भारतीय अर्थव्यस्थेतील कृषी स्टार्ट अप्स ची भूमिका अधोरेखित करून कृषिक्षेत्रात नवनवीन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी केले आहे.
केंद्रीय यांत्रिकी अभियांत्रिकी संशोधन संस्था, दुर्गापूर (CMERI),ने विकसित केलेल्या CSIR Prima ET11 या पहिल्या स्वदेशी ई ट्रॅक्टरचे डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते 21 ऑगस्ट रोजी अनावरण झाले.