information
असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापकाळात संरक्षण देण्यासाठी, भारत सरकारने 2019 मध्ये प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन योजना (PM-SYM) ही निवृत्ती वेतन योजना सुरु केली आहे. त्याअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहिना 3000/- रुपये निवृत्ती वेतन दिले जाईल. भूमिहीन शेतमजुरांसह इतर कामगार या योजनेसाठी maandhan.in पोर्टलद्वारे किंवा कोणत्याही कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) […]
सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) विधेयक, 2023 ला लोकसभेने मंजुरी दिल्याने या विधेयकाला संसदेत मंजूरी मिळाली आहे. 20 जुलै 2023 रोजी राज्यसभेमध्ये हे विधेयक मांडण्यात आले होते आणि त्यावर चर्चा झाल्यानंतर 27 जुलै 2023 रोजी ते मंजूर करण्यात आले. वर्ष 1984 मध्ये म्हणजे 40 वर्षांपूर्वी सिनेमॅटोग्राफ कायदा 1952 मध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या होत्या. त्यानंतर […]
भारत प्रथमच जागतिक कॉफी परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे . आंतरराष्ट्रीय कॉफी संघटनेतर्फे पाचवी परिषद 25 ते 28 सप्टेंबर दरम्यान बेंगळूरु येथे होणार आहे. कॉफीच्या व्यापाराला प्रोत्साहन कॉफी उत्पादक आणि कॉफी वापरकर्त्या देशांत सहकार्य वृद्धीसाठी आयसीओ ही आंतरशासकीय संस्था कार्यरत आहे . आयसीओ भारतीय कॉफी बोर्डाच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन करत आहे . […]
भारतात तिहेरी तलाक विरोधात कायदा अस्तित्वात येण्याच्या वर्धापन दिनानिमित्त 1 ऑगस्ट रोजी मुस्लिम महिला हक्क दिन साजरा केला जातो . 2020 मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता. पार्श्वभूमी:- भारत सरकारने तिहेरी तलाक विरोधात 1 ऑगस्ट 2019 रोजी कायदा केला ज्याद्वारे तिहेरी तलाकच्या सामाजिक कुप्रथेस फौजदारी गुन्हा ठरविण्यात आले . 2019 […]
महाराष्ट्र राज्य शासनाने 11 जुलै 2002 रोजी महसूल दिनाच्या आयोजना संदर्भात पहिले परिपत्रक काढले होते यानंतर दरवर्षी 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 1 ऑगस्ट महसूल दिन हा दिवस मागे वळून आपल्या कामाचे परिक्षण करण्याचा दिवस आहे . शासनाच्या मध्यवर्ती विभाग म्हणून महसूल विभाग कार्यरत आहे . महसूल विभागाने वर्षभर केलेल्या विविध […]
प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेची (PMBJP) अंमलबजावणी करणाऱ्या भारतीय औषधे आणि शस्त्रक्रिया उपकरणे कार्यालयाने (PMBI), आपल्या यादीत डॅपाग्लायफ्लोझीन 10 मिलीग्राम, मेटफार्मिन हाइड्रोक्लोराइड ( सावकाश पाझरणारे) 1000 मिलीग्राम ही मधुमेहाच्या उपचारासाठी वापरली जाणारी औषधे तसेच जन औषधी प्रोटीन (उच्च प्रथिने) पावडर, महिलांसाठी जन औषधी प्रोटीन पावडर (व्हे प्रोटीन पावडर) यासारख्या नव्या उत्पादनांचा समावेश केला आहे. सरकारने 31 […]
नवी दिल्ली येथे 28 आणि 29 जुलै 2023 या दिवशी ही दोन दिवसीय परिषद होत आहे नीती आयोग, या भारत सरकारच्या धोरण नियोजन विषयक संस्थेने, ओटावा येथील आंतरराष्ट्रीय विकास संशोधन केंद्र आणि नवी दिल्ली येथील जागतिक विकास नेटवर्क (जीडीएन) यांच्या संयुक्त सहकार्याने आंतरराष्ट्रीय धोरणविषयक दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. जागतिक पातळीवरील […]
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू अगर जखमी झाल्यावर भरपाईसाठी केलेला अर्ज 30 दिवसांत निघाली काढणे बंधनकारक आहे. यानंतर विलंब झाल्यास भरपाई रकमेवर विहित दराने व्याज देण्याची तरतूद करणारे सुधारित वन्यप्राणी हल्ला, इजा किंवा नुकसान भरपाई विधेयक विधान परिषदेत मंजूर करण्यात आले. व्यक्ति मृत होणे, व्यक्ती कायम अपंग होणे, व्यक्ति किरकोळ जखमी झाल्यास भरपाईची तरतूद करण्यात आली […]
केंद्र सरकारच्या अखात्यारीत असलेल्या सक्तवसुली संचलनालयाचे संचालक संजय कुमार मिश्रा यांना व्यापक जनहित लक्षात घेऊन 15 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. या मदतीनंतर मात्र संचालक म्हणून मिश्रा यांना मुदतवाढ मिळणार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले . गेल्या 11 जुलैला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार संचालक एस. के. मिश्रा यांची मुदत 31 जुलैला संपणार होती. […]
भारताची नियंत्रक आणि महालेखापरीक्षक(CAG) गिरीशचंद्र मुर्मू यांची 2024 ते 2017 या चार वर्षांच्या कालावधीसाठी जागतिक आरोग्य संघटनेचे बाह्य लेखा परीक्षक म्हणून पुन्हा निवड झाली आहे. जिनिव्हा येथे झालेल्या 76 व्या जागतिक आरोग्य संमेलना दरम्यान त्यांची निवड झाली. मार्च 2023 मध्ये त्यांची आंतरराष्ट्रीय कामगार संघटनासाठी बाह्य लेखापरीक्षक म्हणून निवड झाली होती . भारताच्या […]