information
गुजरात मधील केवडिया येथे बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाची (MoPSW) 19वी सागरी राज्य विकास परिषद (MSDC) सुरु झाली. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या दोन दिवसीय परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. सागरी राज्य विकास परिषद ही एक सर्वोच्च सल्लागार संस्था असून, सागरी क्षेत्राच्या विकासासाठी आणि प्रमुख बंदरांव्यतिरिक्त इतर बंदरांचा एकात्मिक […]
भारत, त्रिनिदाद आणि टोबॅगो यांनी इंडिया स्टॅक (INDIA STACK) सामायिक करण्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. उद्दिष्ट:- इंडिया स्टॅक हे खुले ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) आणि डिजिटल सार्वजनिक वस्तूंचा संग्रह असून, मोठ्या प्रमाणात ओळख, डेटा आणि पेमेंट सेवा उपलब्ध करणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे. क्षमता विकास, प्रशिक्षण कार्यक्रम, सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण, सरकारी अधिकारी आणि […]
भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष अदिल सुमारीवाला यांची जागतिक ॲथलेटिक्स महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली . जागतिक ॲथलेटिक्स महासंघात प्रथमच भारतीय व्यक्तीची एवढ्या उच्च पदावर निवड झाली. जागतिक महासंघात चार उपाध्यक्षांची निवड होते. या निवडणुकीत सुमारीवाला यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. एकूण 8 उमेदवार रिंगणात होते. सुमारीवाला 2015 पासून जागतिक संघटनेच्या कार्यकारणीत आहेत. जागतिक ॲथलेटिक्स महासंघ: […]
विजयी – प्रिया (भारत) उप विजयी – लॉरा सेलीन कुएहेनविरुद्ध(जर्मनी) भारताच्या प्रियाने 76 किलो वजनी गटात 20 वर्षाखालील गटाच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. ज्युनिअर जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी प्रिया भारताची दुसरी कुस्तीगीर ठरली. याआधी अंतिम पंघलने मागच्या वर्षी सुवर्णपदक जिंकले होते. अंतिम फेरीत प्रियाने लॉरावर 5-0 अशी सहज मात केली.
भारतीय अवकाश संशोधन संस्थाच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-3 मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा 17 ऑगस्ट रोजी पार पडला . मुख्य यानापासून लँडर मॉड्युल विलग करण्यात यश आले असून आता या लँडिंग मॉड्युलचा चंद्र पृष्ठभागाच्या दिशेने प्रवास सुरू होणार आहे. 23 ऑगस्ट रोजी ‘विक्रम’च्या अवतरणाची सर्वाधिक अवघड क्रिया पार पडणार आहे. ‘ विक्रम’ हा लँडर आणि त्यावर असलेला ‘प्रग्यान’ हा […]
हुगळी नदीकिनारी ‘गार्डन रिच शिप बिल्डर्स इंजिनियर्स लिमिटेड’ केंद्रात भारतीय नौदलाच्या ‘प्रोजेक्ट 17 अल्फा अंतर्गत’ निर्मित ‘विंध्यगिरी’ या सहाव्या युद्धनौकेचे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते जलावतरण करण्यात आले. योजनेनुसार एकूण सात युद्ध नौकांची निर्मिती करण्यात येणार आहे. यापैकी ‘विंध्यगिरी’ ही सहावी आहे. याआधी पाच युद्ध नौकांचे जलावतरण 2019 ते 2022 दरम्यान करण्यात आले. कोलकाता येथील […]
भारताच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इस्राईल मधील इलायत शहरातील एका चौकाला ‘इंडियन- ज्यूईस कल्चर स्क्वेअर’ असे नाव देण्यात आले आहे. भारत आणि इस्राईल मधील दृढ संबंध आणि समान मूल्यांच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आल्याचे इलायतचे महापौर एली लॅकरी यांनी सांगितले. हा चौक म्हणजे दोन देशांमधील प्रेम ,मैत्री परस्पर सहकार्य यांचे प्रतीक आहे.
भारताचा मोहित कुमार 20 वर्षाखालील गटातील फ्री -स्टाईल प्रकारातील नवा जगज्जेता मल्ल ठरला आहे. या वयोगटात विजेतेपद मिळवणारा मोहित चौथा भारतीय ठरला. मोहितने अंतिम लढतीत रशियाचा एल्डर अखमाडूनिनोवचा 9-8 असा पराभव केला. 20 वर्षाखालील गटात भारताला जागतिक स्पर्धेत 2019 नंतर विजेतेपद मिळाले. 2019 मध्ये दीपक पुनिया हा विजेता ठरला होता. […]
14 व्या जागतिक मसाले परिषदेचे नवी मुंबईत आयोजन होणार आहे. विविध व्यापार आणि निर्यात मंचांच्या सहकार्याने आयोजित केलेली ही जागतिक मसाले परिषद, मसाले क्षेत्रासाठीच्या सर्वात मोठ्या व्यावसायिक व्यासपीठांपैकी एक आहे. या परिषदेत धोरणकर्ते, नियामक अधिकारी, मसाले व्यापार संघटना, सरकारी अधिकारी तसेच जी- 20 देशांमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. नवी मुंबईत […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयपीसी म्हणजे भारतीय फार्माकोपिया(औषध संहिता) आयोग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय,भारत सरकार आणि सुरीनामचे आरोग्य मंत्रालय यांच्यात 4 जून 2023 रोजी सुरीनाम मध्ये भारतीय फार्माकोपियाला मान्यता देण्यासाठी करण्यात आलेल्या सामंजस्य कराराची माहिती देण्यात आली. भारताच्या राष्ट्रपतींच्या सुरीनाम दौऱ्यादरम्यान या करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. उभय देशांनी […]