माजी परराष्ट्रमंत्री नटवरसिंह यांचे निधन Archives | The Officer

‘पार्दो अॅला कॅरीरा पुरस्कारा’ने शाहरुख खान सन्मानित
आंतरराष्ट्रीय युवा दिन

12 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिन (International Youth Day 2024) साजरा केला जातो.

युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने 17 डिसेंबर 1999 रोजी 12 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय युवा दिवस म्हणून घोषित केला.

तरुण पिढीला प्रोत्साहान देण्यासाठी जगभरात युवा दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

भारतात देखील जागतिक युवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे महत्त्व

दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय युवा दिन, तरुणांच्या गुणांचा आणि राष्ट्राच्या आणि संपूर्ण जगाच्या विकासासाठी त्यांच्यात असलेल्या क्षमतेचा सन्मान करण्यासाठी आहे.

हा दिवस तरुणांपुढील आव्हानांना एक व्यासपीठ देतो आणि समस्या दूर करण्याच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करतो.

समाजाच्या विकासासाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि विविध सामाजिक प्रकल्पांमध्ये स्वयंसेवा करण्यासाठी तरुणांचे खूप मोठे योगदान आहे.

थीम :  “क्लिक्स टू प्रोग्रेस: ​​युथ डिजिटल पाथवेज फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट “ ही यावर्षीच्या उत्सवाची थीम आहे. डिजिटल युग आपल्या जगाला आकार देत आहे, शाश्वत विकासाला गती देण्यासाठी अद्वितीय संधी प्रदान करत आहे.

‘पार्दो अॅला कॅरीरा पुरस्कारा‘ने शाहरुख खान सन्मानित

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याला स्वित्झर्लंडमध्ये आयोजित 77व्या लोकार्नो चित्रपट महोत्सवात त्याच्या सिनेमातील योगदानाबद्दल प्रतिष्ठित ‘पार्दो अॅला कॅरीरापुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर शाहरुखने प्रेक्षकांशी इटालियन भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न करत अभिवादन  केले.

या पुरस्काराने सन्मानित होणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

पियाझा ग्रँड स्क्वेअरमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पॅरिस ऑलिम्पिक 2024

स्पर्धा – 33 वी

ठिकाण – पॅरिस , फ्रान्स

सहभागी देश – 206

खेळाडू – 10,714

खेळ प्रकार – 32

कालावधी 26 जुलै – 11 ऑगस्ट

मोटो – गेम्स वाईड ओपन

आगामी स्पर्धा – लॉस एंजिल्स (अमेरिका)

पहिली ऑलिम्पिक स्पर्धा – 1896, अथेन्स

भारताची कामगिरी:

भारताने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये 10 सुवर्ण, 10 रौप्य आणि 21 कांस्य, अशी एकूण 41 पदके मिळवली आहेत.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा पदके मिळवली.

नेमबाज मनू भाकरने  दोन पदके मिळवली. स्वातंत्र्यानंतर भारताच्या एकाच खेळाडूने एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके प्रथमच मिळवली.

स्वप्नील कुसाळेने 50 मीटर श्री पोझिशनमध्ये कांस्य जिंकले. या प्रकारातील ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिलेच पदक ठरले.

हॉकीत भारताने कांस्यपदक जिंकले. यासह भारताची हॉकीतील एकूण पदके 13 झाली. यात आठ सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्यपदकांचा समावेश आहे.

भारतीय पुरुष संघाने हाकीत आस्ट्रेलियावर मात केली. ऑलिम्पिकमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 52 वर्षांनी विजय मिळवण्यात यश आले.

नेमबाजीत भारताने  ऑलिम्पिकमधील 12 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपविला.

भारताने 16 खेळात सहभाग नोंदवला होता आणि एकूण 117 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यात भारताने 6 पदके पटकावली.

भारताने पदक तालिकेत 71 वे स्थान राखले.

अंतिम पदकतक्ता

क्रमांक   देश         सुवर्ण   रौप्य   कांस्य    एकूण

1        अमेरिका    40      44     42     126

2          चीन         40      27     24       91

3          जपान       20      12     13       45

71         भारत       0         1       05       06

‘ऑलिम्पिक ऑर्डर ‘ ने अभिनव बिंद्रा सन्मानित

ऑलिम्पिक चळवळीतील दिलेल्या भरीव योगदानाबद्दल भारताचा माजी नेमबाज अभिनव बिंद्राला प्रतिष्ठेच्या ‘ऑलिम्पिक ऑर्डर’ने सन्मानित करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांच्या हस्ते बिंद्राला पुरस्कार देण्यात आला.

