जागतिक साक्षरता दिन हा प्रतिवर्षी ८ सप्टेंबर या तारखेला साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय सहकार्यातून शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक विकास व त्यातून शांतता व सुव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या युनेस्कोने शिक्षणाचे, साक्षरतेचे महत्त्व लक्षात घेऊन ८ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक साक्षरता दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरविले.
युनेस्कोत हा निर्णय 7 नोव्हेंबर इ.स. 1965 रोजी झाला आणि 8 सप्टेंबर इ.स. 1966 पासून जगभरात ‘जागतिक साक्षरता दिन’ साजरा केला जाऊ लागला.
थीम :
‘संक्रमणात असलेल्या जगासाठी साक्षरतेला प्रोत्साहन देणे: शाश्वत आणि शांततापूर्ण समाजांसाठी पाया तयार करणे’