August 2024 Archives | The Officer

अवनी लेखराचा पुन्हा सुवर्णवेध
अवनी लेखराचा पुन्हा सुवर्णवेध

अवनी लेखराने पॅरिसच्या पॅरालिंपिक  स्पर्धेत भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकले.

दहा मीटर एअर रायफल च्या एसएचवन गटात 6 गुणांच्या विक्रमासह सोनेरी यश संपादन केले.

पॅरालिंपिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक राखणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली.

तीन वर्षांपूर्वी अवनीने टोकियो पॅरारलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते.

या स्पर्धेत नेमबाजी या क्रीडा प्रकारात अवनी लेखराबरोबरच मोना अग्रवालने कांस्यपदक तर मनीष नरवालने रोप्य पदक जिंकले.

महिलांच्या शंभर मीटर शर्यतीत प्रीती पालने कांस्यपदक पटकावले. पॅरिस पॅरालिंपिक स्पर्धेत अथलेटिक्स क्रीडा प्रकारातील हे भारताचे पहिले पदक ठरले.

माजी जलतरणपटू अविनाश सारंग यांचे निधन

भारताचे माजी अव्वल जलतरणपटू अविनाश सारंग यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले.

बँकॉक आशियाई  क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक विजेत्या भारतीय वॉटरपोलो संघाचे ते सदस्य होते.

फ्रीस्टाइल आणि बटरफ्लाय प्रकारातही ते उत्तम जलतरणपटू होते.

शासनाने त्यांचा शिवछत्रपती आणि महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान केला होता.

सारंग यांना अर्जुन क्रीडा पुरस्कारही मिळाला होता.

सारंग यांनी 28 ऑगस्ट 1974 मध्ये पहिलाच प्रयत्न इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा मानही मिळवला होता.

निवृत्तीनंतर त्यांनी वॉटरपोलो पंच म्हणूनही काम पाहिले .

‘एनएडीपी‘- हार्वर्ड बिझनेस पब्लिशिंगमध्ये करार

नागपूर येथील राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी आणि हार्वर्ड बिझनेस पब्लिशिंग यांनी परस्परांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे या अकादमीतील व्याख्यात्यांना हार्वर्ड बिझनेस पब्लिशिंगचे ‘केस स्टडी’ उपलब्ध होऊ शकणार असून शिकवण्याचे कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे भारतातील संरक्षण उत्पादन वाढणे अपेक्षित आहे.

राष्ट्रीय संरक्षण अकादमी 1978 ला स्थापन करण्यात आली.

ती पूर्वी आयुध निर्माण स्टॉफ कॉलेज म्हणून ओळखली जायची.

या अकादमीमध्ये संरक्षण खात्यातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते.

याद्वारे आयुध निर्माणी सेवा अधिकाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देऊन भारतातील संरक्षण उत्पादनांचा दर्जा वाढवून त्यात वाढ करण्याचे प्रयत्न केले जातात.

हार्वर्ड बिझनेस पब्लिशिंग ही ना-नफा, ना-तोटा या तत्त्वावर चालणारी संस्था आहे.

ही संस्था हार्वर्ड बिझनेस स्कूलशी संलग्नित आहे.

भविष्यात अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या अधिकाऱ्यांना हार्वर्ड बिझनेस पब्लिशिंगचे परवाने उपलब्ध होऊ शकतील.

अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते  सातव्या राष्ट्रीय पोषण माह 2024 चा शुभारंभ

गुजरातमध्ये गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथून  सातव्या राष्ट्रीय पोषण महिन्याचा शुभारंभ करण्यात आला.

देशभरात पोषण विषयक जागरुकता आणि लोककल्याण यांना चालना देण्यावर केंद्रीत असलेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, गुजरात सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्री भानुबेन बाबरिया, तसेच भारत सरकार आणि गुजरात राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

“एक पेड माँ के नाम” अंतर्गत देशव्यापी वृक्षारोपण मोहिमेने या दिवसाची सुरुवात झाली.

केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी, गुजरातच्या महिला आणि बाल विकास मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या मोहिमेचे नेतृत्व केले आणि गांधीनगर येथील अंगणवाडी केंद्रात पोषण आणि पर्यावरणीय शाश्वततेचे महत्त्व दर्शवणाऱ्या फळझाडांच्या रोपांची लागवड केली.

सातव्या राष्ट्रीय पोषण माह 2024 मध्ये रक्तक्षय (ॲनिमिया), ग्रोथ मॉनिटरिंग, पूरक आहार, पोषण भी पढाई भी, उत्तम प्रशासनासाठी तंत्रज्ञान आणि एक पेड माँ के नाम या संकल्पनांवर लक्ष केंद्रित केले जाईल.

1 ते 30 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण माह चे आयोजन करण्यात आले.

राष्ट्रीय पोषण कार्यक्रमाला 2018 मध्ये सुरवात करण्यात आली होती

राष्ट्रीय पोषण कार्यक्रम सरकारने देशातील नागरिकांना कुपोषण मुक्त करण्यासाठी सुरू केला आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये दारिद्र्यामुळे लोकांना पुरेसे व पोषक भोजन मिळत नाही. अशा कुटूंबामध्ये एखाद्या गर्भवती महिलेबरोबरच नवजात शिशुंवरही याचा प्रतिकूल परिणाम होतो.

एका अहवालानुसार आज देशातील जवळपास प्रत्येक तिसरे मूल कुपोषित आहे. देशातील ही परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने राष्ट्रीय पोषण अभियान (National Nutrition Programme) सुरू केले आहे.

The post अवनी लेखराचा पुन्हा सुवर्णवेध appeared first on The Officer.

पुण्यात पहिले ‘कौशल्य विकास केंद्र’
आयएनएस अरिघात

विशाखापट्टणम येथे एका कार्यक्रमात देशाची दुसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी  ‘आयएनएस अरिघात’ नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे.

आयएनएस अरिघात कार्यान्वित झाल्यामुळे, भारताकडे आता दोन कार्यरत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडया आहेत.

नौदलाच्या शस्त्रागारात आधीच आयएनएस अरिहंत आहे, जी ऑगस्ट 2016पासून कार्यान्वित आहे.

आयएनएस अरिघात

नवीन पाणबुडीला प्राचीन संस्कृत शब्द ‘अरिघात’ असे नाव देण्यात आले आहे; ज्याचा अर्थ ‘शत्रूंचा नाश करणारा’ असा होतो.

पाणबुडी आपल्या सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

ही अरिहंतनंतरची दुसरी आण्विक पाणबुडी आहे.

विशाखापट्टणममधील शिप बिल्डिंग सेंटर (एसबीसी) येथे 2017 पासून या पाणबुडीचे बांधकाम सुरू होते.

आयएनएस अरिघात या पाणबुडीचे विस्थापन सहा हजार टन आहे आणि लांबी 113 मीटर आहे.

आयएनएस अरिघातच्या आत अणुभट्टी बसविण्यात आली आहे, ज्यामुळे या पाणबुडीला वेग मिळतो.

ही पाणबुडी पृष्ठभागावर जास्तीत जास्त 12-15नॉट्स (22-28किमी/तास) आणि पाण्याखाली गेल्यावर 24 नॉट्स (44 किमी/तास) वेग देऊ शकते.

अरिघातमध्ये दुहेरी हुल, बॅलास्ट टँक, दोन सहाय्यक इंजिन आणि आणीबाणीच्या परिस्थितीसाठी शक्ती आणि गतिशीलता नियंत्रणात आणण्यासाठी थ्रस्टरदेखील बसवण्यात आले आहे.

आयएनएस अरिहंतप्रमाणे यातदेखील 3,500 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंतची रेंज असलेले चार अणु-सक्षम एसएलबीएम (पाणबुडीने प्रक्षेपित बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे) किंवा 750 किलोमीटर अंतरापर्यंतची रेंज असणारे 12 के-15 एसएलबीएम वाहून नेण्याची क्षमता आहे.

याव्यतिरिक्त, आयएनएस अरिघात टॉर्पेडोनेदेखील (पाण्याखालील सिगारच्या आकाराचे रॉकेट) सज्ज असेल.

“आयएनएस अरिघात ही आयएनएस अरिहंतच्याच आकाराची, लांबीची आणि विस्थापनाची आहे.

या पाणबुडीत अधिक के-15 क्षेपणास्त्रे वाहून नेली जाऊ शकतात.

