information
पंतप्रधानपदाची धुरा थोरला मुलगा हुन मानेट याच्याकडे देण्याची घोषणा ‘कंबोडिया पीपल्स पार्टीचे’ नेते हुन सेन यांनी केली . कंबोडियन पीपल्स पार्टीने सार्वत्रिक निवडणुकीत प्रचंड विजय मिळवल्यानंतर हुन सेन यांनी ही घोषणा केली. हुन सेन यांचे कंबोडियावर 38 वर्षांपासून निरंकू सत्ता आहे . यावर्षी निवडणुकांपूर्वी त्यांनी थोरला मुलगा हुन मानेट याच्याकडे पंतप्रधानपदाची धुरा […]
मलेशियाचा वेगवान गोलंदाज स्याझुल इद्रस याने टी-ट्वेंटी क्रीडा प्रकारात कमाल करताना 7 बळी मिळवले. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे. बायूमास ओव्हल येथे आयसीसी कडून 2024 च्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी आशियाई विभाग पात्रता – ‘ब’ ही स्पर्धा सुरू आहेत. त्यात मलेशियाच्या ईद्रसने हा पराक्रम केला. आयसीसी ची अधिकृत स्पर्धा असल्यामुळे हा विक्रम पूर्ण […]
भारत हेवी इलेक्ट्रिकल या सरकारी कंपनीच्या बांगलादेशातील मैत्री औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यातून नियमित वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्याची वीज निर्मिती क्षमता 660 मेगावॉट असून एकूण प्रकल्पाची क्षमता 1,320 मेगावॉट आहे. दुसऱ्या टप्प्यातील निर्मिती प्रकल्प मुख्य ग्रीड ला जोडण्यात आला असून निर्धारित मानांकनानुसार हा पुरवठा सुरू झाला आहे. […]
बॅडमिंटन विश्वातील आपला दबदबा कायम राखताना भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी(आमलापुर,आंध्र प्रदेश) आणि चिराग शेट्टी(मुंबई, महाराष्ट्र) जोडीने यावर्षी हंगामातील चौथे विजेतेपद मिळवले. सात्विक- चिराग जोडीने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या फजर अलफियान आणि महम्मद रियान ऑड्रियांतो या इंडोनेशिया जोडीचा 17- 21, 21-13, 21 -14 असा पराभव करीत कोरिया ओपन स्पर्धा सुपर 500 जिंकली. या जोडीने यावर्षी […]
रात्री जेसीबीचालक म्हणून काम अन सकाळी वृत्तपत्रांचे वितरण असे दिवस रात्र मेहनत करत उदरनिर्वाह चालवताना अखिल के. यांनी स्वतः मधला सर्जनशील लेखक जपला . त्यांना नुकताच केरळ साहित्य अकादमीच्या पुरस्कार मिळाला. वयाच्या 28 व्या वर्षी त्यांनी या पुरस्काराला गावसणी घातली. अखिल यांना ‘नीलाचदयन’ या लघुकथा कथासंग्रहासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. या […]
राजस्थान विधानसभेत किमान उत्पन्न हमी विधेयक -2023 आवाजी मतदानाने मंजूर झाले. असे विधेयक आणणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. यानुसार राजस्थानातील ग्रामीण आणि शहरी भागातील कुटुंबांसाठी वर्षातील 125 दिवसांचा रोजगार हा कायदेशीर अधिकार ठरणार आहे. विधेयकात सामाजिक सुरक्षा पेन्शन योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, पतीचे निधन झालेल्या महिला ,एकल महिला […]
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे मुख्यमंत्रीपदाची सलग 23 वर्षे 139 दिवस राहिले आहेत . सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्यांच्या यादीत नवीन पटनायक हे आता दुसऱ्या स्थानी आहेत. यापूर्वी पश्चिम बंगालचे ज्योती बसू हे दुसऱ्या स्थानी होते . ज्योती बसू हे 23 वर्ष 137 दिवस मुख्यमंत्री पदावर होते . सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन […]
मध्य प्रदेश सरकार, नागरी विमानवाहतूक मंत्रालय, पवन हंस लिमिटेड आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) यांनी संयुक्तपणे 5 व्या हेलिकॉप्टर आणि स्मॉल एअरक्राफ्ट शिखर परिषदेचे आयोजन मध्य प्रदेशात खजुराहो येथे 25 जुलै 2023 रोजी केले आहे. शिखर परिषदेचे उद्घाटन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक व […]
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत, गुजरातमधील आणंद येथे 22 जुलै रोजी दूध उत्पादक सहकारी संस्थांच्या माध्यमातून महिलांच्या नेतृत्वाखालील शाश्वत विकास या W20 जनभागीदारीविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुग्धविकास क्षेत्रातील तज्ञ आणि महिला नेतृत्वासह सन्माननीय अतिथी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धविकास राज्यमंत्री परशोत्तम रुपाला यांनी या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या […]
केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी 22 जुलै रोजी ग्रामीण वॉश (पाणी, निकोप आरोग्यासाठी खबरदारी, स्वछता) सहकार्य मंचाच्या (आरडब्लूपीएफ) दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत, हागणदारी मुक्तीसाठीच्या 75 ओडीएफ प्लस सर्वोत्तम पद्धतींच्या संग्रहाचे प्रकाशन केले. स्वछता क्रॉनिकल्स: ट्रान्सफॉर्मेटिव्ह टेल्स फ्रॉम इंडिया अर्थात ‘स्वच्छता यशोगाथा : भारतातील परिवर्तनवादी कथा’ या शीर्षकाखाली प्रकाशित हा संग्रह, स्वच्छ भारत अभियान […]