Current Affairs
‘कोरोना’ (कोविड – 19) आता जागतिक आणीबाणी राहिली नाही असा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिला आहे. 30 जानेवारी 2020 रोजी कोविडला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आले होते. WHO :- World Health Org. (जागतिक आरोग्य संघटना) जागतिक आरोग्य संघटना ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात सुसंवादाचे कार्य करणारी संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जुलै रोजी फ्रान्सची राजधानी पॅरिस मध्ये होणाऱ्या ‘बॅस्टील डे’ संचलनासाठी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार या संचलनात भारतीय सशस्त्र दलातील एक पथकही सहभाग होणार आहे. हा फ्रान्सचा राष्ट्रीय दिन असून त्याला ‘बॅस्टील डे’ असेही म्हणतात. तो दरवर्षी 14 जुलै रोजी साजरा केला जातो. […]
महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळाच्या वतीने यावर्षीपासून (2023) मधमाश्यांचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्यस्तरीय ‘मधुमित्र पुरस्कारा’ने गौरविण्यात येणार आहे. महाराष्ट्रात मधमाश्या पालनासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार सुरू करण्यात येत आहे. पुरस्कार सुरू करण्यामागचा मुख्य हेतू: राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मधमाश्यापालनाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्रात मधमाश्या पालनाला खूप मोठा वाव […]
प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रमोद चौधरी यांना भारतीय अभियांत्रिकी परिषदेचा इंजिनिअरिंग कौन्सिल ऑफ इंडिया उद्योग श्रेणीतील प्रख्यात अभियंता पुरस्काराने (एमिनेन्ट इंजिनिअर अवॉर्ड) सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे डॉ. चौधरी यांना नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. सारस्वत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय अभियांत्रिकी परिषद ही अभियांत्रिकी व्यवसायाची सर्वोच्च संस्था […]
मणिपूरमध्ये 53 % लोकसंख्या असलेल्या मैतेई समाजाला अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) आरक्षण लागू करण्याच्या हालचालींच्या विरोधात हिंसाचार उफाळला आहे. आदिवासी समाज आणि बहुसंख्य मैतेई समाजामध्ये हिंसक चकमक उडत असल्याने दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश मणिपूर राज्य सरकारने दिले आहेत. मैतेई समाजाला अनुसूचित जमातींचे आरक्षण देण्याच्या मागणी प्रकरणी केंद्र सरकारने शिफारशी सादर कराव्यात असा आदेश मणिपूर […]
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्यामध्ये (पीएमएलए) बदल अधिसूचित केला असून, त्यानुसार आता सनदी लेखापाल (सीए), कंपनी सचिव (सीएस) तसेच कॉस्ट अँड अकाउंटंट (सीडब्लूए) यांना कायद्याच्या कक्षेत आणले आहे. 3 मे रोजी काढण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, सीए, […]
इराणी महिलांच्या स्वातंत्र्याची मशाल धगधगत ठेवणाऱ्या निलूफर हमेदी, इलाही मोहम्मदी आणि नर्गेस मोहम्मदी या तीन पत्रकारांना संयुक्तपणे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनी(2 मे) संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेतर्फे (युनेस्को) ‘जिलेर्मो कानो पुरस्कार’ जाहीर झाला आहे. तीन पत्रकारांचा थोडक्यात आढावा: 1)निलूफर हमेदी :- माशा अमिनी हिचा कोठडीत मृत्यू झाल्याच्या ज्या बातमीने इराणमध्ये आंदोलन सुरू झाले, […]
मानवाधिकार्यांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या लघुपट स्पर्धेत राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने मराठी लघुपट ‘चिरभोग’ ची प्रथम पारितोषकासाठी निवड केली आहे . असामी भाषेतील ‘सक्षम’ ला द्वितीय तर तमिळ भाषेतील ‘अचम थाविर’ ला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. लघुपट चित्रपटांच्या माध्यमातून मानवी हक्क संवर्धनाच्या सर्जनशील प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी मानव अधिकार आयोगातर्फे मानवाधिकार आयोग लघुपट पुरस्कार स्पर्धा […]
भारतीय वंशाचे अजय बंगा यांची जागतिक बँकेचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे पद भूषविणारे बंगा हे भारतीय वंशाचे पहिलेच व्यक्ती ठरणार आहेत. बंगा यांचा कार्यकाळ 2 जून 2023 पासून सुरू होणार असून, ते पाच वर्षे या पदावर राहतील. अजय सिंह बंगा : जन्म : 10 नोव्हेंबर 1959, पुणे त्यांचे कुटुंब मूळचे पंजाब […]
जागतिक प्रसार माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारताचे मागच्या वर्षीपेक्षा तब्बल 11 क्रमांकाने घसरन झाली आहे. जगातील 180 देशांमध्ये भारताचा क्रमांक 161 इतक्या तळाला गेला आहे तर शेजारी देश पाकिस्तानात प्रसारमाध्यमांना मिळणाऱ्या स्वतंत्र्यामध्ये थोडी सुधारणा होऊन त्यांचे स्थान 7 अंकांनी वर गेले आहे. पाकिस्तान या यादीमध्ये 150 व्या क्रमांकावर आहे. जगभरातील प्रसारमाध्यमावर लक्ष ठेवणाऱ्या रिपोर्ट्स विदाऊट बॉर्डर्स(आरएसएफ) […]