Current Affairs
जागतिक महासागर दिन जगभर 8 जून रोजी पाळला जातो. पार्श्वभूमी:- 2008 या सालापासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस अधिकृतरीत्या पाळण्याचे ठरविले. त्यापूर्वी 1982 या वर्षापासून कॅनडामध्ये तो साजरा होत असे. कॅनडास्थित आंतरराष्ट्रीय संस्था महासागरांच्या संरक्षणासाठी कार्यरत आहे, या संस्थेच्या पुढाकाराने सर्वप्रथम या दिवसाची सुरुवात झाली. वर्ल्ड ओशन नेटवर्क सारख्या विविध संस्था,मत्सयालये, प्राणिशास्त्र विषयात काम करीत असलेल्या […]
नेदरलँड मधील भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञ जॉयीता गुप्ता यांना प्रतिष्ठेचा स्पिनोझा पुरस्कार मिळाला आहे. नेदरलँड मध्ये विज्ञान क्षेत्रात दिला जाणार हा सर्वोच्च पुरस्कार आहे . पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जागेचा सुयोग्य वापर या विषयावर त्यांनी गेली काही वर्ष काम करत शास्त्रीय अहवाल तयार केला होता. गुप्ता यांना या पुरस्काराच्या रूपात 15 लाख युरो प्राप्त झाले असून ते संशोधनासाठी […]
‘मर्सर्स – 2023’ या संस्थेच्या राहणीमानाच्या खर्चाचा तुलनात्मक अभ्यासातून हॉंगकॉंग हे जगातील सर्वाधिक महागडे शहर ठरले आहे . या संस्थेने जगभरातील 227 शहरातील राहणीमानाच्या खर्चाचा अभ्यास केला त्यात भारतातून मुंबई हे देशातील सर्वात महागडे शहर ठरले आहे. परदेशातून मायदेशी परतलेल्यांसाठी राहणीमानाचा खर्च या दृष्टीने मुंबई देशातील सर्वात महागडे शहर आहे . याच निकषावर जगात मुंबईचा […]
दरवर्षी 8 जून रोजी जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस साजरा केला जातो. ब्रेन ट्यूमरबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि या ट्यूमरने प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी दरवर्षी 8 जून रोजी जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस साजरा केला जातो. ब्रेन ट्यूमरविरूद्धच्या लढ्यात जागरूकता वाढवणे, लक्षणे, वेळेवर उपचार आणि योग्य पाठपुरावा करणे महत्त्वाचे आहे. ब्रेन ट्यूमरबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि या […]
देशाची आघाडीची युद्धनौका ‘आयएनएस त्रिशूल’ तीन दिवसांच्या सद्भावना यात्रेसाठी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन बंदरावर डेरेदाखल झाली आहे. वंशद्वेषातून महात्मा गांधी यांना दक्षिण आफ्रिकेतील रेल्वे स्टेशनवर उतरविण्यात आल्याच्या घटनेला 130 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आणि भारत – दक्षिण आफ्रिका यांच्यातील संबंधांच्या त्रिदशकापूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेतील पीटरमॉर्रिटझबर्ग या स्टेशनवर 7 जून 1893 रोजी […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने (CCEA :-Cabinet Committee on Economic Affairs) 2021-22 ते 2025-26 या कालावधीत 2980 कोटी रुपयांच्या अंदाजित कोळसा आणि लिग्नाइट शोधासाठीची केंद्रीय क्षेत्र योजना 15 व्या वित्त आयोगाच्या चक्रासह सुरू ठेवण्यास मान्यता दिली. या योजनेअंतर्गत कोळसा आणि लिग्नाइटचे उत्खनन दोन व्यापक टप्प्यांमध्ये केले जाते: (1) […]
जागतिक तंबाखू दिनानिमित्त, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) 31 मे 2023 रोजी एनसीपीसीआर येथे “व्यसनमुक्त अमृत काळ” ही राष्ट्रीय मोहीम यशस्वीपणे सुरू केली. निरोगी आणि व्यसनमुक्त भारताला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरु केलेली ही मोहीम तंबाखू आणि अंमली पदार्थमुक्त राष्ट्र निर्माण करण्याच्या मोहिमेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. टोबॅको फ्री इंडिया या नागरिकांच्या समूहासोबत तांत्रिक भागीदारीच्या […]
मध्य पूर्व अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवाळाची निर्मिती झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले. येणाऱ्या दोन ते तीन दिवसात उत्तरेकडे सरकताना या वादळाची तीव्रता वाढत जाणार आहे. आग्नेय अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता 24 तासांमध्ये डिप्रेशन, डीप डिप्रेशनवरून चक्रीवादळापर्यंत पोहोचली. अरबी समुद्राचे तापमान सरासरी पेक्षा जास्त असल्याने वादळाला मोठी ऊर्जा मिळत आहे. […]
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपती डॉक्टर रवींद्र कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर सुरेश गोसावी आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर संजय भावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील दहा महिने ते वर्षभरापासून राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये पूर्ण वेळ कुलगुरू नसल्याने प्रभारी अधिकाऱ्यांद्वारे कामकाज सुरू होते .अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यातील विविध विद्यापीठांना पूर्ण […]
जागतिक अन्न सुरक्षा दिन (World Food Safety Day) दरवर्षी 7 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. उद्देश आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या अन्नाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभरात अन्न सुरक्षा दिन साजरा केला जातो. नागरिकांना दूषित अन्न आणि पाण्यामुळे होणाऱ्या हानीबाबत जागरूक करणे, हा एकमेव उद्देश यामागे आहे. इतिहास: सन 2017 मध्ये […]