Current Affairs
साहित्य अकादमीने 2023 या वर्षासाठीचे युवा व बाल साहित्य पुरस्कार जाहीर केले असून यात महाराष्ट्रातील दोघांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे . यात एकनाथ आव्हाड यांना बाल साहित्यासाठी तर विशाखा विश्वनाथ यांना युवा साहित्य साठी साहित्य अकादमीने पुरस्कार जाहीर केला आहे. अकादमीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये मराठी भाषेसाठी युवा साहित्यासाठी विशाखा विश्वनाथ यांच्या ‘स्वतःला […]
गुंतवणुकीसाठी संशोधन आणि विश्लेषणासाठी विशेषतः गुंतवणूक पोर्टफोलिओ बांधणीसाठी संख्याशास्त्राचा प्रथम वापर करणारे हॅरी मॅक्स मार्कोविट्झ यांचे अमेरिकेत सॅन दिएगो येथे 22 जून रोजी वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. पुर्वनिश्चित परतावा मिळविण्यासाठी गुंतवणुकीतील जोखीम आणि परतावा यांचा समतोल साधावा लागतो आणि हे निश्चित करण्यासाठी संख्याशास्त्रातील संकल्पना वापरता येतात हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले. गुंतवणूक जगतात […]
दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ इंडिया (सीओबीआय) या महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी गुजरात राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अजयभाई पटेल यांची तर उपाध्यक्षपदी कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांची सर्व सहमतीने निवड करण्यात आली. ‘सीओबीआय’ ही देशातील सर्व सहकारी संस्था ,नागरी सहकारी बँक आणि सहकारी बँका यांची सर्वोच्च शिखर संस्था आहे […]
स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक स्वामीनाथन जानकीरामन यांची रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असेल . कॅबिनेट सचीवांच्या अध्यक्षतेखालील समितीने 1 जून रोजी या पदासाठी उमेदवार निश्चिती केली होती . सध्याचे डेप्युटी गव्हर्नर एम. के. जैन यांची वाढीव मुदतही पूर्ण झाली त्यांची जागा जानकीरामन हे घेतील. रिझर्व बँकेत एकूण […]
( पंजाब विधानसभेत दुरुस्ती विधेयक मंजूर) राज्य सरकार मार्फत संचलित होणाऱ्या विद्यापीठांचे प्रमुखपद म्हणजेच कुलपती पद राज्यपाल ऐवजी मुख्यमंत्र्यांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. पंजाब विधानसभेत विधेयक मंजूर करण्यात आले. राज्य सरकारने काही विद्यापीठांच्या कुलगुरू पदासाठी सुचविलेल्या नावावरून सरकार व राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यात मतभेद झाले होते. या पार्श्वभूमीवर पंजाब […]
पर्यटन क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाढवितानाच त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित करण्यास आणि महिलांच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणारे “आई” महिला केंद्रित पर्यटक धोरण सरकारने जाहीर केले. यामध्ये उद्योजक महिलांच्या कर्जावरील व्याजात सवलत देण्याबरोबरच पर्यटक महिलांसाठी पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्ट मध्ये वर्षातील 30 दिवस 50% सवलत असून महामंडळाचे छत्रपती संभाजी नगर येथील पर्यटन निवास महिलाच चालवतील अशी घोषणा करण्यात […]
दक्षिण आशियाई फुटबॉल संघटने कडून आयोजित करण्यात येणारी सॅफ या फुटबॉल स्पर्धेला आजपासून भारतात बेंगळुरू या ठिकाणी सुरुवात होत आहे. भारताने सर्वाधिक आठ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.
21 जून हा दिवस जागतिक संगीत दिन म्हणूनही साजरा केला जातो पार्श्वभूमी:- सर्वांत प्रथम जागतिक संगीत दिनाची सुरूवात फ्रान्समध्ये झाली. फ्रान्समध्ये या दिनाला ‘फेटे डेला म्युसिक्यू’ या नावाने देखील ओळखले जाते. 21 जून 1982 रोजी प्रथम जागतिक संगीत दिवस साजरा करण्यात आला. फ्रान्समधील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मॉरीश फ्लेरेट यांनी तेथील सांस्कृतिक विभागासाठी या दिनाची सुरुवात […]
आंतरराष्ट्रीय योग दिन हा दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 175 देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा […]
गुप्तचर क्षेत्रात दमदार कामगिरीमुळे दबदबा निर्माण केलेले जेष्ठ आयपीएस अधिकारी रवी सिन्हा यांची रिसर्च ऍनालिसिस विंग चे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. शेजारी देशांसोबतच्या घडामोडींचे सिन्हा हे तज्ञ समजले जातात. रॉ भारताची देशाबाहेर काम करणारी गुप्तचर संस्था आहे . ‘रॉ ‘चे विद्यमान प्रमुख सामंत गोयल यांचा कार्यकाळ 30 जून रोजी पूर्ण होत असून त्यानंतर […]