information
देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त तसेच माजी केंद्रीय मंत्री मनोहर सिंह उर्फ एम .एस. गिल यांचे वयाचे 87 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. 1996 ते 2001 या कालावधीत गिल मुख्य निवडणूक आयुक्त होते. आयुक्त पदावरून निवृत्त झाल्यानंतर गिल हे काँग्रेस पक्षात सामील झाले त्यानंतर सलग दोन वेळा त्यांनी या पक्षातर्फ राज्यसभेत प्रतिनिधित्व केले […]
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांची संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे स्थायी दूत म्हणून नियुक्ती झाली आहे. बागची हे संयुक्त राष्ट्र आणि जिनिव्हातील अन्य आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये भारताचे कायम प्रतिनिधी असतील. ते सध्याचे अधिकारी इंद्रमनी पांडे यांची जागा घेतील. बागची 1995 च्या तुकडीचे भारतीय परराष्ट्र सेवेचा अधिकारी असून मार्च 2020 मध्ये प्रवक्ते पदी नियुक्ती झाली होती.
भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ असलेले क्रिकेटसह(20-20) बेसबॉल/ सॉफ्टबॉल फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस आणि स्क्वॅश या पाच खेळांचा 2018 च्या लॉस एंजिलस ऑलिंपिक स्पर्धेत समावेश करण्यात आला. मुंबईत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अधिवेशनात या निर्णयावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आले. या पाचही खेळांच्या समावेशासाठी लॉस एंजलिस 28 ऑलिंपिक संयोजन समितीने शिफारस केली होती. बेसबॉल […]
फिनलँडचे माजी पंतप्रधान आणि जागतिक शांततेसाठी 2008 या वर्षी नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरलेले मार्टि अहतासारी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. अहतासारी हे मागील दोन वर्षापासून स्मृतीभ्रंश या आजाराशी झुंज देत होते. सर्बिया आणि कोसोवो यांच्यातील संघर्ष थांबविण्यात आणि नामीबियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासह अनेक जागतिक संघर्ष थांबविण्यात अहतासारी यांनी मोलाचे योगदान दिले […]
धातूचे अधिक प्रमाण असलेल्या सायकी या लघुग्रहाच्या अभ्यासासाठी आखण्यात आलेल्या अमेरिकी अवकाश संशोधन संस्थेच्या म्हणजेच नासाच्या मोहिमेचे भारतीय प्रमाण वेळेनुसार 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजून 39 मिनिटांनी यशस्वी प्रक्षेपण झाले. या मोहिमेतून समोर येणाऱ्या माहितीच्या आधारे पृथ्वीसारख्या ग्रहांचा गाभा कसा तयार झाला याची माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे. फ्लोरिडा येथून स्पेस एक्स […]
कन्सर्न वर्ल्डवाइड ऑफ आयर्लंड आणि वेल्थयुन्गेरिल्फ या दोन संस्था मिळून दरवर्षी जागतिक भूक निर्देशांक अहवाल प्रसिद्ध करीत असतात. एखाद्या देशातील अन्नधान्याची उपलब्धता, पोषण-कुपोषण स्थिती इ. निकषांच्या आधारे नोंदवली जाणारा सन 2023 साठीचा जागतिक भूक निर्देशांक अहवाल जाहीर झाला असून, 125 देशांच्या यादीत भारताने 111 वे स्थान मिळवले आहे. 2022 या वर्षी 121 देशांच्या यादीत भारताचे […]
लष्करी कमांडर्स परिषदेला 16 ते 20 ऑक्टोबर 2023 दरम्यान नवी दिल्ली येथे प्रारंभ होणार आहे. सर्वोच्च स्तरावरील ही परिषद वर्षातून दोनदा होते. भारतीय लष्करासाठी महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय सुलभ करणे, वैचारिक पातळीवर विचारविनिमय करणे यासाठी हे एक संस्थात्मक व्यासपीठ आहे. या वर्षी स्वीकारलेल्या नवीन प्रारुपानुसार, आगामी लष्करी कमांडर्स परिषद मिश्र स्वरूपात आयोजित केली […]
प्रसिद्ध हॉलीवुड स्टार मायकेल डग्लस यांना चित्रपटसृष्टीतील असामान्य योगदानासाठी सत्यजित राय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार गोव्यातील 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांना प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली. हा चित्रपट महोत्सव 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे. आपल्या पाच दशकांच्या कारकीर्दीत […]
दरवर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो, हा एक जागतिक पातळीवरील जनजागृती कार्यक्रम आहे. त्यामागे अंधत्व आणि दृष्टि दोषाकडे लोकांचे लक्ष वेधणं, असा उद्देश आहे. 2000 मध्ये लायन्स क्लब इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या साइट फर्स्ट मोहिमेद्वारे हा दिवस सुरू करण्यात आला होता. यावर्षी (2023)12 ऑक्टोबर रोजी ‘जागतिक दृष्टी दिन’ साजरा केला जात आहे. लोकांमध्ये […]
जागतिक डिस्लेक्सिया दिन दरवर्षी 8 ऑक्टोबर रोजी पाळला जातो. डिस्लेक्सिया हा एक शिकण्यात अडचण असलेला सामान्य विकार आहे, हा विकार एखाद्या व्यक्तीच्या योग्यरितीने वाचण्याच्या आणि लिहिण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो. ज्यांना डिस्लेक्सिया आहे त्यांच्यासाठी अस्खलितपणे वाचन करणे आणि लिहिणे यासारखी कौशल्ये ही आव्हाने आहेत. डिस्लेक्सिया असलेल्या व्यक्ती अनेकदा अचूकपणे पटकन वाचू अथवा लिहू […]