Current Affairs
23 सप्टेंबर रोजी सांकेतिक भाषा दिवस साजरा करण्यात येणार | Sign Language Day will be celebrated on September 2323
- 23/09/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागा (DEPwD) अंतर्गत,भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र (ISLRTC) 23 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राच्या भीम सभागृहामध्ये येथे सांकेतिक भाषा दिवस 2023 साजरा करणार आहे.
“असे जग, ज्या ठिकाणी कर्णबधीर सर्वत्र कोठेही साइन-इन करू शकतात!” ही यंदाच्या सांकेतिक भाषा दिवस 2023 ची संकल्पना आहे.
भारतीय सांकेतिक भाषेत प्राथमिक संवाद कौशल्ये, यावरील ऑनलाइन स्व-प्रशिक्षण अभ्यासक्रमाची सुरुवात.
आयएसएलआरटीसी, सोसायटी जनरल आणि व्ही-शेष यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या आर्थिक परिभाषांच्या भारतीय सांकेतिक भाषेमधील 267 चिन्हांचे प्रकाशन (लाँचिंग).
आर्थिक आणि बँकिंग क्षेत्रात काम करणार्या कर्णबधिर आणि ऐकू शकणाऱ्या लोकांमधील संवाद सुलभ करण्यासाठी, आर्थिक परिभाषांची चिन्ह विकसित करण्यात आली आहेत. या प्रकल्पामुळे कर्णबधीर युवकांसाठी रोजगाराच्या संधी वाढायला मदत होईल.
संकेतस्थळावर भारतीय सांकेतिक भाषेतील (आयएसएल) सुमारे 10,000 संकेतांचा शब्दकोश प्रकाशित केला जाईल, श्रवणदोष असणाऱ्या व्यक्तींच्या विशेष शाळांमध्ये आयएसएल अभ्यासक्रमाची सुरुवात.
श्रवण अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावरील सहावी भारतीय सांकेतिक भाषा स्पर्धा, 2023 आयोजित केली होती.
या स्पर्धेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी आपली सृजनशीलता आणि ज्ञानाचे प्रदर्शन केले आहे. सहाव्या आयएसएल स्पर्धेतील सर्व विजेत्यांना सांकेतिक भाषा दिन 2023 कार्यक्रमादरम्यान पुरस्कार आणि प्रमाणपत्रांचे वितरण केले जाईल.