नवीन पाणबुडी अधिक सक्षम आहे.” बऱ्याच तज्ज्ञांनी नोंदवले आहे की, आयएनएस अरिघातला गेम चेंजर ठरवणारी गोष्ट म्हणजे त्याची गुप्त क्षमता. प्रगत सोनार प्रणाली आणि अत्याधुनिक स्टेल्थ तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली आयएनएस अरिघात समुद्राच्या पृष्ठभागाखाली लपून, कोणत्याही धोक्याला जलद आणि निर्णायकपणे प्रतिसाद देण्यास सक्षम आहे

पाणबुडीविरोधी युद्धापासून ते गुप्तचर माहिती गोळा करणे आणि विशेष ऑपरेशन्सपर्यंत विविध मोहिमा राबविण्याची क्षमता आयएनएस अरिघातमध्ये आहे; ज्यामुळे प्रादेशिक स्थिरता आणि सुरक्षिततेला हातभार लागतो.

पुण्यात पहिले ‘कौशल्य विकास केंद्र‘

जगभरातील विकसित देशांना सध्या कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.

हे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून, या अंतर्गत राज्यातील राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे (एनएसडीसी) पहिले ‘महाराष्ट्र कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र’ पुण्यात उभारण्यात आले आहे.

दहावी-बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना ब्युटी अँड वेलनेस, हॉस्पिटॅलिटी, मशिन ऑपरेटर्स, हेल्थ केअर, परदेशी भाषा अशा विषयाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण केंद्रात दिले जाणार आहे.

मॉडेल कॉलनीतील शासकीय दूरशिक्षण तंत्रनिकेतनच्या जागेत हे केंद्र  उभारण्यात आले आहे एनएसडीसी  तर्फे देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे यासाठी प्रशिक्षण दिले जाते. त्यानुसार राज्यातील पहिले प्रशिक्षण केंद्र पुणे या ठिकाणी उभारण्यात आले आहेत.

विविध देशांमध्ये आवश्यक असणाऱ्या कुशल मनुष्यबळा संदर्भातील मागणी एनएसडीसीकडे येते संबंधित देशाच्या मागणीनुसार एनएसडीसी प्रशिक्षण कार्यक्रम राबविते त्यात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित देशात नोकरी उपलब्ध करून दिली जाते.

या प्रकारे आतापर्यंत 60,000 विद्यार्थ्यांना नोकरी मिळाल्याची माहिती एनएसडीसी च्या वतीने सांगण्यात आले.

महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन 31 ऑगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे

एअर मार्शल डेंझील किलोर यांचे निधन

भारत पाकिस्तान यांच्यातील 1965 च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारे एअरमार्शल डेझींल किलोर यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले.

त्यांनी पाकिस्तानचे सेबर विमान पाडण्याची मोलाच्या कामगिरी बजावली होती .

1965 च्या युद्धात वीर चक्र मिळवलेल्या किलोर यांचे गुरुग्राम येथे निधन झाले.

1933 मध्ये डिसेंबर महिन्यात लखनऊ येथे त्यांचा जन्म झाला होता.

ते ट्रेव्हर किलोर हे फायटर पायलट बंधू म्हणून ओळखले जाऊ लागले.

ट्रेवर किलोर हे स्वतंत्र भारतातील एअर किल करणारे हवाई दलातील पहिले वैमानिक होते.

1965 च्या युद्धात त्यांनीही सेबर विमान पाडले होते.

डेंझील किलोर यांनी 1971 मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धातही शौर्य गाजवले.

The post पुण्यात पहिले ‘कौशल्य विकास केंद्र’ appeared first on The Officer.

‘जनधन’ योजनेला दहा वर्षे पूर्ण
राष्ट्रीय क्रीडा दिन

2012 पासून, दरवर्षी 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी महान खेळाडू ध्यानचंद यांचा जन्म झाला होता.

मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हटले जाते.

आपल्या 22 वर्षांच्या कारकिर्दीत 400 हून अधिक गोल करणाऱ्या या महान खेळाडूच्या स्मरणार्थ भारत सरकारने 2012 पासून त्यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्याची घोषणा केली होती.

1956 मध्ये त्यांना देशाचा तिसरा सर्वोच्च सन्मान पद्मभूषण देण्यात आला होता.

हा दिवस महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती आहे. त्यांचा जन्म 1905 मध्ये अलाहाबादच्या राजपूत कुटुंबात झाला होता.

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ध्यानचंद सैन्यात दाखल झाले आणि सैन्यातच हॉकी खेळू लागले.

हॉकीच्या जादूगाराने देशाला अनेक नाव मिळवून दिले.

ध्यानचंद हे 1928, 1932 आणि 1936 च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा भाग होते. 22 वर्षांच्या कारकिर्दीत  400 हून अधिक गोल केले.

क्रीडा दिनाचे महत्त्व

दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिनी, भारताचे राष्ट्रपती अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार यांसारखे क्रीडा संबंधित सर्व पुरस्कार प्रदान करतात ज्यांनी त्यांच्या संबंधित खेळांमध्ये देशाला अभिमान मिळवून दिला आहे.

2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेली खेलो इंडिया चळवळ ही गेल्या काही वर्षांत सरकारने या दिवशी सुरू केलेल्या क्रीडा उपक्रमांपैकी एक आहे.

या दिवशी देशभरात विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. अनेक महाविद्यालये, शाळा आणि कार्यालये या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन चर्चासत्रे आणि खेळांचे आयोजन करतात.

रेल्वे बोर्डाच्या सीईओपदी प्रथमच दलित अधिकारी

भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून रेल्वे मंत्रालयाने सतीशकुमार यांची नियुक्ती केली.

सतीशकुमार हे रेल्वे बोर्डाच्या 119 वर्षांच्या इतिहासातील अध्यक्षपदी विराजमान होणारे पहिले दलित अधिकारी आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (एसीसी) सतीशकुमार यांच्या रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्तीला हिरवा कंदील दाखविला.

रेल्वेमध्ये तीन दशकांहून अधिक काळ सेवेचा त्यांना अनुभव आहे.

याआधी सतीशकुमार यांनी रेल्वे महाव्यवस्थापक व अनेक उच्च पदांवर काम केले आहे. सतीशकुमार आता रेल्वे  बोर्डाच्या विद्यमान सीईओ जया वर्मा सिन्हा यांची जागा घेतील.

वर्षभरापूर्वी रेल्वे बोर्डाच्या सीईओ बनणाऱ्या सिन्हा या पहिल्या महिला ठरल्या होत्या.त्या 31 रोजी ऑगस्ट निवृत्त होत आहेत.

सतीशकुमार यांची नियुक्ती रविवारपासून (एक सप्टेंबर) किंवा त्यानंतर रुजू झाल्यापासून त्यांच्या निवृत्तीपर्यंत असेल.

सतीशकुमार यांनी दाट धुक्यात मार्गक्रमण करताना रेल्वेगाड्यांना सुरक्षित ठेवणाऱ्या उपकरणांवर केलेले काम लक्षणीय आहे.

या उपकरणांमुळे हिवाळ्याच्या महिन्यांत विशेषतः उत्तर-मध्य भारतात रेल्वे गाड्यांना धुक्यामुळे निर्माण होणारे धोके लक्षणीयरीत्या कमी होतात.

सतीशकुमार हे 1986 च्या तुकडीचे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनीअर्स (आयआरएसएमई) अधिकारी आहेत.

‘जनधन‘ योजनेला दहा वर्षे पूर्ण

जगभरातील सर्वांत मोठी सर्वसमावेशक आर्थिक योजना असा नावलौकिक प्राप्त केलेल्या प्रधानमंत्री जनधन योजनेला 28 ऑगस्ट 2024 रोजी दहा वर्षे पूर्ण झाली आहेत.

‘या योजनेद्वारे असंघटित कामगार, महिला, ग्रामीण भागांतील बँकिंग व्यवस्थेत न येऊ शकलेले अशा सर्वांना देशाच्या मुख्य आर्थिक प्रवाहात आणले गेले.

‘पीएमजेडीवाय’ या संक्षिप्त नावाने अल्पावधीतच प्रधानमंत्री जनधन योजना लोकप्रिय झाली.

सर्वसमावेशक आर्थिक विकासासाठी राष्ट्रीय मोहीम असे या योजनेचे स्वरूप झाले आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक उभारी मिळाली आहे असे अर्थमंत्र्यांनी नमूद केले.

जनधन योजना

28  ऑगस्ट 2014 रोजी योजनेला सुरुवात

ग्रामीण व निमशहरी भागांत 67 टक्के बँक खाती उघडली गेली.

महिलांकडून यापैकी 55 टक्के खाती उघडण्यात आली आहेत.

