information
चिराग शेट्टी आणि त्याचा सहकारी सात्विक साईराज रंकीरेड्डी यांनी इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरी गटाचे विजेतेपद पटकावले. सात्विक चिराग जोडीने अंतिम लढतीत जगजेत्या मलेशियाच्या आरोन चिया व सोह वुई यिक जोडीवर 21 -17, 21- 18 असा विजय साकारला. सात्विक चिरागचे हे कारकिर्दीतील पहिले ‘सुपर 1000’ विजेतेपद असून हा दर्जा असलेल्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी ही […]
गॅस अथॉरिटी ऑफ इंडियाच्या(GAIL- गेल) संचालकपदी (मार्केटिंग) संजय कुमार यांनी नियुक्ती झाली आहे. यापूर्वी संजय कुमार हे दिल्ली परिसराला गॅसपूरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक होते. संजय कुमार हे आयआयटी खरगपूरचे मेकॅनिकल इंजिनिअर आणि एमबीए असून त्यांना नैसर्गिक वायू क्षेत्रातील 35 वर्षांचा अनुभव आहे. 1988 या वर्षी ते ‘गेल’ मध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी […]
भारतात गुणात्मक शोधनिबंध सादर करण्याचे प्रमाण वाढले असून शोधनिबंधाच्या प्रकाशनात भारताने ब्रिटनला मागे टाकून जगात तिसरा क्रमांक पटकावला आहे. भारतीय शोधनिबंधांचे सायटेशन वाढले असून 2019 मध्ये 0.85 पर्यंत असलेले गुणांक 2021 मध्ये 1.05 पर्यंत वाढले आहे. हे गुणांक जागतिक सरासरीच्या पुढे आहे. शोधनिबंधात जगात अमेरिकेचा पहिला क्रमांक असून, चीन दुसऱ्या स्थानी आहे.
दिल्लीतील तीन मूर्ती भवनातील ‘नेहरू स्मृती संग्रहालय व ग्रंथालय चे नाव वगळण्यात आले असून पंतप्रधान संग्रहालय व ग्रंथालय असे नामांतर करण्यात आले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री व नेहरू संग्रहालयाच्या समितीचे उपाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत नेहरू समृद्धी संग्रहालय व ग्रंथालयाचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचे निवासस्थान राहिलेल्या तीन मूर्ती […]
नीती आयोग आणि युनायटेड नेशन्स इन इंडिया यांनी भारत सरकार – संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास सहकार्य आराखडा(GoI-UNSDCF 2023-2027) यावर 16 जून रोजी स्वाक्षरी केली. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुब्रह्मण्यम आणि संयुक्त राष्ट्रांचे भारतातील निवासी समन्वयक शोम्बी शार्प यांनी नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी,नीती आयोग, केंद्रीय मंत्रालयाचे वरिष्ठ प्रतिनिधी आणि भारतातील संयुक्त […]
लेखिका अरुंधती रॉय यांना 45 वा युरोपियन ऐसे प्राइज जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. हा पुरस्कार देणाऱ्या चार्ल्स व्हेलॉन फाउंडेशन या संस्थेने या संदर्भात घोषणा केली . अरुंधती रॉय यांच्या 2021 च्या ‘आझादी’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या निबंधांच्या फ्रेंच अनुवादासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या निबंधामध्ये त्यांनी वाढत्या एकाधिकारशीहीच्या जगामध्ये स्वातंत्र्याचा अर्थ शोधण्याचा […]
विविध संघर्षग्रस्त देशांत प्राणाची बाजी लावून लढा देताना हुतात्मा झालेल्या शांतता सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात एक स्मारक भिंत बनवण्यात येणार आहे. भारताने याविषयी मांडलेला प्रस्ताव संयुक्त राष्ट्राने 15 जून 2023 रोजी एकमताने मंजूर केला आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी यूएनजीएमध्ये ‘मेमोरियल वॉल फॉर फॉलन युनायटेड नेशन्स पीसकिपर्स’ नावाने […]
भारतीय क्रीडापटू आणि संघ अधिकाऱ्यायांना भोजन आणि निवासासाठी (बोर्डिंग आणि लॉजिंग) दिल्या जाणाऱ्या रकमेची कमाल मर्यादा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 66% ने वाढवली आहे. मंत्रालयाच्या राष्ट्रीय क्रीडा महासंघांना (एनएसएफ) साहाय्य योजनेअंतर्गत ही तरतूद केवळ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणार्या खेळाडूंसाठी आणि अधिकार्यांसाठी आहे. नवीन सुधारित नियमांनुसार, परदेशात मान्यताप्राप्त स्पर्धांसाठी प्रवास करणारे खेळाडू आणि […]
बांगलादेशची राजधानी ढाका येथे 12 मे ते 13 मे दरम्यान हिंद महासागर परिषद(Indian Ocean Conference- IOC) आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उद्घाटन बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्ते झाले . ही एकूण 6 वी परिषद होती. परिषदेची थीम :- “शांतता, समृद्धी, आणि लवचिक भविष्यासाठी भागीदारी” परिषदेचा उद्देश: हिंदी महासागर क्षेत्राच्या भौगोलिक आर्थिक आणि सामाजिक […]
सागरी कासवांविषयी जाणीवजागृती व्हावी यासाठी जगभरात 16 जून हा दिवस ‘जागतिक सागरी कासव दिन’ म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी आठ टन प्लास्टिक समुद्रात कसेही फेकण्याच्या मानवाच्या निष्काळजी कृतीमुळे सागरी कासवांना सर्वात जास्त धोका निर्माण झाला आहे. या कासवांचे प्रमुख अन्न जेलिफिश हे असते. सागरी पाण्यातील वाहत आलेल्या पिशव्या आणि जेलिफिश यातील फरक त्यांना समाजत नाही. […]