भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि सुरीनामचे राष्ट्रपती चंद्रिका प्रसाद संतोखी, 5 जून 2023 रोजी सुरीनाममध्ये भारतीयांचं आगमन झाल्याच्या घटनेला दीडशे वर्षं पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं पारमारिबो येथे झालेल्या सांस्कृतिक महोत्सवाचे साक्षीदार ठरले.
1873 मध्ये 5 जून रोजी भारतीयांचा पहिला गट लल्ला रुख या जहाजावरून सुरिनामच्या किनाऱ्यावर दाखल झाला आणि या देशाच्या इतिहासातील एका नवीन अध्यायाला आरंभ झाला.
भारतीय प्रदेशातून सुरीनाममध्ये गेलेल्या मूळ भारतीय स्थलांतरित व्यक्तींच्या चौथ्या पिढीपासून ते सहाव्या पिढीपर्यंतच्या व्यक्तींना प्रवासी भारतीय (ओसीआय) कार्डसाठी पात्रता निकष वाढवण्याचा भारत सरकारचा निर्णय राष्ट्रपतींनी जाहीर केला. सुरीनामच्या भारताशी असलेल्या दीडशे वर्षं जुन्या नातेसंबंधात ओसीआय कार्ड हे महत्वाचा दुवा म्हणून पहिले जाऊ शकते.
राष्ट्रपती भवनात झालेल्या एका समारंभात सुरीनामच्या राष्ट्रपतींनी ‘ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द यलो स्टार’ हा सुरीनामचा सर्वोच्च नागरी सन्मान राष्ट्रपती मुर्मू यांना प्रदान केला.