'अगस्त्यमलाई नीलपरी'चा शोध Archives | The Officer

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉमिनिकाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान प्रदान
गयानाच्या सर्वोच्च पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी सन्मानित

गयानाच्या संसद सभागृहात एका समारंभात गयानाचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव केला.

दूरदर्शी राजकीय नेतृत्व, जागतिक स्तरावर विकसनशील देशांच्या अधिकारांचा पुरस्कार, जागतिक समुदायाची असामान्य सेवा आणि भारत-गयाना संबंधांना बळकटी देण्याची वचनबद्धता याबद्दल पंतप्रधानांचा बहुमान करण्यात आला.

पंतप्रधानांनी हा पुरस्कार स्वीकारताना, तो भारताच्या जनतेला आणि दोन्ही देशांमध्ये अतिशय खोलवर रुजलेल्या ऐतिहासिक संबंधांना समर्पित केला.

आपला सरकारी दौरा म्हणजे भारत-गयाना मैत्रीला दृढ करण्याच्या दिशेने भारताच्या सातत्यपूर्ण बांधिलकीचा दाखला आहे, यावर त्यांनी भर दिला.

गयानाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील केवळचौथे परदेशी नेते आहेत.

50 वर्षात गयानाला भेट देणारे मोदी पाहिलेच पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलमधील जी-20 शिखर परिषद आटोपल्यानंतर  गयानाला पोहोचले. तिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

गेल्या 50 वर्षांपेक्षा जास्त कालावधीत मोदी हे गयानाला भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.

भारत-गयाना मैत्रीचे प्रतिक म्हणून मोदी यांना जॉर्जटाऊन शहराची किल्ली भेट देण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉमिनिकाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान प्रदान

कॉमनवेल्थ ऑफ डॉमिनिकाच्या राष्ट्रपती सिल्व्हानी बर्टन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉमिनिकाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान “डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर” प्रदान केला.

हा सन्मान त्यांच्या उत्कृष्ट नेतृत्वासाठी, कोविड-19 महामारीच्या काळात डॉमिनिकाला केलेल्या मदतीसाठी आणि भारत-डॉमिनिका संबंध बळकट करण्याच्या त्यांच्या कटिबद्धतेसाठी  दिला गेला.

डॉमिनिकाचे पंतप्रधान रूझवेल्ट स्केरिट या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पंतप्रधानांनी हा सन्मान भारतातील जनतेला आणि भारत व डॉमिनिकामधील ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंधांना समर्पित केला.

तसेच, भारत आणि डॉमिनिकामधील द्विपक्षीय संबंध भविष्यात अधिक मजबूत होतील, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

हा पुरस्कार समारंभ 20 नोव्हेंबर 2024 रोजी, गयाना येथील जॉर्जटाउनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या भारत-कॅरिकॉम शिखर परिषदेच्या दरम्यान पार पडला.

भारतीय महिला संघ सलग दुसऱ्या वर्षी अजिंक्य

उदयोन्मुख खेळाडू दीपिकाने सामन्याच्या 31 व्या मिनिटाला नोंदविलेल्या एकमेव गोलच्या जोरावर भारतीय महिला संघाने  झालेल्या सामन्यात ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या चीनवर 1-0 अशी मात करून आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

दीपिकाने या स्पर्धेत सर्वाधिक 11 गोल केले.

भारतीय  संघाचे हे तिसरे विजेतेपद ठरले.

यापूर्वी 2016 आणि 2023 मध्ये भारताने ही स्पर्धा जिंकली होती.

या कामगिरी बरोबरच भारताने कोरियाच्या कामगिरीशी बरोबर केली.

कोरियाने देखील तीन वेळा आशियाईअजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे.

आशिया चषक महिला हॉकी स्पर्धा 2024 बिहारमधील राजगिर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.

37 वर्षानंतर इराकमध्ये  राष्ट्रीय जनगणना

इराकमध्ये 20 नोव्हेंबर पासून राष्ट्रीय जनगणनेला सुरुवात झाली.

गेल्या काही वर्षांपासून हिंसाचार आणि राजकीय अस्थैर्याने त्रस्त असलेल्या या देशामध्ये तब्बल 37 वर्षांनी अशा प्रकारची जनगणना होत आहे.

