Current Affairs
8 जून: जागतिक महासागर दिन (8 june world oceans day)
- 08/06/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
जागतिक महासागर दिन जगभर 8 जून रोजी पाळला जातो.
पार्श्वभूमी:-
2008 या सालापासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस अधिकृतरीत्या पाळण्याचे ठरविले. त्यापूर्वी 1982 या वर्षापासून कॅनडामध्ये तो साजरा होत असे.
कॅनडास्थित आंतरराष्ट्रीय संस्था महासागरांच्या संरक्षणासाठी कार्यरत आहे, या संस्थेच्या पुढाकाराने सर्वप्रथम या दिवसाची सुरुवात झाली. वर्ल्ड ओशन नेटवर्क सारख्या विविध संस्था,मत्सयालये, प्राणिशास्त्र विषयात काम करीत असलेल्या संस्था; अशा महत्त्वाच्या संस्था यासाठी एकत्रितपणे योगदान देतात.
हेतू:-
जगभरातील महासागरांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस वार्षिक स्वरूपात साजरा केला जातो. महासागर हे संरक्षिले जावेत आणि नैसर्गिकदृष्ट्या असलेले त्यांचे महत्व जपले जावे असा यामागे हेतू आहे.
प्राणवायू, वातावरणाचे नियमन,अन्नाचा पुरवठा, औषधे आणि अन्य बाबींसाठी महासागरांचे स्थान महत्त्वाचे आहे. या निमित्ताने व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर महासागर रक्षणाची संधी घेतली जाते.
जागतिक महासागर दिवस 2023 ची थीम:-
जागतिक महासागर दिवस 2023 ची थीम आहे “प्लॅनेट ओशन: टाइड्स बदलत आहेत”. या थीमचा उद्देश महासागराचे महत्त्व आणि त्याचे संरक्षण करण्याची गरज याबद्दल जागरुकता वाढवणे आहे.
2023 ची थीम प्रत्येकासाठी एकल-वापर प्लॅस्टिकचा वापर कमी करून, शाश्वत सी-फूडला समर्थन देऊन आणि महासागराचे संरक्षण करणार्या धोरणांचे समर्थन करून बदल घडवून आणण्यासाठी प्रत्येकासाठी कृती करण्याचे आवाहन आहे.