information
वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील आधुनिक पद्धतीतील संशोधनासाठी महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प पेंच आणि मध्य प्रदेशातील भोपाळ येथील भारतीय वन व्यवस्थापन संस्था यांच्यात करार करण्यात आला. वन्यजीव संवर्धनासाठी असणारा प्राधान्यक्रम आणि रचना संवर्धन उपायांची यशस्वीपणे माहिती देण्यासाठी वन्यजीव प्रजातींचे जीवशास्त्र समजून घेणे, जैवविविधतेच्या नुकसानाच्या परिणामाचे मूल्यांकन करणे आणि प्रजातींच्या समुदायांमधील बदलांची निरीक्षण करणे आवश्यक आहे. […]
केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन, या वर्षी 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत उझबेकिस्तानात ताश्कंद इथे होणाऱ्या ‘टी आय एफ एफ इ एस टी’ म्हणजेच ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी जाणाऱ्या भारताच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करणार आहेत. उद्दिष्ट:- चित्रपट विषयक भागीदाऱ्या निर्माण करणे, कार्यक्रमांची देवाणघेवाण करणे, चित्रपट निर्मितीला खतपाणी घालणे, विविध संस्कृतीमधील […]
दक्षिण कमांडच्या सर्व तोफखाना एककांनी आणि विभागाने 28 सप्टेंबर 2023 रोजी 197 वा गनर्स डे साजरा केला. 28 सप्टेंबर या तारखेला रेजिमेंट ऑफ आर्टिलरीच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे. 5 (बॉम्बे) माउंटन बॅटरी 28 सप्टेंबर 1827 रोजी स्थापन केली गेली. स्थापनेपासून ती अखंडित सेवेमध्ये असल्यामुळे , तिचा स्थापना दिन दरवर्षी गनर्स डे म्हणून साजरा […]
स्वामीनाथन यांचे चेन्नई येथील त्यांच्या घरी 28 सप्टेंबर 2023 रोजी वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले (जन्म : कुंभकोणम, 7 ऑगस्ट, 1925 , मृत्यू : 28सप्टेंबर, 2023) ते भारतातील कृषी शास्त्रज्ञ होते. भारतात हरितक्रांती घडवून आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी कृषि क्षेत्रातील संशोधनासाठी ‘एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन’ची स्थापना केलेली आहे. भारत […]
राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे (सीएसआयआर-एनआयओ) संचालक प्रो. सुनील कुमार सिंग यांची सायन्स अँड इंजिनिअरिंग बोर्डाच्या महत्वपूर्ण अशा जे सी बोस फेलोशिपसाठी निवड झाली आहे. प्रो. सुनील कुमार सिंग यांना वैज्ञानिक स्पेशलायझेशनच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल या फेलोशिपसाठी निवड झाली आहे. प्रो.सिंग यांचे भू-रसायनशास्त्र आणि समस्थानिक रसायनशास्त्र, पॅलेओक्लायमेट आणि पॅले ओशनोग्राफी, न्यूट्रिएंट सायकलिंग आणि जैव-रसायनशास्त्र […]
ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना यावर्षीचा दादासाहेब फाळक जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला . केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या पुरस्काराची घोषणा केली. चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल दिला जाणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. प्यासा, साहब बिवी और गुलाम, गाईड, कागज के फूल, चौदहवी का चांद यासारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये चतुरस्त्र अभिनयाने वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या […]
आज 27 सप्टेंबर हा दिवस “जागतिक पर्यटन दिन” म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. 1980 पासून जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) याच दिवशी साजरा करण्यास सुरुवात झाली कारण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थे (UNWTO)ची स्थापना 1970 मध्ये याच दिवशी झाली होती. थीम:- जागतिक पर्यटन दिनाने पर्यटन क्षेत्रातील सध्याची जागतिक आव्हाने आणि संधींना तोंड देण्यासाठी नवीन […]
युवकांना त्यांचे स्वतःचे व्यवसाय उभारण्यासाठी मदत म्हणून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी एका योजनेची सुरुवात केली आहे . स्वयंरोजगाराच्या माध्यमातून विकास साधण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.’ मुख्यमंत्री आत्मनिर्भर असोम अभिजन 2023′ असे या योजनेचे नाव आहे. या कार्यक्रमांमध्ये उद्योजकतेविषयी इकोसिस्टीम तयार करण्यासाठी दोन लाख युवकांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
मल्याळम सिनेसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते के.जी. जॉर्ज यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले. जॉर्ज यांच्या कारकीर्दीला सन 1970 मध्ये सुरुवात झाली होती. त्यांच्या ‘स्वप्नदानम’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर तब्बल नऊ राज्य चित्रपट पुरस्कार प्राप्त झाले होते . 2015 मध्ये त्यांना केरळ सरकारचा सर्वोच्च […]
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल गोव्यामध्ये पणजी येथील अगुआडा किल्ला दीपगृह येथे भारताच्या पहिल्या दीपगृह महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेला हा तीन दिवसीय महोत्सव साजरा केला जाईल. यामुळे ही ऐतिहासिक स्थळे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होतील. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद […]