Current Affairs
LSAM 9 (यार्ड 77) हा तिसरा एमसीए बार्ज, नौदलाच्या सेवेत दाखल |LSAM 9 (Yard 77), the third MCA barge, entered service with the Navy
- 21/09/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
तिसरा मिसाइल आणि दारुगोळा (MCA) बार्ज, यार्ड 77 (LSAM 9) 22 सप्टेंबर 2023 रोजी, युद्धनौका उत्पादन अधीक्षक (विशाखापट्टणम) कमोडोर जी. रवी यांच्या हस्ते गुट्टेनादेवी, पूर्व गोदावरी, आंध्र प्रदेश (M/s SECON चे प्रक्षेपण स्थळ) येथे नौदलाच्या सेवेत तैनात करण्यात आला.
स्वदेशी बनावटीच्या सर्व प्रमुख आणि सहाय्यक उपकरणांनी आणि प्रणालींनी युक्त हा बार्ज, संरक्षण मंत्रालयाच्या “मेक इन इंडिया” उपक्रमांचा गौरवशाली ध्वजवाहक आहे.
केंद्र सरकारच्या “आत्मनिर्भर भारत” उपक्रमांच्या अनुषंगाने 08 x क्षेपणास्त्र आणि दारुगोळा (MCA) बार्जच्या बांधकाम आणि वितरणासाठी मेसर्स सेकॉन इंजिनीअरिंग प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, विशाखापट्टणम सोबत करार करण्यात आला होता.
एमएसएमई शिपयार्डने 18 जुलै 2023 रोजी पहिला एमसीए बार्ज वितरित केला आहे.आणि 18 ऑगस्ट 2023 रोजी दुसऱ्या बार्जचे उदघाटन केले.
इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग (IRS) च्या वर्गीकरण नियमांनुसार या बार्जचा 30 वर्षांचा सेवा काळ असेल.
एमसीए बार्जच्या उपलब्धतेमुळे जेटींच्या बाजूने आणि बाह्य बंदरांवर भारतीय नौदलाच्या जहाजांना वाहतूक, वस्तू / दारूगोळा उतरवणे सुलभ होईल आणि भारतीय नौदलाच्या मोहिमांप्रति वचनबद्धतेला चालना मिळेल.