जनधन-मोबाइल-आधार (जॅम) या त्रयीमुळे प्रत्येक नागरिकाला बँकिंग सुविधा विनासायास उपलब्ध होऊ शकल्या.

केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांपासून मिळणारे लाभ थेट लाभाथ्यांच्या बँक खात्यांत हस्तांतरित होऊ शकले.

ही योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा मार्च 2015 मध्ये खाती 67 कोटी होती. ती आता 53.14 कोटींवर पोहचली.

खगोलशास्त्र, खगोलभौतिकी ऑलम्पियाड मध्ये भारताला पाच पदके

ब्राझीलमध्ये झालेल्या 17 व्या खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाने 1 सुवर्ण आणि 4 रौप्य अशी एकूण पाच पदके पटकाविली.

पदकतालिकेत भारतीय संघ 8 व्या स्थानी राहिला. विजेत्या चमूमध्ये पुण्यातील दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

ब्राझीलमधील रिओ द जानेरिओ येथे 17 ते 26 ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा झाली.

त्यात सहभागी झालेल्या भारतीय संघातील पाचही विद्यार्थ्यांनी पदके न मिळवली.

त्यात बंगळुरूच्या दक्ष तायालियाने सुवर्ण, पुण्याच्या आयुष कुठारी, सानिध्य सराफ, उत्तर प्रदेशातील पाणिनी, हैदराबाद येथील बानिव्रत माजी यांनी रौप्यपदक मिळवले.

आयआयटी इंदूर येथील प्रा. भार्गव वैद्य, होमी भाभा विज्ञान . शिक्षण संस्थेतील प्रीतेश रणदिवे, प्रा. अर्णब भट्टाचार्य, डॉ. वैभव पंत, अक्षक सिंघल, यश मेहता यांनी मार्गदर्शन केले.

ऑलिम्पियाडचे विद्यमान अध्यक्ष म्हणून प्रा. अनिकेत सुळे उपस्थित होते.

यावर्षी  52 देशांतील 232 विद्यार्थ्यांचा ऑलिम्पियाडमध्ये सहभाग होता.

इराणने सर्वाधिक पाच सुवर्णपदके मिळवली. अमेरिकेने तीन, रोमानिया, दक्षिण कोरिया, सिंगापूर, स्लोवेनिया, कॅनडा यांनी प्रत्येकी दोन सुवर्णपदके मिळवली.

ऑलिम्पियाडमध्ये थिअरी, निरीक्षणे आणि विदा विश्लेषण अशा तीन घटकांचा समावेश होता.

पुढील वर्षी मुंबईत आयोजन

पुढील वर्षी ऑगस्टमध्ये खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडचे आयोजन मुंबईमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे संचालक प्रा. अर्णब भट्टाचार्य यांनी आयोजनासाठीचा ध्वज स्वीकारला.

The post ‘जनधन’ योजनेला दहा वर्षे पूर्ण appeared first on The Officer.

‘आयसीसी’ च्या अध्यक्षपदी जय शहा यांची निवड
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

जागतिक क्रिकेटमधील अत्यंत महत्त्वाच्या पदावर विराजमान होणारे ते सर्वात कमी वयाचे व्यक्ती ठरले आहेत.

जय शहा हे वयाच्या 36 व्या वर्षी आयसीसीचे अध्यक्ष पद भूषविणार आहेत.

ग्रेग बारकले यांच्याकडे आयसीसी चे अध्यक्षपद होते पण बारकले हे तिसऱ्यांदा या पदासाठी इच्छुक नव्हते त्यामुळे या पदासाठी जय शहा यांच्या रूपात एकमेव अर्ज आला होता अखेर जय शहा यांची बिनविरोध निवड झाली.

2019 या वर्षापासून ते बीसीसीआयचे सचिव म्हणून काम पाहत आहेत.

आशियाई क्रिकेट संघटनेचे प्रमुखपदही त्यांच्याकडे आहे .

येणाऱ्या डिसेंबरमध्ये ते आयसीसीच्या अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारण्याची शक्यता आहे.

जय शहा आयसीसी चे अध्यक्ष पद भूषवणारे पाचवे भारतीय व्यक्ती..

आतापर्यंत चार भारतीय व्यक्तींनी आयसीसी चे अध्यक्ष पद भूषवलेले आहे.

जय शहा हे आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारणारे एकूणच पाचवे व्यक्ती ठरले आहेत.

सर्वप्रथम जगमोहन दालमिया (1997 ते 2000 )त्यानंतर शरद पवार (2010 ते 2012) एन. श्रीनिवासन (2014 ते 15) आणि शशांक मनोहर (2015 ते 2020) यांनी  आयसीसी चे अध्यक्षपद भूषवलेले आहे.

लडाखमध्ये नव्या पाच जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा

केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने लडाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी या पाच नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा केली आहे.

या घोषणेनुसार झांस्कार, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग या पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली आहे.

झांस्कार आणि द्रास हे नवे जिल्हे कारगिल विभागात असतील. तर शाम, नुब्रा आणि चांगथांग हे जिल्हे लेह विभागात आहेत.

सध्या लडाखमध्ये केवळ लडाख आणि कारगिल हे दोन जिल्हे आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानंतर आता लडाखधील जिल्ह्यांची संख्या वाढून 7 एवढी झाली आहे.

लडाख विभागामध्ये अतिरिक्त जिल्ह्यांची मागणी बऱ्याच काळापासून करण्यात येत होती.

लेह, लडाख आणि कारगिल विभागातील सामाजिक, राजकीय संघटना ह्या नव्या जिल्ह्यांची मागणी वारंवार करण्यात येत होती. त्यामुळे केंद्र सरकारने हा महत्त्वपू्र्ण निर्णय घेतला.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लडाखमधील जिल्ह्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. शासकीय व्यवस्था भक्कम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

आनंद कुमार दक्षिण कोरिया पर्यटनाचे सदिच्छादूत

सुपर 30′ हा अभिनव शैक्षणिक उपक्रम चालविणारे आनंद – कुमार यांची या वर्षासाठी दक्षिण कोरियाच्या पर्यटनाचे राजदूत (अॅम्बेसेडर) म्हणून निवड करण्यात आली.

त्या देशातील गँगवान या प्रांतात कोरिया टुरिझम ऑर्गनायझेशनच्या (केटीओ) मुख्यालयात नुकत्याच झालेल्या एका समारंभात त्यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला.

केटीओच्या आंतरराष्ट्रीय पर्यटन विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष हाकजू ली यांच्या हस्ते आनंद कुमार यांनी हा बहुमान स्वीकारला.

समाजाच्या वंचित गटांतील मुलांच्या कल्याणासाठी काम करणारे आनंद कुमार हे भारत व दक्षिण कोरिया या देशांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांना दक्षिण कोरियाच्या पर्यटनाचे राजदूत करण्यात आले.

त्यांच्या या निवडीमुळे भारत व दक्षिण कोरियातील युवकांना एकमेकांची संस्कृती जाणून घेण्याची तसेच देशांच्या विकासास हातभार लावण्याची संधी मिळणार आहे.

बाळाच्या नियमित लसीकरणासाठी ‘हॅलो व्हॅक्सी‘

बाळांचे लसीकरण करताना अनेकदा गोंधळ उडतो, कधीकधी लसीकरणाची तारीख लक्षात राहत नाही. त्यामुळे राज्य सरकारने लसीकरणाची माहिती मोबाइलवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी ‘हॅलो व्हॅक्सी‘हे व्हॉट्सअॅप चॅटबॉट सुरू करण्यात आले आहे.

सध्या हे चॅटबॉट इंग्रजी व हिंदीमध्ये उपलब्ध असून, लवकरच ते मराठीमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग आणि ‘यूएसएड, मोमेन्टम रूटीन इम्युनायझेशन ट्रान्सफोर्मेशन अँड इक्विटी’ प्रकल्प यांच्या सहकार्याने हे चॅटबॉट तयार करण्यात आले आहे.

बाळाच्या लसीकरणाशी संबंधित सर्व माहिती देण्यासाठी आणि गैरसमज दूर करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

हे ॲप काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले आहे .त्यावरील माहिती मराठीमध्ये उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे .लवकरच काम पूर्ण होऊन हे ॲप मराठी भाषेमध्ये उपलब्ध होणार आहे.

‘हॅलो व्हॅक्सी’ वापरण्यासाठी 8929850850 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर ‘हाय’ असा संदेश पाठवल्यानंतर विविध पर्याय उपलब्ध करून दिले जातात.