डेटा संकलन आणि नियोजन यांचे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

इराकच्या साधनसंपत्तीचे वितरण, अंदाजपत्रकात वाटपाची तरतूद आणि विकासाचे नियोजन यावर या जनगणनेचा मोठा परिणाम होण्याची अपेक्षा आहे.

इराक मधील अखेरची जनगणना 1987 मध्ये झाली होती त्यानंतर 1997 मध्ये जनगणना झाली होती पण त्यामध्ये कुर्दबहुल प्रदेश वगळण्यात आला होता.

जनगणनेची प्रक्रिया

संपूर्ण इराकमध्ये 1 लाख 20 हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

ते दोन दिवसांमध्ये 160 घरे याप्रमाणे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतील.

या उपक्रमामुळे डेटा संकलन व विश्लेषण  करण्यासाठी तसेच इराकचे लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक आणि आर्थिक चित्र स्पष्ट होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

जनगणना कालावधीत राष्ट्रीय संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

मानवतावादी कारणांचा अपवाद वगळता नागरिक, वाहने आणि रेल्वेच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

‘अगस्त्यमलाई नीलपरी‘चा शोध

केरळमधील पप्पारा वन्यजीव अभयारण्याजवळील (जि. तिरुअनंतपुरम) मंजादिनिनविला भागात ‘टाचणी’ या कीटकाच्या प्रवर्गातील ‘अगस्त्यमलाई बांबूटेल’ (अगस्त्यमलाई नीलपरी) या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्र्व्हसिटीतील संशोधकांसह अन्य संशोधकांनी केरळच्या पश्चिम घाटात हा शोध लावला आहे.

या प्रजातीचे शास्त्रीय नाव ‘मेलानोन्यूरा अगस्त्यमलाइका’ असे आहे.

परंतु पश्चिम घाटातील अगस्त्यमलाई प्रदेशाच्या सन्मानार्थ आणि याच भागात आढळल्याने नव्या प्रजातीच्या ‘टाचणी’ला ‘अगस्त्यमलाई बांबूटेल’ हे नाव देण्यात आले.

‘अगस्त्यमलाई बांबूटेल’ आणि प्रकरु याच वंशातील माहीत असलेली एकमेव प्रजाती म्हणजे कुर्ग-वायनाड भागात आढळणारी ‘मालाबार बांबूटेल’ (मेलानोन्यूरा बिलिनेटा) प्रजाती या दोन्हींमध्ये अतिशय साधर्म्य आहे.

बांबूच्या काडीसारख्या लांब आणि सिलिंडर आकाराचे पोट यावरून या प्रकारातील टाचणीला ‘बांबूटेल’ म्हटले जाते.

याआधी मालाबार बांबूटेल ही प्रजाती माहीत होती. परंतु जवळपास शंभर वर्षांनंतर आता याच वंशातील दुसऱ्या प्रजातीचा शोध लागला आहे.

नव्या प्रजातीची वैशिष्ट्ये

नवीन प्रजाती दिसायला आकर्षक असून यातील आणि मालाबार बांबूटेलमधील आनुवंशिक फरकही महत्त्वाचा आहे.

दोन्ही प्रजातींमध्ये माइटोकॉन्ड्रियल ऑक्सिडेज-वन साइटोक्रोम जीनमध्ये सात – टक्क्यांपेक्षा अधिक आनुवंशिक फरक आढळला.

अगस्त्यमलाई बांबूटेलचा शरीर लांब आणि काळ्या रंगाचा असून त्यावर चमकदार निळे चिन्ह दिसते.

ही नवी प्रजाती करमना नदीत जाणाऱ्या प्रवाहांमध्ये आढळली.

हा परिसर राखीव वन क्षेत्राच्या बाहेरच्या परिसंस्थेचा भाग आहे.

‘इंडसइंड‘ बँकेचा कृषी मंत्रालयाशी करार

इंडसइंड बँक आणि भारत फायनान्शियल इन्क्लुजन लि. या आयबीएलच्या उपकंपनीने भारत संजीवनी कृषी उत्थान उपक्रम राबवण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाशी सामंजस्य करार केला आहे.