बिंद्राने 2008 बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळवले होते.

वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक मिळवणारा बिंद्रा भारताचा पहिला खेळाडू ठरला होता.

‘आयओसी’च्या 142 व्या बैठकीत बिंद्राला या बहुमानाने सन्मानित करण्यात आले.

पाच ऑलिम्पिक स्पर्धांत सहभाग:

सिडनी 2000 पासून बिंद्रा पाच ऑलिम्पिक स्पर्धा खेळला.

बिंद्राने 2004 मध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धा प्रकारात प्रथम छाप पाडली.

त्यानंतर बीजिंग 2008 मध्ये त्याने तेव्हाच्या गतविजेत्या चीनच्या – झू किनला हरवून सुवर्णपदक मिळवण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.

लंडन 2012 मध्ये त्याला फारसे यश मिळाले नाही.

रिओ 2016 मध्ये तो अंतिम फेरीत पोहचला होता. मात्र, त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

पुढे 2018 पासून बिंद्रा ‘आयओसी’च्या खेळाडू समितीचा भाग आहे.

ऑलिम्पिक चळवळीचा प्रसार करण्यात त्याचे योगदान महत्त्वाचे आहे.

माजी परराष्ट्रमंत्री नटवरसिंह यांचे निधन

माजी परराष्ट्रमंत्री के. नटवरसिंह यांचे  वृद्धापकाळ व प्रदीर्घ आजारामुळे वयाच्या 93 व्या वर्षी निधन  झाले.

डॉ. मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या कार्यकाळात 2004 ते 2005 या कालावधीत ते परराष्ट्रमंत्री होते.

उत्तम राजनैतिक ज्ञान, तीक्ष्ण स्मरणशक्ती, हजरजबाबीपणा या आधारे ते यशस्वी मुत्सद्दी नेते म्हणून गणले गेले.

अल्पपरीचय:

नटवर सिंह यांचा जन्म 1931 मध्ये राजस्थानमधील भरतपूर येथे झाला.

1953 मध्ये त्यांनी भारतीय परराष्ट्र सेवेत प्रवेश केला.

ब्रिटनमधे उपउच्चायुक्त, झांबियामध्ये उच्चायुक्त तर पाकिस्तानमध्ये भारतीय राजदूत म्हणून त्यांनी काम केले.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात.

परराष्ट्र सेवेतील कार्याबाबत त्यांना 1984 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.

1984 मध्ये परराष्ट्र सेवेचा राजीनामा देऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवून ते विजयी झाले.

पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी विविध खात्यांच्या राज्यमंत्री पदांची जबाबदारी सांभाळली.

1991 मध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेवर आल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्याशी मतभेद झाल्यानंतर नटवर सिंह यांनी एन. डी. तिवारी आणि अर्जुन सिंह यांच्या साथीने ‘ऑल इंडिया इंदिरा काँग्रेस’ पक्षाची स्थापना केली.

2002 मध्ये काँग्रेसकडून राज्यसभेवर निवड झाल्यानंतर 2004मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपावण्यात आली.

सिंह यांनी विविध विषयांवर विपुल लेखन केले.

गाजलेली पुस्तके

1) द लीगसी ऑफ नेहरू-ए मेमोरियल ट्रिब्यूट

2) माय चायना डायरी 1956 -88

3) वन लाइफ इज नॉट इनफ (आत्मचरित्र)

रेफात अहमद मुख्य न्यायाधीश

न्यायपालिकेतही सुधारणांची मागणी करण्याच्याा विरोधकांनी दिलेल्या अंतिम इशाऱ्यानंतर ओबेदुल हसन सर्वोच्च न्यायमूर्तीपदावरून पायउतार झाले.

यानंतर सय्यद रेफात अहमद यांनी  बांगलादेशचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.

हसन आणि सर्वोच्च अपील विभागाच्या पाच न्यायाधीशांनी राजीनामा दिला होता.

The post ‘पार्दो अॅला कॅरीरा पुरस्कारा’ने शाहरुख खान सन्मानित appeared first on The Officer.