त्यातील योग्य तो पर्याय निवडून लसीकरणाविषयी आवश्यक माहिती जाणून घेता येते.

लसीकरणाविषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न, बाळाचे लसीकरण वेळापत्रक, तसेच नकाशाद्वारे जवळील आरोग्य केंद्राची माहिती याद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

त्यामुळे ‘हॅलो व्हॅक्सी’ नागरिकांसाठी 24 तास लसीकरण मित्र बनेल.

मंताय्या बेडके,सागर बगाडे राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी

अध्यापनात अभिनव पद्धतींचा वापर करत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्रातील दोन शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

या वर्षी (2024) गडचिरोली जिल्ह्यातील मंताय्या बेडके, कोल्हापूर येथील सागर बगाडे राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 मध्ये पुरस्कारप्राप्त ठरलेल्या येथ शिक्षकांची यादी प्रसिद्ध केली.

त्यानुसार देशभरातील 50 शिक्षक पुरस्कारप्राप्त ठरले आहेत. त्यात राज्यातील दोन शिक्षकांचा समावेश अस आहे.

शिक्षक दिनी (5 सप्टेंबर)  दिल्लीतील विज्ञान भवन येथे होणाऱ्या कार्यक्रमात शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

मंताय्या बेडके गडचिरोली जिल्ह्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत.

‘गेली 14 वर्षे संवेदनशील, दुर्गम भागात कार्यरत आहे.

या काळात शाळेची पटसंख्या 8 वरून 138 पर्यंत वाढवण्यात यश मिळाले आहे.

ग्रामीण दुर्गम भागात शाळा असूनही लोकसहभागाच्या माध्यमातून शाळेत इव्हर्टर, स्मार्ट टीव्ही अशा सुविधा विकसित केल्या आहेत.

सागर बगाडे कोल्हापूर येथील एस. एम. लोहिया हायस्कूलमध्ये गेली 30 वर्षे चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

‘विद्यार्थ्यांना घेऊन देशविदेशात कार्यक्रम केले आहेत. दोन विश्वविक्रम नोंदवले गेले आहेत.  सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले आहे.

दुर्गम भागातील मुले, शरीरविक्रय करणाऱ्या महिलांची मुले यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले.

या पुरस्काराने जबाबदारी वाढल्याची भावना आहे. हा पुरस्कार त्यांनी मुलांना अर्पण केला .

तोंडावाटे घेण्याची कॉलरा लस तयार

पटकी अर्थात कॉलरा या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी एकल-स्ट्रेन असलेली आणि तोंडावाटे (ओरल) घेता येणारी लस तयार केल्याची घोषणा ‘भारत बायोटेक’ ने केली.

या लशीला ‘हिलचोल‘असे नाव देण्यात आले आहे.

कॉलरा आजाराशी मुकाबला  करण्यासाठी ‘भारत बायोटेक’ने हिलमन लॅबोरेटरीजच्या परवान्यांतर्गत हिलचोल  (बीबीव्ही131) ही लस तयार केली आहे.

हिलमन लॅबोरेटरीजला मर्क यूएसए आणि वेलकम ट्रस्ट यांनी निधी पुरवला आहे.

दर वर्षी कॉलरा प्रतिबंधक ओरल लशीची (ओसीव्ही) मागणी जगभरात वाढत आहे.

ही मागणी दर वर्षी 10 कोटी मात्रा इतक्या वेगाने वाढताना दिसत आहे.

या लशीची निर्माती कंपनी एकमेव असल्यामुळे जगभरात कायमच या लशीचा तुटवडा असतो.

ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन

लोकनाट्य, नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका अशी चौफेर मुशाफिरी करून आपल्या समर्थ अभिनयाने सात दशके हुकूमत गाजविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे वयाच्या 81 व्या वर्षी कर्करोगाने  निधन झाले.

कला क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्य शासनाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराच्या त्या मानकरी ठरल्या होत्या.

त्यांचा जन्म 9 डिसेंबर 1942 रोजी पुणे येथे झाला.

वयाच्या अकराव्या वर्षी बहुरूपी कला झंकार नृत्य पार्टीच्या मेळ्यामधून त्यांनी नृत्यांगना म्हणून कलेची सुरवात केली.

‘बेबंदशाही’ या नाटकामधून त्यांनी रंगमंचावर पहिले पाऊल टाकले.

‘तुझे आहे तुजपाशी’, ‘रखेली’, ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘राजकारण गेलं चुलीत’, चिरंजीव आईस’, ‘सासूबाईंचं असंच असतं’, ही त्यांची नाटके गाजली.

त्यांचा रूपेरी पडद्यावरचा प्रवासही थक्क करणारा होता. ‘देवकीनंदन गोपाला’, ‘वारसा लक्ष्मीचा’, ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’, ‘पुढचं पाऊल’, ‘आम्ही दोघे राजा-राणी’, ‘आई शप्पथ’, ‘माहेरची साडी’, ‘हिरवा चुडा सुवासिनीचा’, अशा शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटविला होता.

‘वक्त के पहले’ आणि ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी स्वतःची छाप सोडली होती.

The post ‘आयसीसी’ च्या अध्यक्षपदी जय शहा यांची निवड appeared first on The Officer.

‘लखपती दीदी’ योजना
‘लखपती दीदी‘ योजना

महिलांना स्वतःच्या पायांवर उभे राहण्यास प्रोत्साहन देणारी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी ‘लखपती दीदी’ ही केंद्र सरकारची एक अभिनव योजना आहे.

जळगाव येथे रविवारी (२५ ऑगस्ट) लखपती दीदी संमेलन झाले.

त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षांत एक कोटी महिला लखपती दीदी झाल्याचे सांगून गेल्या दोन महिन्यांत एकूण 11 लाख महिलांनी हे लक्ष्य साध्य केल्याची माहिती दिली.

एकूण 3 कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट केंद्राने निश्चित केले आहे.

पंतप्रधानांनी संमेलनापूर्वी निवडक 80 लखपती दीदींशी संवाद साधला.

ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, ग्रामविकास व पंचायतराज विभाग, उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियानांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला उद्देशून भाषण करताना ‘लखपती दीदी’ योजनेची घोषणा केली.

या योजनेनुसार महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी 1 ते 5 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते.

योजनेची उद्दिष्ट्ये:

उमेद- अर्थातच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ग्रामविकास व पंचायतराज विभागाअंतर्गत राबविण्यात येत आहे.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारे, त्यांना आत्मनिर्भर करून स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मदतीचा हात देणारे, त्यांच्यात नवा विश्वास निर्माण करून नवी क्षितिजे पादाक्रांत करण्याचे बळ देणारे, ग्रामीण महिलांच्या हक्काचे हे व्यासपीठ आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभरात लखपती दीदी निर्माण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून महाराष्ट्रात 25 लाख लखपती दीदी तयार करण्याचे कार्य हाती घेण्यात आले असून ते आता पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहे.

लखपती दीदींचे वार्षिक उत्पन्न किमान 1 लाख रुपयांपेक्षा पुढे जावे यासाठी त्यांना दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यवसाय संधी निर्माण करून दिल्या जाणार आहेत.

योजनेचे स्वरूप:

या योजनेअंतर्गत अभियानातील महिलांना बँकेचे व्यवहार शिकवले जातात.

त्यांना आर्थिकदृष्ट्या साक्षर केले जाते कृषी विषयक माहितीसाठी अभियानात कृषी सखी आहेत.

बँक विषयक मदतीसाठी बँक सखी आहेत.

अशा विविध क्षेत्रात प्रशिक्षित असलेल्या व्यक्ती अभियानात आहेत.

तसेच मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांकडून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

उमेद अभियानात 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 8974 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे आले असून आजपर्यंतच्या इतिहासातील हे सर्वात मोठे कर्ज म्हणून देखील गणले गेले आहे.

योजनेच्या लाभासाठी नेमकी अट काय?

या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे.

या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसायला हवा.

ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिला अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

लाभार्थी महिला संबंधित राज्याची रहिवाशी असावी.

महिलेचे वय 18 ते 50 दरम्यान असावे

या योजनेसाठी अर्ज करणारी महिला बचत गटाशी संबंधित असणे आवश्यक आहे.

‘एमडीपीएच‘ ला निर्यातीसाठी पुरस्कार

हस्तकला निर्यात प्रोत्साहन महामंडळातर्फे (ईपीसीएच) देण्यात येणारा हस्तकलेच्या वस्तू निर्यातीसाठीचा पुरस्कार अगरबत्ती उत्पादन क्षेत्रातील अग्रेसर कंपनी म्हैसूर डीप परफ्युमरी हाउसला (एमडीपीएच) प्राप्त झाला आहे.

