information
नेदरलँड मधील भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञ जॉयीता गुप्ता यांना प्रतिष्ठेचा स्पिनोझा पुरस्कार मिळाला आहे. नेदरलँड मध्ये विज्ञान क्षेत्रात दिला जाणार हा सर्वोच्च पुरस्कार आहे . पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जागेचा सुयोग्य वापर या विषयावर त्यांनी गेली काही वर्ष काम करत शास्त्रीय अहवाल तयार केला होता. गुप्ता यांना या पुरस्काराच्या रूपात 15 लाख युरो प्राप्त झाले असून ते संशोधनासाठी […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने (CCEA :-Cabinet Committee on Economic Affairs) 2021-22 ते 2025-26 या कालावधीत 2980 कोटी रुपयांच्या अंदाजित कोळसा आणि लिग्नाइट शोधासाठीची केंद्रीय क्षेत्र योजना 15 व्या वित्त आयोगाच्या चक्रासह सुरू ठेवण्यास मान्यता दिली. या योजनेअंतर्गत कोळसा आणि लिग्नाइटचे उत्खनन दोन व्यापक टप्प्यांमध्ये केले जाते: (1) […]
जागतिक तंबाखू दिनानिमित्त, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) 31 मे 2023 रोजी एनसीपीसीआर येथे “व्यसनमुक्त अमृत काळ” ही राष्ट्रीय मोहीम यशस्वीपणे सुरू केली. निरोगी आणि व्यसनमुक्त भारताला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरु केलेली ही मोहीम तंबाखू आणि अंमली पदार्थमुक्त राष्ट्र निर्माण करण्याच्या मोहिमेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. टोबॅको फ्री इंडिया या नागरिकांच्या समूहासोबत तांत्रिक भागीदारीच्या […]
मध्य पूर्व अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवाळाची निर्मिती झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले. येणाऱ्या दोन ते तीन दिवसात उत्तरेकडे सरकताना या वादळाची तीव्रता वाढत जाणार आहे. आग्नेय अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता 24 तासांमध्ये डिप्रेशन, डीप डिप्रेशनवरून चक्रीवादळापर्यंत पोहोचली. अरबी समुद्राचे तापमान सरासरी पेक्षा जास्त असल्याने वादळाला मोठी ऊर्जा मिळत आहे. […]
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपती डॉक्टर रवींद्र कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर सुरेश गोसावी आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर संजय भावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील दहा महिने ते वर्षभरापासून राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये पूर्ण वेळ कुलगुरू नसल्याने प्रभारी अधिकाऱ्यांद्वारे कामकाज सुरू होते .अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यातील विविध विद्यापीठांना पूर्ण […]
जागतिक अन्न सुरक्षा दिन (World Food Safety Day) दरवर्षी 7 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. उद्देश आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या अन्नाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभरात अन्न सुरक्षा दिन साजरा केला जातो. नागरिकांना दूषित अन्न आणि पाण्यामुळे होणाऱ्या हानीबाबत जागरूक करणे, हा एकमेव उद्देश यामागे आहे. इतिहास: सन 2017 मध्ये […]
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी – 2023 जाहीर केली आहे. मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षीही ‘एनआयआरएफ’ च्या सर्वसाधारण क्रमवारीत भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच ‘आयआयटी मद्रास’ने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम स्थान पटकावले आहे. दुसऱ्या स्थानी आयआयएससी बेंगळूर आहे तर आयआयटी मुंबईला मागे टाकत तिसऱ्या स्थानी ‘आयआयटी दिल्ली’ने बाजी मारली आहे . यावर्षी […]
भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि सुरीनामचे राष्ट्रपती चंद्रिका प्रसाद संतोखी, 5 जून 2023 रोजी सुरीनाममध्ये भारतीयांचं आगमन झाल्याच्या घटनेला दीडशे वर्षं पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं पारमारिबो येथे झालेल्या सांस्कृतिक महोत्सवाचे साक्षीदार ठरले. 1873 मध्ये 5 जून रोजी भारतीयांचा पहिला गट लल्ला रुख या जहाजावरून सुरिनामच्या किनाऱ्यावर दाखल झाला आणि या देशाच्या इतिहासातील […]
क्षयरोग झालेल्या मुलांमध्ये त्याचा संसर्ग न झालेल्या मुलांच्या तुलनेत ‘ड’ जीवनसत्वाची अधिक कमतरता आढळते असा निष्कर्ष तेलंगणामध्ये रुग्णालयात केलेल्या संशोधनातून काढण्यात आला. क्युरियस या नियतकालीकात यासंदर्भातील संशोधन प्रकाशित झाले आहे. टीबी झालेल्या मुलांमध्ये ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता अधिक असून ती 10 नॅनोग्रामपेक्षा कमी असल्याचे संशोधकांना आढळले. तेलंगांमधील सिद्धीपेठ येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि उस्मानिया वैद्यकीय महाविद्यालयातील […]
महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये अमृत गटात हरित अच्छादन आणि जैवविविधता प्रकारात उच्चतम कामगिरीसाठी पिंपरी- चिंचवड महापालिका राज्यात अव्वल ठरली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापालिकेचा गौरव करण्यात आला. पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला . अमृत गटातील अव्वल क्रमांकासाठी आठ कोटी रुपये व प्रमाणपत्र आणि जैवविविधता प्रकारात […]