Current Affairs
50 रुपयांचे टायगर कॉइन
- 02/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
देशात ‘प्रोजेक्ट टायगर‘ च्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 50 रुपयांचेटायगर कॉइन काढण्याचा निर्णय घेतला आहे.
हे नाणे चतुर्थांश धातूचे आणि 44 मिमीचे गोलाकार असेल.
चतुर्थांश मिश्र धातूमध्ये चांदीचा वाटा 50%, तांबे 40%, निकेल 5 %आणि जस्त 5% असेल.
दातेरी कडांची संख्या 200 असेल .
नाण्याचे वजन 35 ग्रॅम असेल .
त्यावर ‘सत्यमेव जयते ‘कोरलेले असेल.
त्याच्या डाव्या परिघावर देवनागरीत ‘भारत‘ हा शब्द असेल आणि उजव्या परिघावर इंग्रजीत ‘इंडिया‘ हा शब्दअसेल.
सिंह स्तंभाखाली रुपयाचे चिन्ह आणि आंतरराष्ट्रीय अंकांमध्ये मूल्य 50 असेल, असे या बाबीतची अधिसूचनाप्रसिद्ध करताना केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने स्पष्ट केले.
नाण्याच्या उलट बाजूच्या मध्यभागी वाघाचे चित्र असेल.
चित्रासमोर नाण्याच्या उजव्या बाजूला ‘1973- 2023’ ही कालदर्शक सनावळी कोरलेली असेल.
नाण्यावर हिंदीमध्ये 50 वर्षांचे ‘प्रोजेक्ट टायगर ‘आणि इंग्रजीमध्ये 50 वर्षांचे ‘प्रोजेक्ट टायगर‘ असे लिहिलेलेअसेल .
1 एप्रिल 1973 रोजी केंद्र सरकार आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात ‘प्रोजेक्ट टायगर‘ सुरूकेला होता.
सध्या देशात 53 व्याघ्र प्रकल्प असून वाघांची संख्या सुमारे 2500 आहे .
उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाला देशातील पहिले व्याघ्र प्रकल्प होण्याचा मान मिळाला होता.
महाराष्ट्रात एकूण पाच व्याघ्र प्रकल्प असून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात राज्यातीलसर्वाधिक 203 वाघांचे वास्तव्य आहे.