नवी दिल्लीत एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

हा पुरस्कार प्राप्त करणारी एमडीपीएच ही मध्य भारतातील पहिली कंपनी आहे.

एमडीपीएच चे संचालक अंकित अग्रवाल यांनी हा पुरस्कार स्वीकारला

चितळे बंधूचा सचिन ब्रँड अॅम्बेसिडर

‘चितळे बंधू मिठाईवाले’  75 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने ‘क्रिकेटचा देव’ अशी ओळख असलेले सचिन तेंडुलकर आता ‘चितळे बंधू मिठाईवाले’ यांचे सदिच्छादूत (ब्रँड अॅम्बेसिडर) असतील, अशी घोषणा चितळे बंधू मिठाईवालेचे भागीदार केदार चितळे आणि इंद्रनील चितळे यांनी केली.

“सचिन तेंडुलकर आता चितळे बंधू मिठाईवाले यांचे ‘सदिच्छादूत’ झाल्याचे औचित्य साधत क्रिकेटच्या या आयकॉनिक ब्रँडसोबत नमकीन व भुकेच्या वेळेत खाता येण्यासारख्या (स्नॅक्स) पदार्थांची नवीन श्रेणी ग्राहकांसाठी सादर करणार आहेत.

1950 मध्ये चितळे बंधू मिठाईआले ची स्थापना रघुनाथ चितळे यांनी केली होती

एकीकृत पेन्शन योजना

केंद्रीय मंत्रिमंडळाने 24 ऑगस्ट रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजनेला (यूपीएस – युनिफाईड पेमेंट स्किम) मंजुरी दिली.

ही योजना राज्य कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्राने लागू केली आहे.

महाराष्ट्र हे यूपीएस लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे.

ही योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे.

नेमकी योजना काय?

निवृत्तीवेतन भांडवल बाजाराशी पूर्णतः संलग्न न ठेवता काही प्रमाणात स्थिर व नियमित उत्पन्न देणारी अशी ही योजना आहे.

या योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्याची एकूण सेवा लक्षात घेऊन त्याला निवृत्तीनंतर नियमित स्वरूपाची आणि आधी निश्चित केलेली रक्कम दिली जाईल

पेन्शन कसे मोजणार?

एखाद्या कर्मचाऱ्याची सरकारी नोकरी सलग 25 वर्षे झाली असेल तर त्याला शेवटच्या 12 महिन्याच्या सरासरी वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन स्वरूपात मिळेल.

पेन्शनची ही रक्कम महागाई भत्यातून चालनवाढीशी संलग्न राहील.

यूपीएस मध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान पूर्वीप्रमाणेच राहील.

केंद्र सरकार मात्र या योजनेमध्ये पूर्वीच्या 14 टक्यांऐवजी 5 टक्के योगदान देईल.

एनपीएस आणि यूपीएस संबंध काय ?

नव्या पेन्शन योजनेअंतर्गत (एनपीएस) निवृत्त झालेल्यांना व नियत सेवावधी लागू झालेल्या कर्मचाऱ्यांना यूपीएसच्या तरतुदी लागू केल्या जातील.

या योजनेत थकबाकीची रक्कम पीपीएफच्या व्याजदरानुसार व्याजासह देण्यात येईल.

एकदा एखाद्या कर्मचाऱ्याने यूपीएस योजना निवडल्यानंतर त्याला एनपीएसकडे जाता येणार नाही.

‘आयएनएस मुंबई‘ श्रीलंकेत

श्रीलंकन नौदल जहाजांबरोबरच्या सरावासाठी भारतीय नौदलाची युद्धनौका ‘आयएनएस मुंबई’ तीन दिवसीय दौऱ्यासाठी  कोलंबो बंदरात दाखल झाली.

भारतीय नौदलाच्या या आघाडीच्या युद्धनौकेचे श्रीलंकेच्या नौदलाने परंपरेप्रमाणे स्वागत केले.

163 मीटर लांबीची ‘आयएनएस मुंबई’ 410 सदस्यांद्वारे चालवली जाते.

ही युद्धनौका श्रीलंकेच्या नौदलासोबत क्रीडा स्पर्धा, योगासने आणि समुद्रकिनाऱ्याची साफसफाई यासारखे संयुक्त उपक्रमही हाती घेईल.

काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेडचे काँग्रेस पक्षाचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे  70 व्या वर्षी निधन झाले.

हैदराबादच्या किम्स रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

मागील दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

यकृतामध्ये संसर्ग झाल्यामुळे चव्हाण यांना सुरवातीला नांदेडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. तसेच, कमी रक्तदाबाचा त्रासही होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर चव्हाण यांना 13 ऑगस्टला एअर अॅम्ब्युलन्सने उपचारासाठी हैदराबादला नेण्यात आले.

लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर नांदेडमधील निवडणूक चर्चेत आली होती.

काँग्रेसचा गड असलेल्या नांदेड मतदारसंघात 2004 च्या निवडणुकीत भाजपने शिरकाव केलेला होता.

मात्र काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांनी भाजपचे तत्कालीन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना पराभवाची धूळ चारत विजय खेचून आणला होता.

59 हजार 442 मतांनी चव्हाणांनी चिखलीकरांवर मात केली. वसंतराव चव्हाण यांना 5,28,894 तर चिखलीकरांना 4,69,452 मतं मिळाली होती.

वडिलांचा वारसा पुढे चालू ठेवला

वसंत चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अगदी सरपंचपदापासून केलेली आहे.

वसंत चव्हाण यांचे वडील बळवंतराव चव्हाण हेदेखील नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठे प्रस्थ होते.

आपल्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे चालवत वसंत चव्हाण यांनी सरपंच ते खासदार अशी वेगवेगळी पदे भूषवली.  वसंत चव्हाण यांचे वडील बळवंतराव हेदेखील आमदार होते.

सरपंच ते खासदार

नांदेड जिल्ह्यात 2009 साली नायगाव मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली.

त्यानंतर वसंतराव चव्हाण या मतदारसंघाचे पहिले आमदार ठरले.

वसंतराव चव्हाण हे सर्वप्रथम 1978साली आपल्या नायगाव या गावाचे सरपंच झाले.

त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख चढाच राहिला. काही काळानंतर ते जिल्हा परिषदेवर गेले.

2002 साली ते जिल्हा परिषदेवर निवडून आले होते.

त्यांचे राजकीय वजन ओळखून काँग्रेसने त्यांना लगेच विधानपरिषदेची आमदारकी दिली.  त्यानंतर त्यांनी 16 वर्षे विधानपरिषद आणि विधानसभेत आमदारकी भूषवली.

एरिक्सन यांचे निधन

इंग्लंड फुटबॉल संघाचे पहिले परदेशी प्रशिक्षक, तसेच इटली, पोर्तुगाल आणि स्वीडनमध्ये क्लब संघांना मार्गदर्शन करताना यशस्वी कामगिरी करणारे स्वेन-गोरान एरिक्सन यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले

एरिक्सन यांनी आठ महिन्यांपूर्वी आपल्याला स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याचे सांगितले.

त्यांच्या सर्वांत आवडत्या लिव्हरपूल क्लबने त्यांना एका विशेष सामन्यात प्रशिक्षकपद भूषवण्याची संधी दिली होती.

मायदेशात (स्वीडन) ‘स्वेनीस’ या नावाने प्रचलित असलेल्या एरिक्सन यांना वयाच्या 27व्या वर्षीच फुटबॉल खेळण्यातून निवृत्ती घ्यावी लागली होती. मात्र, त्यानंतर प्रशिक्षक म्हणून त्यांनी यशस्वी कारकीर्द घडवली.

2001 मध्ये त्यांची इंग्लंडच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

त्यांना इंग्लंडची ‘सुवर्ण पिढी’ मानल्या जाणाऱ्या डेव्हिड बेकहॅम, वेन रूनी, फ्रँक लॅम्पार्ड, स्टीव्हन जेरार्ड यांसारख्या नामांकित खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची संधी लाभली.

एरिक्सन यांच्या मार्गदर्शनाखालील 2002 आणि 2006 या वर्षी इंग्लडला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश आले होते.

क्लब स्तरावर यश…

आंतरराष्ट्रीय स्तरावर एरिक्सन यांना कोणतीही मोठी स्पर्धा जिंकता आली नाही. मात्र, क्लब फुटबॉलमध्ये त्यांना यश मिळाले.

