमाणात चर्चा होऊन ते मंजूर करण्यात आले आहे.