information
मराठीतील लोक साहित्याचे संशोधन करून लोकसाहित्य प्रकाशित करण्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी कार्यरत लोकसाहित्य समितीची पुनर्रचना करण्यात आली. शाहीर हेमंत मावळे यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मराठीतील समृद्ध लोकसाहित्याचे संशोधन व जतन करण्याबरोबरच लोकसाहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशातून आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी लोकसाहित्य समितीची स्थापना केली होती. चिं. ग.कर्वे, सरोजिनी […]
दर वर्षी 18 जुलै रोजी नेल्सन मंडेला दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक आदर्श असलेल्या नेल्सन मंडेला यांचे आयुष्य आणि वारशाचे महत्व अधोरेखित करून शांती आणि स्वातंत्र्याच्या संस्कृतीतील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा हा एक मार्ग आहे. या वर्षी(2023) विवेकानंद आंतरराष्ट्रीय फाउंडेशनने राष्ट्रीय संग्रहालय आणि दक्षिण आफ्रिका उच्चायुक्त यांच्याबरोबर भागीदारीतून या विशेष प्रदर्शनाचे आयोजन […]
भारत सरकारच्या “आत्मनिर्भर भारत” उपक्रमांच्या अनुषंगाने विशाखापट्टणम येथील एमएसएमई मेसर्स सेकॉन इंजिनीअरिंग प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड सोबत 08 x क्षेपणास्त्र आणि दारुगोळा (एमसीए) बार्जच्या बांधकामाचा करार झाला होता. एलएसएएम 7 (यार्ड 75) या मालिकेतील पहिला बार्ज 18 जुलै 23 रोजी आयएनएस तुनीरचे कमांडिंग ऑफिसर कमोडोर इफ्तेखार आलम यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आला. […]
केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमन चंडी यांचे यांची वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले. केरळचे दोन वेळा ते मुख्यमंत्री पद भूषवले होते. ओमन चंडी यांनी 2004 ते 2006 आणि पुन्हा 2011 ते 2016 मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली. चंडी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री के. करुणाकरण आणि ए. के .अँटनी यांच्या नेतृत्वाखाली […]
जपानची राजधानी टोकियो येथे 10 ते 17 जुलै 2023 या कालावधीत आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र(Physics) ऑलम्पियाड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेत 82 देशातील एकूण 387 विद्यार्थी सहभागी झाले होते. भारतीय संघातील पाच पैकी पाच विद्यार्थ्यांनी पदकांची कमाई केली आहे. भारताने तीन सुवर्ण व दोन रौप्य पदके जिंकली आहेत. देशनिहाय पदतालिकेत […]
आचार्य अत्रे यांचे 125 व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जन्म घ्यावी सासवड येथे यावर्षीचे (2023) आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन भरविण्यात येत आहे. 13 आणि 14 ऑगस्टला होणाऱ्या या 25 व्या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार साहित्यक आणि जडण-घडण मासिकाचे मुख्य संपादक डॉक्टर सागर देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनाचे उद्घाटन जेष्ठ शास्त्रज्ञ […]
गुन्हेगारीकडे अल्पवयीन मुलांचा वाढता कल चिंतेचा विषय ठरत असतानाच गेल्या काही महिन्यांपासून गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुले सामील असल्याचे लक्षात आल्यानंतर पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करण्यासाठी ऑपरेशन परिवर्तन मोहीम हाती घेतली आहे. गंभीर गुन्ह्यात सामील अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करण्यात येत आहे .त्यासाठी पोलिसांकडून स्वयंसेवी संस्थांचे सहाय्य घेण्यात आले असून अल्पवयीन मुलांच्या वयोगटांनुसार समुपदेशन करण्यास […]
लहान मुलांना सोप्या भाषेत गणित समजावून सांगण्यामध्ये हातखंड असलेल्या ज्येष्ठ गणितज्ञ आणि लेखिका डॉक्टर मंगला जयंत नारळीकर यांचे वयाच्या 80 व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या त्या पत्नी होत्या. मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च च्या गणित विद्यालयात आणि सहाय्यक संशोधक आणि नंतर […]
2016 ते 2023 या पाच आर्थिक वर्षात देशभरातील 5 कोटी नागरिक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर आले. आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानातील सुधारणा याद्वारे ही मोजणी करण्यात आली असून उत्तर प्रदेश ,बिहार आणि मध्य प्रदेश मध्ये सर्वाधिक घट नोंदविण्यात आली आहे. नीती आयोगाच्या अहवालात ही माहिती देण्यात आली. राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांकाच्या(एमपीआय) दुसऱ्या आवृत्तीनुसार 2015 -16 मध्ये भारतातील […]
भारत आणि संयुक्त अरब अमिरातीने(यूएई) व्यापारी व्यवहार स्थानिक चलनात करण्याचे ठरवले आहे . याशिवाय भारताची युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) आणि ‘यूएई’ची ‘इन्स्टंट’ पेमेंट प्लॅटफॉर्म (आयपीपी) या यंत्रणा एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन्ही देशांच्या मध्यवर्ती बँकांमध्ये करार करण्यात आले . पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख महंमद बीन झायेद अल नहयान यांच्यात […]