Current Affairs
कर्णधार सुनील छेत्री आणि लिल्लजुआला छांगते यांनी केलेल्या गोलच्या बळावर भारताने अंतिम सामन्यात लेबननला 2-0 असे नमवत इंटरकॉन्टिनेंटल चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
केंद्र सरकारतर्फे गांधी शांतता पुरस्कार उत्तर प्रदेशातील गीता प्रेस गोरखपूरला जाहीर झाला. अहिंसेच्या मार्गाने सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणल्याबद्दल गीता प्रेस गोरखपुर या संस्थेला 2021 या वर्षासाठीचा गांधी शांतता पुरस्कार घोषित करण्यात आला गीता प्रेस: स्थापना: 1923 जगातील सर्वांत मोठे प्रकाशक म्हणून ही संस्था ओळखली जाते. या संस्थेने 14 भाषांतील 41 कोटी 70 […]
कोलंबिया येथील मेडलीन या ठिकाणी सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्मा याने (स्टेज थ्री) प्रकारात सुवर्णपदक पटकावले. जागतिक स्पर्धेत अभिषेक वर्माची कामगीरी: अभिषेक वर्मा याने जागतिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पदकांची लई लूट केली आहे त्याने 2015 मध्ये पोलंड येथे झालेल्या जागतिक स्पर्धेमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर अभिषेक ला 2021 मध्ये पॅरिस येथे झालेल्या […]
चिराग शेट्टी आणि त्याचा सहकारी सात्विक साईराज रंकीरेड्डी यांनी इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरी गटाचे विजेतेपद पटकावले. सात्विक चिराग जोडीने अंतिम लढतीत जगजेत्या मलेशियाच्या आरोन चिया व सोह वुई यिक जोडीवर 21 -17, 21- 18 असा विजय साकारला. सात्विक चिरागचे हे कारकिर्दीतील पहिले ‘सुपर 1000’ विजेतेपद असून हा दर्जा असलेल्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी ही […]
गॅस अथॉरिटी ऑफ इंडियाच्या(GAIL- गेल) संचालकपदी (मार्केटिंग) संजय कुमार यांनी नियुक्ती झाली आहे. यापूर्वी संजय कुमार हे दिल्ली परिसराला गॅसपूरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक होते. संजय कुमार हे आयआयटी खरगपूरचे मेकॅनिकल इंजिनिअर आणि एमबीए असून त्यांना नैसर्गिक वायू क्षेत्रातील 35 वर्षांचा अनुभव आहे. 1988 या वर्षी ते ‘गेल’ मध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी […]
भारतात गुणात्मक शोधनिबंध सादर करण्याचे प्रमाण वाढले असून शोधनिबंधाच्या प्रकाशनात भारताने ब्रिटनला मागे टाकून जगात तिसरा क्रमांक पटकावला आहे. भारतीय शोधनिबंधांचे सायटेशन वाढले असून 2019 मध्ये 0.85 पर्यंत असलेले गुणांक 2021 मध्ये 1.05 पर्यंत वाढले आहे. हे गुणांक जागतिक सरासरीच्या पुढे आहे. शोधनिबंधात जगात अमेरिकेचा पहिला क्रमांक असून, चीन दुसऱ्या स्थानी आहे.
दिल्लीतील तीन मूर्ती भवनातील ‘नेहरू स्मृती संग्रहालय व ग्रंथालय चे नाव वगळण्यात आले असून पंतप्रधान संग्रहालय व ग्रंथालय असे नामांतर करण्यात आले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री व नेहरू संग्रहालयाच्या समितीचे उपाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत नेहरू समृद्धी संग्रहालय व ग्रंथालयाचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचे निवासस्थान राहिलेल्या तीन मूर्ती […]
नीती आयोग आणि युनायटेड नेशन्स इन इंडिया यांनी भारत सरकार – संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास सहकार्य आराखडा(GoI-UNSDCF 2023-2027) यावर 16 जून रोजी स्वाक्षरी केली. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुब्रह्मण्यम आणि संयुक्त राष्ट्रांचे भारतातील निवासी समन्वयक शोम्बी शार्प यांनी नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी,नीती आयोग, केंद्रीय मंत्रालयाचे वरिष्ठ प्रतिनिधी आणि भारतातील संयुक्त […]
लेखिका अरुंधती रॉय यांना 45 वा युरोपियन ऐसे प्राइज जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. हा पुरस्कार देणाऱ्या चार्ल्स व्हेलॉन फाउंडेशन या संस्थेने या संदर्भात घोषणा केली . अरुंधती रॉय यांच्या 2021 च्या ‘आझादी’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या निबंधांच्या फ्रेंच अनुवादासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या निबंधामध्ये त्यांनी वाढत्या एकाधिकारशीहीच्या जगामध्ये स्वातंत्र्याचा अर्थ शोधण्याचा […]
विविध संघर्षग्रस्त देशांत प्राणाची बाजी लावून लढा देताना हुतात्मा झालेल्या शांतता सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात एक स्मारक भिंत बनवण्यात येणार आहे. भारताने याविषयी मांडलेला प्रस्ताव संयुक्त राष्ट्राने 15 जून 2023 रोजी एकमताने मंजूर केला आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी यूएनजीएमध्ये ‘मेमोरियल वॉल फॉर फॉलन युनायटेड नेशन्स पीसकिपर्स’ नावाने […]