information
देव शहा हा मूळ भारतीय असणारा 14 वर्षीय विद्यार्थी अमेरिकेतील ‘स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी’ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अजिंक्य ठरला आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अतिशय कठीण शब्दांचे योग्य स्पेलिंग सांगणे अपेक्षित असते. फ्लोरीडा येथील शाळेत इयत्ता आठवीत शिकणाऱ्या देवने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सॅॅमोफाईलचे(psammophile) स्पेलिंग अचूक सांगून हे अजिंक्यपद पटकावले. यासाठी त्याला पन्नास हजार […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सीटी इन्व्हेस्टमेंट टू इनोव्हेट, इंटिग्रेट आणि सस्टेन 2.0 (सीटीज 2.0) या योजनेला मान्यता दिली आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सी (AFD), Kreditanstalt für Wiederaufbau (KfW), युरोपियन युनियन (EU), आणि राष्ट्रीय शहरी व्यवहार संस्था (NIUA) यांच्या भागीदारीतून सीटीज 2.0 ही योजना तयार केली आहे. हा उपक्रम […]
केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून सरस व्यंकट नारायण भट्टी यांनी शपथ घेतली केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी राजभवन सभागृहात मुख्य न्यायाधीशांना शपथ दिली. मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेण्यापूर्वी ते 24 एप्रिल पासून प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते.
दिघी येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या संशोधन आणि विकास आस्थापना या प्रयोगशाळेच्या संचालकपदी डॉक्टर मकरंद जोशी यांची नेमणूक करण्यात आली आहे. ‘हनी ट्रॅप’ प्रकरणात अटक केलेले डॉक्टर प्रदीप कुरुलकर यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली आहे. डॉक्टर कुरुलकर यांच्यावर पाकिस्तानला संरक्षण क्षेत्रातील गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप असून याप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने त्यांना अटक केली आहे. […]
भारताच्या जी 20 अध्यक्षपदाचा जनतेच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्यावर मुख्य भर देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला अनुसरून शिक्षण मंत्रालय विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करत आहे. एफएलएन अर्थात पायाभूत साक्षरता आणि मोजणीच्या ज्ञानाची ग्वाही या संकल्पनेला मिश्र शिक्षणाच्या संदर्भात चालना देणे आणि पाठबळ देणे हे या कार्यक्रमांच्या आयोजनामागचे उद्दिष्ट आहे. हे लक्ष्य […]
शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी भरपूर कॅल्शियम असलेले दूध अत्यंत महत्त्वाचे असते. दुधाचे हे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी 1 जून रोजी जागतिक दूध दिन साजरा केला जातो. डेअरी उद्योगाशी संबंधित क्रियाकलापांसाठी जागरूकता आणि समर्थनास प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा उद्देश आहे. जागतिक दूध दिनाचा इतिहास: दुग्ध उद्योग ओळखण्यासाठी आणि दुधाच्या फायद्यांबद्दल लोकांमध्ये जागरूकता […]
जगभरातील आर्थिक अस्थिरता, युक्रेन युद्ध, अशा आर्थिक आव्हानांवर मात करून भारतीय अर्थव्यवस्थेने सन 2022- 23 या आर्थिक वर्षात 2% विकासदर नोंदवला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहित विकासदर 2% होता . अर्थव्यवस्थेचा एकूण आकार 3.3 लाख कोटी डॉलर झाला असून भारत आशियातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता बनला आहे. कृषी, उत्पादन, बांधकाम ,सेवा आणि […]
राज्यातील दोन शहरांची नावे बदलल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याचा निर्णय घेतला. 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी चोंडी येथे जमलेल्या जनसमुदायासमोर अहमदनगर चे अहिल्यानगर नाव जाहीर करण्यात आले
चीनने 30 मे रोजी शेंझोऊ- 16 या अवकाशयानाचे यशस्वी प्रक्षेपण केले. चीनच्या अवकाशस्थानकाच्या दिशेने झेपावलेल्या या अवकाशयानात तीन अंतराळवीर असून त्यापैकी एक जण सामान्य नागरिक आहेत. पाच महिन्यांच्या मोहिमेसाठी एका सामान्य व्यक्तीला अवकाशात पाठविण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुई हैचाओ असे या व्यक्तीचे नाव असून ते बीजिंगमधील बेहांग विद्यापीठात प्राध्यापक आहेत. चीनच्या […]