Current Affairs
जागतिक पातळीवर आतापर्यंत झालेल्या गुरुत्वीय लहरींच्या संशोधनाला दिशा देणारे नवे संशोधन समोर आले आहे. ब्रह्मांडातील अतिशय कमी वारंवारिता असलेल्या गुरुत्वीय लहरींच्या पार्श्वभूमीच्या शोध घेण्यात आला असून या संशोधनात भारतीय शास्त्रज्ञांचा सहभाग आहे . विश्वातील सर्वोत्तम घड्याळ मानल्या गेलेल्या पल्सार ताऱ्यांच्या तब्बल 25 वर्षांच्या नोंदीचे विश्लेषण करून महत्त्वपूर्ण निष्कर्ष हाती आले. लायगो वेध शाळेने शोधलेल्या गुरुत्वीय […]
भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी चांद्रयान-3 मोहिमेची तारीख निश्चित झाली असून 14 जुलै रोजी दुपारी 2:35 मिनिटांनी एलव्हीएम -3 या प्रक्षेपण यानातून हे या चंद्राकडे झेपावेल. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातील प्रक्षेपण तळावरून चांद्रयान -3 चे उड्डाण होईल. चांद्रयानाच्या सर्व चाचण्या झाल्या असून ‘लाँच व्हेईकल मार्क थ्री’ या प्रक्षेपण यानावर ते सिद्ध करण्यात आले […]
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जून रोजी राणी कमलापती रेल्वे स्थानकामधून पाच वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवला . ● यापैकी दोन रेल्वे मध्य प्रदेशात धावणार आहेत तर तीन रेल्वे गाड्या देशाच्या इतर भागातील शहरांना जोडणार आहेत. ● राणी कमलापती (भोपाळ)- जबलपूर वंदे भारत एक्सप्रेस, खजुराहो- भोपाळ- इंदूर वंदे भारत एक्सप्रेस, मडगाव (गोवा)- मुंबई […]
देशातील तंत्र शिक्षण क्षेत्रात अग्रणी असलेल्या मुंबई आयआयटीने ‘क्यूएस’ जागतिक विद्यापीठ मानांकनामध्ये प्रथमच पहिल्या 150 संस्थांमध्ये स्थान पटकावले आहे. आठ वर्षांपासून बेंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नंतर ही कामगिरी करणारे आयआयटी मुंबई ही देशातील पहिलीच संस्था ठरली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या क्यूएस जागतिक विद्यापीठ मानांकनामध्ये मुंबई आयआयटीने 23 स्थानांची झेप घेत 159 वे स्थान […]
इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ हा इजिप्तचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरव केला. इजिप्तसाठी किंवा मानवजातीसाठी अमूल्य काम करणाऱ्या देशांचे प्रमुख, युवराज आणि देशाचे उपाध्यक्ष यांना 1915 पासून हा सन्मान दिला जात आहे . पंतप्रधान मोदींना मिळालेला हा 13 वा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. सन्मानाचे […]
अमळनेर येथे होणाऱ्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार व कथाकार डॉक्टर रवींद्र शोभणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात 2 ते 4 फेब्रुवारी 2024 या कालावधीत हे संमेलन होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्राध्यापक उषा तांबे […]
प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी सांख्यिकी आणि आर्थिक नियोजन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन, भारत सरकारने दरवर्षी 29 जून हा त्यांच्या जयंतीदिनी “सांख्यिकी दिन” म्हणून साजरा करण्याचे ठरवले. उद्देश:- सामाजिक-आर्थिक नियोजन आणि धोरण निर्मितीमध्ये सांख्यिकीची भूमिका आणि महत्त्व याबद्दल महालनोबिस यांच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी विशेषतः तरुण पिढीमध्ये जनजागृती करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. थीम:- दरवर्षी, […]
साहित्य अकादमीने 2023 या वर्षासाठीचे युवा व बाल साहित्य पुरस्कार जाहीर केले असून यात महाराष्ट्रातील दोघांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे . यात एकनाथ आव्हाड यांना बाल साहित्यासाठी तर विशाखा विश्वनाथ यांना युवा साहित्य साठी साहित्य अकादमीने पुरस्कार जाहीर केला आहे. अकादमीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये मराठी भाषेसाठी युवा साहित्यासाठी विशाखा विश्वनाथ यांच्या ‘स्वतःला […]
गुंतवणुकीसाठी संशोधन आणि विश्लेषणासाठी विशेषतः गुंतवणूक पोर्टफोलिओ बांधणीसाठी संख्याशास्त्राचा प्रथम वापर करणारे हॅरी मॅक्स मार्कोविट्झ यांचे अमेरिकेत सॅन दिएगो येथे 22 जून रोजी वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. पुर्वनिश्चित परतावा मिळविण्यासाठी गुंतवणुकीतील जोखीम आणि परतावा यांचा समतोल साधावा लागतो आणि हे निश्चित करण्यासाठी संख्याशास्त्रातील संकल्पना वापरता येतात हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले. गुंतवणूक जगतात […]
दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ इंडिया (सीओबीआय) या महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी गुजरात राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अजयभाई पटेल यांची तर उपाध्यक्षपदी कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांची सर्व सहमतीने निवड करण्यात आली. ‘सीओबीआय’ ही देशातील सर्व सहकारी संस्था ,नागरी सहकारी बँक आणि सहकारी बँका यांची सर्वोच्च शिखर संस्था आहे […]