देव शहा हा मूळ भारतीय असणारा 14 वर्षीय विद्यार्थी अमेरिकेतील ‘स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी’ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अजिंक्य ठरला आहे.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अतिशय कठीण शब्दांचे योग्य स्पेलिंग सांगणे अपेक्षित असते.
फ्लोरीडा येथील शाळेत इयत्ता आठवीत शिकणाऱ्या देवने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सॅॅमोफाईलचे(psammophile)
स्पेलिंग अचूक सांगून हे अजिंक्यपद पटकावले. यासाठी त्याला पन्नास हजार अमेरिकी डॉलरचे बक्षीस देण्यात आले.
ही स्पर्धा मेरीलँड येथे भरवण्यात आली होती .
स्पेलिंग बी ही स्पर्धा माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 1925 या वर्षापासून घेण्यात येते.
या स्पर्धेचे 2023 हे एकूण 95 वे वर्ष होते.
जगभरातील 1.1 कोटी विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. यातील 11 विद्यार्थी अंतिम फेरीत पोहोचले होते.
या स्पर्धेत 14 वर्षाहून अधिक वयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. देव याने या स्पर्धेत 2019 व 2021 मध्ये भाग घेतला होता. वयाच्या अटीमुळे ही त्याची अखेरची संधी होती.
या स्पर्धेत शार्लेट वॉल्स ही विद्यार्थ्यांनी उपविजेती ठरली. आतापर्यंत वीस (20)भारतीयांनी ही स्पर्धा जिंकली आहे.