Current Affairs
सार्वजनिक क्षेत्रातील युको बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अश्वनी कुमार यांची 1 जून पासून नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते इंडियन बँकेचे कार्यकारी संचालक होते. सनदी लेखापाल असणारे अश्वनी कुमार हे अनुभवी बँकर आहेत. त्यांनी यापूर्वी बँक ऑफ बडोदा ,कॉर्पोरेशन बँक, ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब नॅशनल बँक आणि इंडियन बँकेत काम केले […]
देव शहा हा मूळ भारतीय असणारा 14 वर्षीय विद्यार्थी अमेरिकेतील ‘स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी’ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अजिंक्य ठरला आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अतिशय कठीण शब्दांचे योग्य स्पेलिंग सांगणे अपेक्षित असते. फ्लोरीडा येथील शाळेत इयत्ता आठवीत शिकणाऱ्या देवने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सॅॅमोफाईलचे(psammophile) स्पेलिंग अचूक सांगून हे अजिंक्यपद पटकावले. यासाठी त्याला पन्नास हजार […]
जपानच्या मुख्य बेटांवर 2 जून रोजी उष्णकटिबंधीय वादळ मावर धडकले. या वादळामुळे पडलेल्या मुसळधार पावसाने रेल्वेसह वाहतूक ठप्प झाली. जपानच्या दक्षिण आणि पश्चिम प्रांतांत पुराचा आणि दलदलीचा धोका निर्माण झाला आहे. जपानच्या पश्चिमेकडील वाकायामा, कोची आणि मध्य जपान मधील नागानो यासह पुराचा धोका असलेल्या सखल भागातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. मवार हे गेल्या वीस […]
‘जीएसआय’च्या महासंचालकपदी जनार्दन प्रसाद यांची नियुक्ती जनार्दन प्रसाद यांची भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण विभागाच्या (जीएसआय – Geological Survey of India) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसाद यांनी 1 जून रोजी महासंचालकपदाचा पदभार स्वीकारला. डॉ. एस राजू यांच्या जागी प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजू यांनी 2020 मध्ये पदभार स्वीकारला होता. प्रसाद यांनी भूगर्भशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी […]
विश्व सायकल दिवस हा एक जागतिक दिवस आहे. दुचाकी सायकल ही वापरण्यास आणि विकत घेण्यास सोपी आणि स्वस्त असा वाहन पर्याय आहे. त्यामुळे सर्वाँना सामावून घेणारे जागतिक स्तरावरील वाहन म्हणून 3 जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो महत्व: समाजातील कोणत्याही स्तरातील व्यक्तींना सायकल चालविण्याचा आनंद घेता यावा यासाठी […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सीटी इन्व्हेस्टमेंट टू इनोव्हेट, इंटिग्रेट आणि सस्टेन 2.0 (सीटीज 2.0) या योजनेला मान्यता दिली आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सी (AFD), Kreditanstalt für Wiederaufbau (KfW), युरोपियन युनियन (EU), आणि राष्ट्रीय शहरी व्यवहार संस्था (NIUA) यांच्या भागीदारीतून सीटीज 2.0 ही योजना तयार केली आहे. हा उपक्रम […]
केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून सरस व्यंकट नारायण भट्टी यांनी शपथ घेतली केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी राजभवन सभागृहात मुख्य न्यायाधीशांना शपथ दिली. मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेण्यापूर्वी ते 24 एप्रिल पासून प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते.
भारताच्या जी 20 अध्यक्षपदाचा जनतेच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्यावर मुख्य भर देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला अनुसरून शिक्षण मंत्रालय विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करत आहे. एफएलएन अर्थात पायाभूत साक्षरता आणि मोजणीच्या ज्ञानाची ग्वाही या संकल्पनेला मिश्र शिक्षणाच्या संदर्भात चालना देणे आणि पाठबळ देणे हे या कार्यक्रमांच्या आयोजनामागचे उद्दिष्ट आहे. हे लक्ष्य […]
दिघी येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या संशोधन आणि विकास आस्थापना या प्रयोगशाळेच्या संचालकपदी डॉक्टर मकरंद जोशी यांची नेमणूक करण्यात आली आहे. ‘हनी ट्रॅप’ प्रकरणात अटक केलेले डॉक्टर प्रदीप कुरुलकर यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली आहे. डॉक्टर कुरुलकर यांच्यावर पाकिस्तानला संरक्षण क्षेत्रातील गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप असून याप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने त्यांना अटक केली आहे. […]