information
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या अत्यंत महत्त्वकांक्षी चंद्रयान 3 चे आज 2 वाजून 35 मिनिटांनी एलव्हीएम 3-एम4 या प्रक्षेपण यानाचे मदतीने चंद्रयानचे उड्डाण होईल. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक वैज्ञानिक संस्था तसेच शाळांनी थेट प्रक्षेपणाची व्यवस्था केली आहे. 2019 साली चंद्रयान 2 मोहिमेमध्ये विक्रम या लँडरचे अलगद अवतरण करण्याचा प्रयत्न इस्रो ने केला होता. […]
छोट्या उपग्रहांची वाढती मागणी लक्षात घेऊन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आपले लघु उपग्रह प्रक्षेपण वाहन एसएसएलव्ही खाजगी उद्योग क्षेत्रांना हस्तांतर करण्याची घोषणा केली. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी ‘एसआयए’ इंडिया ने आयोजित केलेल्या भारतीय अंतराळ परिषदेत ही माहिती दिली. पृथ्वीच्या खालील कक्षेत 500 किलोमीटर पर्यंतचे उपग्रह स्थापित करण्याची सेवा मागणीनुसार पुरविण्यासाठी एसएसएलव्ही च्या दोन प्रायोगिक […]
अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे प्रस्तावित मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेसंदर्भात साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. पुढील दोन महिन्यात सर्वसमावेशक अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला . मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी […]
संरक्षण विषयक सामुग्रीची निर्यात हा संरक्षण सामग्री उद्योगांच्या शाश्वत वृद्धीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असून तिला बळ देण्याच्या उद्देशाने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 11 जुलै 2023 रोजी हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड(एचएएल) या कंपनीच्या क्वालालंपूर येथील प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन केले. एचएएलचे हे प्रादेशिक कार्यालय भारत आणि मलेशिया यांच्यातील संरक्षण विषयक उद्योगांच्या घनिष्ठ सहयोगी संबंधांत सुलभता आणण्यासाठी उपयुक्त ठरणार […]
भारतीय नौदलाने बंगालच्या उपसागरात आयोजित केलेल्या जपान – भारत सागरी युद्धसराव 2023(जिमेक्स 23) या सातव्या युद्धसरावाचा 11 जुलै दोन्ही बाजूंकडून पारंपरिक स्टीमपास्टने एकमेकांना निरोप देत समारोप झाला. भारतीय नौदलाची दिल्ली, कमोर्ता आणि शक्ती ही जहाजे , ईस्टर्न फ्लीटचे ध्वजाधिकारी रिअर ऍडमिरल गुरुचरण सिंग यांच्या नेतृत्वाखाली आणि जपान सागरी स्वसंरक्षण दलाचे (JMSDF) सॅमिदारे हे जहाज रिअर […]
सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांवर मर्यादा आणणारे वादग्रस्त विधेयक इस्रायलच्या संसदेत मंजूर करण्यात आले. इस्रायल पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा न्याय संस्थेवर वर्चस्व मिळवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून या विधेयकाकडे पाहिले जाते. इस्रायल मधील नियमानुसार या विधेयकावर आणखीन दोन वेळा मतदान होणार आहे. विधेयकाला पूर्णपणे मंजुरी मिळाल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर झाल्यास इस्रायलच्या सर्वोच्च न्यायालयाला सरकारचे निर्णय रद्द करता […]
युवा कार्यकर्त्या मलाला यूसुफझाईचा सन्मान करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 12 जुलै हा दिन ‘जागतिक मलाला दिन’ म्हणून घोषित केला. जगभरातील महिला आणि मुलांच्या हक्कांचा सन्मान करण्यासाठी मलाला युसूफझाईचा जन्मदिन ‘मलाला दिन’ म्हणून साजरा केला जातो. मलाला विषयी… मलालाने तिच्या आयुष्यात अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला. मलालाने निर्धाराने महिलांच्या सन्मानासाठी आणि शिक्षणासाठी दहशतवादी तालिबान्यांशी लढा दिला. मलालाचा जन्म […]
जागतिक पातळीवर आतापर्यंत झालेल्या गुरुत्वीय लहरींच्या संशोधनाला दिशा देणारे नवे संशोधन समोर आले आहे. ब्रह्मांडातील अतिशय कमी वारंवारिता असलेल्या गुरुत्वीय लहरींच्या पार्श्वभूमीच्या शोध घेण्यात आला असून या संशोधनात भारतीय शास्त्रज्ञांचा सहभाग आहे . विश्वातील सर्वोत्तम घड्याळ मानल्या गेलेल्या पल्सार ताऱ्यांच्या तब्बल 25 वर्षांच्या नोंदीचे विश्लेषण करून महत्त्वपूर्ण निष्कर्ष हाती आले. लायगो वेध शाळेने शोधलेल्या गुरुत्वीय […]
भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी चांद्रयान-3 मोहिमेची तारीख निश्चित झाली असून 14 जुलै रोजी दुपारी 2:35 मिनिटांनी एलव्हीएम -3 या प्रक्षेपण यानातून हे या चंद्राकडे झेपावेल. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातील प्रक्षेपण तळावरून चांद्रयान -3 चे उड्डाण होईल. चांद्रयानाच्या सर्व चाचण्या झाल्या असून ‘लाँच व्हेईकल मार्क थ्री’ या प्रक्षेपण यानावर ते सिद्ध करण्यात आले […]
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जून रोजी राणी कमलापती रेल्वे स्थानकामधून पाच वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवला . ● यापैकी दोन रेल्वे मध्य प्रदेशात धावणार आहेत तर तीन रेल्वे गाड्या देशाच्या इतर भागातील शहरांना जोडणार आहेत. ● राणी कमलापती (भोपाळ)- जबलपूर वंदे भारत एक्सप्रेस, खजुराहो- भोपाळ- इंदूर वंदे भारत एक्सप्रेस, मडगाव (गोवा)- मुंबई […]