एरिक्सन यांच्या मार्गदर्शनाखाली आयएफके गॉथनबर्ग क्लबने 1982 मध्ये स्वीडनमधील लीग आणि युएफा चषकाचे जेतेपद पटकावले होते.

बेन्फिका क्लबचे प्रशिक्षकपद भूषवताना त्यांनी तीन वेळा पोर्तुगालमधील लीग जिंकली.

त्यांनी इटलीतील रोमा आणि सॅम्पदोरिया संघांना एकेकदा कोपा इटालियाचे जेतेपद मिळवून दिले. तसेच लॅझिओने ‘सेरी ए’, कोपा इटालिया (दोन वेळा), सुपरकोपा इटालियाना (दोन वेळा), युएफा सुपर चषक अशा प्रतिष्ठेच्या स्पर्धा जिंकल्या.

The post ‘लखपती दीदी’ योजना appeared first on The Officer.

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा 2024
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा 2024

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचे एकूण 84 खेळाडू सहभागी होत आहेत.

त्यांच्यासोबत 95 अधिकारी जाणार आहेत.

पॅरालिम्पिकमधील खेळाडूंना कुठल्याही गोष्टीची उणीव भासू नये, म्हणून अधिकाऱ्यांची संख्या वाढली आहे.

भारताचे एकूण 179 जणांचे पथक आहे.

95 मध्ये 77 संघाचे अधिकारी आहेत,9 वैद्यकीय तज्ज्ञ आणि 9 इतर अधिकारी आहेत.

भारताचे 84 अॅथलिट 12 प्रकारांत सहभागी होणार आहेत.

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचे 54 खेळाडू 9 प्रकारांत सहभागी झाले होते.

स्पर्धेचा कालावधी : 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर

क्रीडा प्रकार : 22

सहभागी देश : 170

भारताचे खेळाडू : 84 (पुरुष – 52, महिला- 32)

आजतागायत भारताने पॅरालिम्पिकमध्ये 9 सुवर्ण, 12 रौप्य, 10 कांस्य असे एकूण 31 पदके जिंकली आहेत.

सुमित अंतील आणि भाग्यश्री जाधवहे पॅरिस पॅरालिम्पिकमधील भारताचे ध्वजधारक असतील.

भारताचे पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष : देवेंद्र झाझरीया

आशा शर्मा यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री आशा शर्मा  यांचे वयाच्या 88 व्या वर्षी  निधन झाले.

आशा शर्मा यांनी अनेक चित्रपटांसह छोट्या पडद्यावरही काम केले होते.

‘कुमकुम भाग्य’ या लोकप्रिय हिंदी मालिकेत त्यांनी काम केले होते.

याशिवाय अभिनेता प्रभाससह त्यांनी ‘आदिपुरुष’ या हिंदी चित्रपटातही काम केले होते.

The post पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा 2024 appeared first on The Officer.

पहिल्या रियुजेबल हायब्रीड रॉकेटची गगनभरारी
पहिल्या रियुजेबल हायब्रीड रॉकेटची गगनभरारी

अवकाश संशोधनामध्ये भारताने 24 ऑगस्ट रोजी आणखी एक नवा अध्याय लिहिला.

तमिळनाडूतील स्टार्टअप ‘स्पेसझोन इंडिया’ आणि ‘मार्टिन समूहा’ने तयार केलेले पहिले रियुजेबल हायब्रीड रॉकेट ‘आरएचयूएमआय – 1’चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

चेन्नईतील थिरुविदंडाई येथील प्रक्षेपण केंद्रावरून मोबाईल लाँचरचा वापर करून हे प्रक्षेपण करण्यात आले.

या रॉकेटच्या माध्यमातून 3 क्यूब उपग्रह आणि 50 पिको उपग्रह आकाशात सोडण्यात आले.

स्पेस झोनच्या येथील मुख्यालयामध्ये मागील दोन वर्षांपासून ‘मिशन- आरएचयूएमआय’ अंतर्गत विविध प्रकल्पांवर काम केले जात आहे.

या रॉकेटला उड्डाणासाठी ऊर्जा देण्याचे काम ‘जेनेरिक फ्युएल बेस्ड हायब्रीड मोटार’ करते.

यात इलेक्ट्रिक यंत्रणेचा वापर करून उघडणारे ‘पॅराशूट डिप्लॉयर’ देखील बसविण्यात आले आहे.

वातावरणाचा अभ्यास

मोबाईल लाँचपॅडचा वापर करून प्रक्षेपित करण्यात आलेले हे जगातील अशा प्रकारचे पहिलेच हायब्रीड रॉकेट असल्याचा दावा ‘मिशन आरएचयूएमआय’कडून करण्यात आला आहे.

या रॉकेटच्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात आलेल्या तीन क्यूब उपग्रहाच्या माध्यमातून वातावरणाची माहिती, अवकाशातील अतिनील किरणांची तीव्रता आणि हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास करण्यात येणार असून काही महत्त्वपूर्ण डेटा संकलित करण्याचे कामदेखील ते करतील.

याशिवाय विविध प्रकारचे 50 पिको उपग्रहदेखील सोडण्यात आले असून ते वातावरणाचा विविध अंगांनी अभ्यास करतील.

‘मार्टिन ग्रुप‘चा आधार

या मोहिमेत आणखी वेगळा प्रयोग करण्यात आला असून या मोहिमेसाठी हायड्रॉलिक मोबाईल लाँचपॅडचा वापर करण्यात आला होता.

अशा प्रकारच्या लाँचपॅडचा वापर केली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

जे तंत्रज्ञान वापरले आहे ते देशाच्या भविष्यातील मोहिमांसाठी अधिक महत्त्वपूर्ण ठरेल .

या सगळ्या मोहिमेला ‘मार्टिन ग्रुप ऑफ कंपनीज’ या उद्योगसमूहाचे मोठे पाठबळ लाभले.

कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून या समूहाने या अवकाश मोहिमेला आर्थिक पाठबळ दिले होते.

‘विज्ञान धारा’ योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन प्रमुख योजना यापुढेही सुरू ठेवण्यास मंजुरी दिली.

या तीनही योजना विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या (DST) ‘विज्ञान धारा’ या एकात्मिक केंद्रीय क्षेत्रातील योजनेत विलीन करण्यात आल्या आहेत.

योजनेत तीन व्यापक घटक आहेत:

1) विज्ञान आणि तंत्रज्ञान (S&T) संस्थात्मक आणि मानवी क्षमता निर्माण

2) संशोधन आणि विकास

3) नवोन्मेष, तंत्रज्ञान विकास आणि उपयोजन

पंधराव्या वित्त आयोगाच्या 2021-22 ते 2025-26 या कालावधीत ‘विज्ञान धारा’ या एकीकृत योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित खर्च सुमारे 10,579.84 कोटी रुपये इतका आहे.

या तीनही योजनांचे एकाच योजनेत विलीनीकरण केल्याने निधी वापरात कार्यक्षमता वाढेल आणि उप-योजना तसेच कार्यक्रमांमध्ये समन्वय स्थापित होईल.

‘विज्ञान धारा’ योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट देशातील विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष परिसंस्था मजबूत करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षमता निर्माण तसेच संशोधन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासाला चालना देणे, हे आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीमुळे शैक्षणिक संस्थांमध्ये सुसज्ज संशोधन आणि विकास प्रयोगशाळांची संख्या वाढवून देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान पायाभूत सुविधा आणखी मजबूत होतील.

ही योजना आंतरराष्ट्रीय मेगा सुविधांच्या उपलब्धतेसह मूलभूत संशोधन, शाश्वत ऊर्जा, पाणी इत्यादींमधील अनुवादात्मक संशोधन आणि आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्याद्वारे सहयोगी संशोधन यासारख्या क्षेत्रांमध्ये संशोधनाला चालना देण्याचा प्रयत्न करते.

हे विज्ञान आणि तंत्रज्ञान परिदृश्य मजबूत करण्यासाठी आणि पूर्ण-वेळ समतुल्य  संशोधक संख्या सुधारण्यासाठी देशाच्या संशोधन आणि विकास आधाराचा विस्तार करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानव संसाधन पूल तयार करण्यात देखील योगदान देईल.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात लैंगिक समानता आणण्याच्या अंतिम उद्दिष्टासह विज्ञान आणि तंत्रज्ञान  क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी केंद्रित उपाय योजिले जातील.

ही योजना शालेय स्तरापासून ते उच्च शिक्षणापर्यंत आणि लक्ष्यित उपायांद्वारे उद्योग आणि स्टार्टअपसाठी सर्व स्तरांवर नवोन्मेषाला चालना देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना बळ देईल.

