Current Affairs
3 जून : जागतिक सायकल दिन (3 June : World Cycle Day)
- 03/06/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
विश्व सायकल दिवस हा एक जागतिक दिवस आहे. दुचाकी सायकल ही वापरण्यास आणि विकत घेण्यास सोपी आणि स्वस्त असा वाहन पर्याय आहे. त्यामुळे सर्वाँना सामावून घेणारे जागतिक स्तरावरील वाहन म्हणून 3 जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो
महत्व:
समाजातील कोणत्याही स्तरातील व्यक्तींना सायकल चालविण्याचा आनंद घेता यावा यासाठी या दिवशी विशेष सायकल यात्रा आयोजित केल्या जातात.
सायकल हे वाहन सहिष्णुता, मानवता यांचे प्रतीक आहे असा संदेश यातून पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो.
आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी सायकल चालविणे उपयुक्त आहे असा संदेश यानिमित्ताने दिला जातो. यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात.
इतिहास:
सायकल दिन साजरा करण्याचा प्रस्ताव अमेरिकेतील माँटगोमेरी कॉलेजचे प्रोफेसर लेझेक सिबिल्स्की यांनी याचिकेच्या स्वरूपात दिला होता.
1990 च्या काळात सायकल चालवण्यासाठी अनेकांनी प्रोत्साहन दिले परंतु, हळूहळू या दिनाचे महत्त्व कमी होत गेले. त्यानंतर युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने या दिनाचे महत्त्व जपण्यासाठी 3 जून 2018 रोजी हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून घोषित केला गेला त्यादिवसापासून हा दिवस दरवर्षी जगभरात साजरा केला जातो.
सायकल चालवण्याचे फायदे:
सायकल चालवल्याने वातावरणात प्रदूषण होत नाही.
किमान अर्धा तास सायकल चालवल्याने शरीर तंदुरुस्त राहते तसेच, वजन कमी करता येते.
सायकल चालवल्याने रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहून पचनक्रिया सुधारते.
दररोज सायकलिंग केल्याने मेंदू १५ ते २० टक्के सक्रिय राहतो.
तसेच, हृदय आणि फुफ्फुस मजबूत राहतात आणि अनेक आजार आपल्यापासून दूर राहतात.