कसोटी कारकीर्दीत विराट कोहलीने वेस्ट इंडिजच्या संघाविरुद्ध 29 वे शतक झळकावले. याबाबतीत विराटने डॉन ब्रॅडमन(29 शतके) यांच्याशी बरोबरी केली.
कसोटीत सर्वाधिक 51 शतकांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे
500 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या विराटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे 76 वे शतक ठरले.
विराटने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 46 शतके ठोकली आहेत तर आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी मध्ये 1 शतक झळकावले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शंभर शतकांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली(76) असून तिसऱ्या क्रमांकावर रिकी पॉंटिंग (71) शतके आहे.
500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक करणारा विराट कोहली हा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
500 वा आंतरराष्ट्रीय सामना विराट कोहली हा वेस्टइंडीजच्या संघाविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेन या ठिकाणी खेळला आहे.
वेस्टइंडीजच्या संघाविरुद्ध त्याने विक्रमी 76 वे आंतराष्ट्रीय शतक झळकावले.