शैक्षणिक संस्था, सरकार आणि उद्योग यांच्यातील सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाठिंबा दिला जाईल.

‘विज्ञान धारा’ योजनेअंतर्गत प्रस्तावित केलेले सर्व कार्यक्रम विकसित भारत 2047 चा दृष्टिकोन साकार करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या पाच वर्षांच्या उद्दिष्टांशी संरेखित केले जातील.

योजनेतील संशोधन आणि विकास घटक अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या  अनुषंगाने संरेखित केले जातील.

या योजनेची अंमलबजावणी राष्ट्रीय प्राधान्यक्रमांशी सुसंगत असून ती जागतिक स्तरावर प्रचलित असलेल्या मापदंडांचे पालन करेल.

पार्श्वभूमी:

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रमांचे आयोजन, समन्वय आणि प्रोत्साहन यासाठी नोडल विभाग म्हणून काम करतो.

देशात विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष  यांना प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे तीन केंद्रीय क्षेत्रातील छत्र योजना पूर्वीपासूनच राबविण्यात येत आहेत.

(i) विज्ञान आणि तंत्रज्ञान (S&T) संस्थात्मक आणि मानवी क्षमता निर्माण, (ii) संशोधन आणि विकास आणि (iii) नवोन्मेष, तंत्रज्ञान विकास आणि उपयोजन;  या तिन्ही योजना ‘विज्ञान धारा’ या एकीकृत योजनेत विलीन करण्यात आल्या आहेत.

शिखर धवनची निवृत्तीची घोषणा

दोन वर्षांपूर्वी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटचा निरोप घेतला.

त्यांनी निवृत्ती जाहीर करताना आपल्या 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीची सांगता केली.

पश्चिम दिल्लीतील या जिगरबाज सलामीवीरचा पहिला आणि अखेरचा  आंतरराष्ट्रीय सामना वनडे होता.

तो एकूण 34 कसोटी 127 वनडे आणि 68 टी-20 सामने खेळला.

विशाखापट्टणम येथे ऑक्टोबर 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन- डेद्वारे शिखरने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

त्यानंतर 2011मध्ये पोर्ट ऑफ स्पेनला यजमान वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये, तर 2013 मध्ये मोहालीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते.

डिसेंबर 2022मध्ये बांगलादेशविरुद्ध वन-डे सामना खेळला होता.

शिखर धवन 34 कसोटी सामन्यात 7 शतके आणि 5 अर्धशतकांच्या बळावर 2,315 धावा बनवल्या.

167 वनडे सामन्यात 17 शतकांसहित 39 अर्धशतकांच्या बळावर 6,793 धावा केल्या. तर 68 टी -2० सामन्यात 11 अर्धशातकांसहित  1,759 धावा केल्या.

कसोटी पदार्पणात मोहालीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध शिखरने 187 धावांची खेळी केली होती.

ही कसोटी पदार्पणात भारतीय फलंदाजाने नोंदवलेली सर्वोच्च खेळी ठरली आहे. त्याने त्या कसोटीत 85 चेंडूंत शतक झळकावले होते.

पदार्पणात केलेले ते वेगवान शतक ठरले होते.

आपल्या शंभराव्या आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात शतक झळकावणारा शिखर धवन हा पहिलाच भारतीय ठरला होता.

आतापर्यंत एकूण दहाच फलंदाजांना अशी कामगिरी करता आली आहे .

त्याने आपल्या शंभराव्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 109 धावा बनवल्या होत्या.

The post पहिल्या रियुजेबल हायब्रीड रॉकेटची गगनभरारी appeared first on The Officer.

भारत – अमेरिका दरम्यान संरक्षण करार
मायक्रोक्रिस्टलचा शोध

इलेक्ट्रॉनिक उपकरणांतील डिटेक्टर, एलईडी लाईट्स आणि सोलर सेलमध्ये सिलिकॉन फोटोडिटेक्टर्सचा वापर होतो. मात्र त्याला काही मर्यादा आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाची कार्यक्षमता, वेग आणि उत्पादकता वाढविण्यासाठी जगभरात पेरोस्काईट (सीझियम लीड ब्रोमाइड) या नव्या पदार्थावर संशोधन चालू आहे.

मात्र उच्च तापमानाला त्याची स्थिरता टिकत नसल्याने शास्त्रज्ञांना यश मिळत नव्हते.

अखेरीस पुण्यातील शास्त्रज्ञांनी सीझियम लीड ब्रोमाइडचा मायक्रोक्रिस्टर बनविण्यात यश आले असून, तो सिलिकॉन डिटेक्टरपेक्षा 100 पटींनी संवेदनशील आहे.

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे (आयसर) शास्त्रज्ञ डॉ. अतिकुर रेहमान यांच्या नेतृत्वात गोकूळ अनिलकुमार यांनी हे संशोधन केले.

आयसर पुणेचे प्रा. पवन कुमार, आयसर मोहालीचे डॉ. गौतम शीट व अमेरिकेतील ब्रुकहेवन नॅशनल लॅबोरेटरीचे डॉ. सूयोन ह्वांग यांचाही शोधात मोठा वाटा आहे.

सीझियम लीड ब्रोमाइडचा सूक्ष्म स्फटिक बनविण्यासाठी शास्त्रज्ञांच्या या गटाने नवीन पद्धत विकसित केली आहे. त्यांचे हे संशोधन नुकतेच अॅडव्हान्स मटेरिअल्स या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले.

काय आहे सीझियम लीड ब्रोमाइड?

एक प्रकारचे पेरोस्काइट मटेरिअल आहे.

प्रकाशाच्या बाबतीत अतिसंवेदनशील असलेल्या या पदार्थात उत्कृष्ट ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स गुण असतात.

आजवर उच्च तापमानाला स्थिर राहत फेरोइलेक्ट्रिक गुण आणि अल्ट्रा डार्क करंट मिळत नव्हते. नव्या संशोधनातून त्यावर मात केली आहे.

संशोधनाची वैशिष्ट्ये:

सॉल्वोथर्मल संश्लेषण पद्धतीचा वापर करत सीझियम लीड ब्रोमाइडची निर्मिती

वातावरणीय तापमानालाही याची निर्मिती करणे शक्य

फायदा काय ?

प्रथमच उच्च तापमानाला आवश्यक गुण दर्शविणाऱ्या पेरोस्काइट निर्मितीच्या प्रक्रियेचा शोध

फेरोइलेक्ट्रिक प्रॉपर्टीज दर्शविणारे हे मायक्रोक्रिस्टल्स इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची क्षमता वाढविणार

नव्या पिढीतील डिटेक्टर, एलईडी लाइट्स आणि सोलर सेल बनविण्यासाठी उपयुक्त

कमी खर्चात जास्त कार्यक्षम डिटेक्टर्सची निर्मिती शक्य

भारत – अमेरिका दरम्यान संरक्षण करार

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अमेरिका दौऱ्यात दोन देशांदरम्यान दोन महत्त्वाचे करार झाले.

पुरवठा केल्या जाणाऱ्या वस्तूंना प्राधान्य आणि संपर्क अधिकाऱ्याच्या कामकाजासंबंधी हे करार करण्यात आले.

अमेरिकेबरोबरील धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.

राजनाथ सिंह यांचा हा चार दिवसांचा दौरा आहे.

या दौऱ्यादरम्यान ते अमेरिकेचे संरक्षण मंत्री ऑस्टिन लॉइड यांची भेट घेणार आहेत.

भारत आणि अमेरिकेने राष्ट्रीय सुरक्षेला बळ देणाऱ्या एकमेकांच्या वस्तू आणि सेवांना प्राधान्य द्यायचे आहे.

पुरवठा व्यवस्थेच्या मदतीने दोन्ही देश आपापल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या गरजेनुसार आवश्यक असलेल्या औद्योगिक वस्तूंची आयात एकमेकांकडून करू शकणार आहेत.

या करारामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण संबंध आणखी दृढ होतील.

अमेरिकेने अशा प्रकारचा करार केलेला भारत हा 18 वा देश ठरला आहे.

जागतिक कुस्ती स्पर्धेत भारत अव्वलस्थानी

अम्मान(जॉर्डन) या ठिकाणी सुरू असलेल्या 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करीत अव्वलस्थान पटकावले.

या स्पर्धेत  महाराष्ट्राच्या श्रुतिका पाटील हिने रोप्य पदक पटकावले.

