Current Affairs
जपानची राजधानी टोकियो येथे 10 ते 17 जुलै 2023 या कालावधीत आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र(Physics) ऑलम्पियाड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेत 82 देशातील एकूण 387 विद्यार्थी सहभागी झाले होते. भारतीय संघातील पाच पैकी पाच विद्यार्थ्यांनी पदकांची कमाई केली आहे. भारताने तीन सुवर्ण व दोन रौप्य पदके जिंकली आहेत. देशनिहाय पदतालिकेत […]
आचार्य अत्रे यांचे 125 व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जन्म घ्यावी सासवड येथे यावर्षीचे (2023) आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन भरविण्यात येत आहे. 13 आणि 14 ऑगस्टला होणाऱ्या या 25 व्या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार साहित्यक आणि जडण-घडण मासिकाचे मुख्य संपादक डॉक्टर सागर देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनाचे उद्घाटन जेष्ठ शास्त्रज्ञ […]
गुन्हेगारीकडे अल्पवयीन मुलांचा वाढता कल चिंतेचा विषय ठरत असतानाच गेल्या काही महिन्यांपासून गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुले सामील असल्याचे लक्षात आल्यानंतर पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करण्यासाठी ऑपरेशन परिवर्तन मोहीम हाती घेतली आहे. गंभीर गुन्ह्यात सामील अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करण्यात येत आहे .त्यासाठी पोलिसांकडून स्वयंसेवी संस्थांचे सहाय्य घेण्यात आले असून अल्पवयीन मुलांच्या वयोगटांनुसार समुपदेशन करण्यास […]
लहान मुलांना सोप्या भाषेत गणित समजावून सांगण्यामध्ये हातखंड असलेल्या ज्येष्ठ गणितज्ञ आणि लेखिका डॉक्टर मंगला जयंत नारळीकर यांचे वयाच्या 80 व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या त्या पत्नी होत्या. मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च च्या गणित विद्यालयात आणि सहाय्यक संशोधक आणि नंतर […]
2016 ते 2023 या पाच आर्थिक वर्षात देशभरातील 5 कोटी नागरिक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर आले. आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानातील सुधारणा याद्वारे ही मोजणी करण्यात आली असून उत्तर प्रदेश ,बिहार आणि मध्य प्रदेश मध्ये सर्वाधिक घट नोंदविण्यात आली आहे. नीती आयोगाच्या अहवालात ही माहिती देण्यात आली. राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांकाच्या(एमपीआय) दुसऱ्या आवृत्तीनुसार 2015 -16 मध्ये भारतातील […]
भारत आणि संयुक्त अरब अमिरातीने(यूएई) व्यापारी व्यवहार स्थानिक चलनात करण्याचे ठरवले आहे . याशिवाय भारताची युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) आणि ‘यूएई’ची ‘इन्स्टंट’ पेमेंट प्लॅटफॉर्म (आयपीपी) या यंत्रणा एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन्ही देशांच्या मध्यवर्ती बँकांमध्ये करार करण्यात आले . पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख महंमद बीन झायेद अल नहयान यांच्यात […]
मराठी चित्रपटातील देखना नायक अशी ओळख असलेले प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. अल्पचरित्र:- देखणेपण आणि दमदार अभिनयाच्या बळावर अभिनेते रवींद्र महाजनी यांनी 1975 ते 1990 पर्यंतचा कालखंड गाजवला . बेळगाव येथे जन्म झालेले रवींद्र महाजनी हे जेष्ठ पत्रकार ह.रा .महाजन यांचे पुत्र होते. जाणता -अजाणता या नाटकातून रवींद्र महाजनी […]
महाराष्ट्रातील पहिले ‘पीएम -मित्र पार्क’ हे वस्त्रउद्योग उद्यान अमरावतीत उभारण्यात येणार असून त्याबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या वस्त्रोद्योग उद्यानाबाबत चार कंपन्यांनी राज्य सरकारशी 1,320 कोटींचे सामंजस्य करार केले. ‘पीएम मित्र पार्क’ केंद्राबाबत सामंजस्य करार करण्यात आल्यानंतर राज्यातील तरुणांना नोकऱ्या मिळतील, रोजगार निर्माण होणार आहे, राज्याची आर्थिक भरभराटही होईल […]
43 जवानांचा समावेश असलेली भारतीय लष्कराची तुकडी 16 जुलै रोजी मंगोलियाला रवाना झाली. हे दल द्विपक्षीय संयुक्त लष्करी कवायतींच्या “ नोमॅडिक एलिफंट-23” च्या 15 व्या सत्रात सहभागी होणार आहे. या कवायती 17 ते 31 जुलै 2023 या कालावधीत मंगोलियातील उलानबाटार येथे आयोजित केल्या जात आहेत. नोमॅडिक एलिफंट (NOMADIC LEPHANT) हा एक वार्षिक […]
स्पेनच्या कार्लोस अल्कराझने 23 ग्रँड स्लॅम विजेत्या सर्बिच्या नोव्हाक जोकोविचची विम्बल्डन स्पर्धेतील मक्तेदारी संपुष्टात आणली. अल्कराझने16 जुलै रोजी झालेल्या अंतिम लढतीत 1-6, 7-6, 6-1, 3-6, 6-4 असा विजय मिळवला . 20 वर्षीय अल्कराझचे हे कारकिर्दीतील पहिले विम्बल्डन आणि दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपट ठरले. गेल्या वर्षी ( 2022)मध्ये अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद […]