पत्रकारिता स्वातंत्र्याचं महत्त्व आणि समाजातली प्रसारमाध्यमांची भूमिका याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ३ मे रोजी जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.
जागतिक स्तरावर माध्यमांच्या भूमिकेबद्दल साक्षरता आणण्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जतो.जगभरात 3 मे 2023 रोजी 30 वा जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे.
पार्श्वभूमी:
1991 मध्ये प्रथमच आफ्रिकन पत्रकारांनी वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी मोहीम सुरू केली. यावेळी 3 मे रोजी वृत्तपत् स्वातच्या तत्त्वांबद्दल एक विधान जारी केले गेले, त्याला डिक्लेरेशन ऑफ विंडहोक या नावाने ओळखले जाते. यानंतर दोन वर्षांनी 1993 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने प्रथमच ‘जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन’ साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून ३ मे हा ‘जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन’ म्हणून पाळला केला जातो.
भारतात दरवर्षी 16 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.