काजलला सुवर्ण; भारत अव्वल

भारताच्या काजलने सुवर्णपदक मिळवले.

या स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी ती भारताची पाचवी कुस्तीगीर ठरली. तिने 69 किलो गटाच्या अंतिम फेरीत युक्रेनच्या ओलेकसांद्रा रायबाकवर 9-2 असा विजय मिळवला.

यासह भारताने या स्पर्धेत पाच सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदके मिळवली.

एकूण 185 गुणांसह भारतीय संघाने अव्वल क्रमांक पटकावला.

The post भारत – अमेरिका दरम्यान संरक्षण करार appeared first on The Officer.

अभिनेता विजयकडून पक्षाचा झेंडा सादर
राष्ट्रीय अवकाश दिन

चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे.

तसेच चंद्राच्या दक्षिणेकडील ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा पहिला देश ठरला.

भारतीय अंतराळ संस्था इस्रोने गेल्या वर्षी 23 ऑगस्ट 2023 रोजी हा विक्रम केला होता.

चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले तेव्हा संपूर्ण जगाच्या नजरा इस्रोकडे होत्या.

अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानातील उल्लेखनीय कामगिरी ओळखण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी भारतात राष्ट्रीय अंतराळ दिन (National Space Day 2024) साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी दरवर्षी 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.

भारत अंतराळ संशोधनात लक्षणीय प्रगती करत आहे. त्यामुळे राष्ट्रीय अंतराळ दिन देशाच्या प्रगतीवर विचार करण्याची त्याचे योगदान साजरे करण्याची आणि भविष्यातील पिढ्यांना अंतराळ संशोधनात मोठे उद्दिष्ट ठेवण्याची प्रेरणा देते.

हा दिवस विज्ञान, तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या प्रगतीमध्ये अंतराळ संशोधनाच्या महत्त्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकतो.

राष्ट्रीय अंतराळ दिन 2024 ची थीम –‘चंद्राच्या स्पर्शाने जीवनाचा अनुभव घ्या: भारताची अंतराळ कथा’

केंद्रीय गृह सचिवपदी गोविंद मोहन

ज्येष्ठ आयएएएस अधिकारी गोविंद मोहन  केंद्रीय गृह सचिवपदी निवड करण्यात आली.

अत्यंत संवेदनशील असलेल्या या पदावरील अजयकुमार यांचा पाच वर्षांचा कालावधी संपल्यामुळे गोविंद मोहन त्यांची जागा घेणार आहेत.

मोहन यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून बी.टेक. पूर्ण केले, तर अहमदाबाद आयआयएममधून पदविका मिळविलेली आहे.

मंत्रिमंडळ सचिवानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे पद असलेल्या गृह सचिवपदावर नियुक्ती होण्यापूर्वी मोहन केंद्रीय सांस्कृतिक सचिव म्हणून कार्यरत होते.

ते सिक्कीम केडरचे 1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांना सिक्कीम आणि केंद्र सरकारच्या विविध पदांवर काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे.

इकबालसिंह चहल राज्याचे नवे गृह सचिव

मुख्यमंत्र्यांचे सचिव या पदावर कार्यरत असलेल्या इकबालसिंह चहल यांची आता गृह खात्याचे सचिव या पदावर बदली झाली आहे.

अभिनेता विजयकडून पक्षाचा झेंडा सादर

तमिळनाडूत दोन वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी अभिनेता विजय थलपती सक्रिय झाला असून, त्याने आपल्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ या पक्षाचा झेंडा सादर केला.

पनैयूर भागात असलेल्या पक्ष कार्यालयात हा ध्वज विजयच्या हस्ते फडकवण्यात आला.

हा झेंडा दुरंगी असून, त्यात वरील – आणि खालील बाजूला किरमिजी (मरून) रंग आणि मधल्या बाजूला पिवळा अशी रंगसंगती आहे. त्यावर मध्यभागी वागई फूल (तमिळ नाव) असून, त्याच्या दोन्ही बाजूला झुंजणारे हत्ती दाखविण्यात आले आहेत.

तमिळनाडूत वागईचे फूल हे विजयाचे प्रतीक मानले जाते.

जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताला चार सुवर्ण

अम्मान (जॉर्डन) येथे सुरू असलेल्या 17 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्य स्पर्धेत  भारतीयांनी सुवर्णपदाकांचा चौकार मारला.

अदिती कुमार, नेहा, पुलकित आणि मानसी लाथर यांनी विश्वविजेतेपद मिळवले.

ग्रीको रोमन प्रकारातील 43 किलो गटात अदिती कुमारने मारिया गिकिकाचा 7-0 असा पराभव केला.

65 किलो गटात पुलकितने डारिया फ्रोलवावर 6-3 अशी बाजी मारली, तर मानसी हिने 73 किलो गटात हाना पिर्सक्या हिचा पराभव केला.

भारताला चौथे सुवर्णपदक नेहाने मिळवून दिले. नेहाने अंतिम सामन्यात सोउ चा पराभव केला.

The post अभिनेता विजयकडून पक्षाचा झेंडा सादर appeared first on The Officer.

भारत -पोलंड राजनैतिक संबंधांना 70 वर्ष पूर्ण
जागतिक लोकसाहित्य दिन

दरवर्षी 22 ऑगस्ट रोजी जागतिक लोकसाहित्य दिन साजरा केला जातो.

आंतरराष्ट्रीय लोकसाहित्य समितीने 1991 मध्ये हा दिवस जागतिक स्तरावर साजरा करायला सुरवात केली.

लोक-कथन परंपरा मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे.

या अमूर्त परंपरामध्ये लोककथा, दंतकथा, गीत, नृत्य, आणि निरनिराळ्या चालीरितींचा समावेश होतो आणि लोककलांचा हा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द केला जातो.

जागतिक लोकसाहित्य दिना’ निमित्त, भारत सरकाराच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र,नागपूर येथे 22 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्राच्या लोककलेचा अविभाज्य भाग असलेल्या कथाकथन परंपरेवर प्रकाश टाकणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

भारत –पोलंड राजनैतिक संबंधांना 70 वर्ष पूर्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन देशांच्या दौऱ्यावर असून पोलंडची राजधानी वॉर्सा येथे त्यांचे आगमन

भारत आणि पोलंडमधील राजनैतिक संबंधांना 70 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पंतप्रधान पोलंडला गेले असून त्यांचा हा पहिलाच दौरा आहे.

तसेच गेल्या 45 वर्षांतील भारतीय पंतप्रधानाने पोलंडला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आपल्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी पोलंडचे अध्यक्ष अँड्रेझ सेबास्टियन डुडा यांची भेट घेतील, तसेच पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्याबरोबर शिखर बैठक घेतील. विमानतळावर पोलंडचे परराष्ट्र व्यवहार उपमंत्री वाल्दिस्लाव बार्टीस्व्हस्की यांनी त्यांचे स्वागत केले.

2027 मध्ये होणार चांद्रयान – 4 चे उड्डाण

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चंद्रयान तीन मोहिमेच्या यशानंतर आता 2027 मध्ये चंद्रयान 4 मोहिमेचे नियोजन केले आहे.

भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेअंतर्गत 23 ऑगस्ट 2023 ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान उतरले होते.

या ऐतिहासिक घटनेनंतर हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती.

चांद्रयान  4 चार चा उद्देश:

चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवून रोव्हरद्वारे तेथील जमीन खडकांचे नमुने गोळा करणे आणि हे नमुने पृथ्वीवर आणून त्यांची विश्लेषण करणे हे चांद्रयान 4मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

या मोहिमेत यानातून उतरविले जाणारे लँडर भारतीय बनावटीचे असेल .

साधारण 350 kg वजनाचे रोव्हर वापरले जाणार आहे.

महाराष्ट्राच्या साईनाथला कांस्यपदक

महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील साईनाथ पारधीने कनिष्ठ (17 वर्षांखालील) जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत ग्रीको-रोमन प्रकारातील 51 किलो वजनी गटातून कांस्यपदकाची कमाई केली.

साईनाथनने कझाकस्तानच्या येरासी मुसानचा 3-1 असा पराभव केला.

अम्मान (जॉर्डन) येथे 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धा सुरू आहेत.

रोनक दहियाचे कांस्यपदक

रोनक दहियाने ग्रीको रोमन प्रकारात ११० किलोगटात कांस्यपदक जिंकले.

रोनकने कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत तुर्कीच्या एमारुल कॅपकानचा 6-1असा पराभव केला.

The post भारत -पोलंड राजनैतिक संबंधांना 70 वर्ष पूर्ण appeared first on The Officer.