देशातील दहा हजार शेतकरी उत्पादक संस्थांची (एफपीओ) निर्मिती आणि प्रोत्साहन, या सरकारच्या प्रमुख कार्यक्रमाला समर्थन देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

शेतकरी उत्पादक संस्था शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेचा लाभ घेण्यास, उत्पादन खर्च कमी करण्यास आणि त्यांच्या कृषी उत्पादनांच्या एकत्रीकरणाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास सक्षम करतात.

या माध्यमातून या संस्था शाश्वत उत्पन्नासाठी महत्वाची भूमिका बजावतात.

जागतिक टेलिव्हिजन दिन

दरवर्षी 21 नोव्हेंबरला जागतिक टेलिव्हीजन दिवस साजरा केला जातो.

या एका आविष्कारामुळे संपूर्ण जगभर भरपूर क्रांती झाली.

दृक्श्राव्य माध्यमाच्या यामुळे आपल्याला जगभरात चालू असलेल्या सगळ्या घडामोडी कळतात.

टेलिव्हिजन हे जनसंवादाचे असे माध्यम आहे ज्यामुळे आपण मनोरंजन, शिक्षण, चालू घडामोडी, विज्ञान-तंत्रज्ञान इत्यादींशी जोडलेले राहतो. त्यामुळे संपूर्ण जगाची माहित आपल्यापर्यंत काही क्षणातच पोचते.

वर्ल्ड टेलिव्हिजन दिनाचा इतिहास

नोव्हेंबर 1996 रोजी संयुक्त राष्ट्रांनी पहिले वर्ल्ड टेलिव्हिजन फोरम आयोजित केले होते.

यामध्ये माध्यमातील अनेक मान्यवर मडंळीदेखील सहभागी झाले होते.

या फोरममध्ये टेलिव्हिजनचे वाढते महत्त्व हा या विषयावर चर्चा करण्यात आली होती.

याच दरम्यान 21 नोव्हेंबर हा जागतिक टेलिव्हीजन दिन म्हणून साजरा करण्याचे संयुक्त राष्ट्रांनी घोषित केले.

टेलिव्हिजनचा इतिहास

टेलिव्हिजनचा शोध एक स्कॉटिश इंजीनिअर जॉन लोगी बेयर्ड यांनी लावला होता.

त्यांनी ज्यावेळी टेलिव्हिजनचा शोध लावला त्यावेळी त्यांचे वय फक्त 21 वर्ष होते.

जॉन लोगी बेयर्ड यांनी टेलिव्हिजनचा शोध इ.स. 1924 साली लावला. यांनतर, 1927 मध्ये फर्न्सवर्थने पहिला चालू (कार्यरत) टेलिव्हिजन तयार केला होता आणि 1 सप्टेंबर 1928 रोजी याला माध्यमांसमोर सादर करण्यात आले.

त्यांनतर 1928 साली जॉन लोगी बेयर्ड यांनी रंगीत टेलिव्हिजनचा आविष्कार केला. नंतर तब्बल 10 ते 12 वर्षांनी 1940 मध्ये सार्वजनिक प्रसारणास सुरुवात झाली.

भारतातील टेलिव्हिजनचा इतिहास

टीव्हीचा शोध लागल्यानंतर सुमारे 3 दशकांनी भारतात टीव्ही आला. UNESCO च्या मदतीने 15 सप्टेंबर 1959 रोजी नवी दिल्ली येथे टेलिव्हिजनची सुरुवात झाली.

भारतात सर्वप्रथम ऑल इंडिया रेडिओच्या अंतर्गत टीव्ही सुरू झाला.

आकाशवाणी भवनात टीव्हीचे पहिले सभागृह बांधण्यात आले होते. त्याचे उद्घाटन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाले.

भारतात टेलिव्हिजनचे पहिले रंगीत प्रसारण 15 ऑगस्ट 1982 रोजी इंदिरा गांधींच्या भाषणाच्या वेळी झाली. यानंतर नव्वदच्या दशकात रामायण, महाभारत यांसारख्या मालिका सुरू झाल्या.

The post पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉमिनिकाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान प्रदान appeared first on The Officer.