सागरी कासवांची गणना करण्यात येणार Archives | The Officer

नागपूर एलायटी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. अतुल वैद्य
‘ब्रेन रॉट‘ ची वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून निवड

ऑक्सफर्डने  2024 या वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून ‘ब्रेन रॉट’ची निवड केली आहे.

हा शब्दाचा समावेश ऑक्सफर्ड शब्दकोशातही करण्यात आला आहे.

सोशल मीडियाचा अतिवापर आणि बौद्धिकदृष्ट्या उपयुक्त न ठरणाऱ्या माहितीचा मारा याबद्दलची चिंता ‘ब्रेन रॉट’मधून प्रतिबिंबित होते.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसकडून प्रकाशित होणाऱ्या ‘ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी’त समावेश करण्यासाठी सहा शब्दांची निवड अंतिम सूचीत करण्यात आली होती. त्यासाठी 37 हजारहून अधिक जणांनी मते नोंदविण्यात आली.

यात ‘ब्रेन रॉट’ शिवाय ‘डेम्युर’, ‘डायनॅमिक प्रायसिंग’ ‘लोर’, ‘रोमँटसी’ आणि ‘स्लोप’ हे शब्द अंतिम स्पर्धेत होते.

या वर्षात झालेले सामाजिक बदल आणि कल याचे निदर्शक हे शब्द आहेत.

ऑक्सफर्डने 2023 मध्ये ‘रिझ’ आणि ‘क्लायमेट इमर्जन्सी’ या शब्दाची निवड केली होती. त्या वर्षातील प्रमुख भावना आणि घडामोडींचा वेध यातून घेण्यात आला होता.

इंटरनेटवरील वेगवेगळ्या व्यासपीठांवर ‘ब्रेन रॉट’ या शब्दाची लोकप्रियतेत 230 टक्के वाढ झाल्याचे आढळल्याने ‘ऑक्सफर्ड डिक्शनरी प्रेस’ने ‘ब्रेन रॉट’ हा वर्षातील सर्वोत्तम शब्द जाहीर केला.

हा कोणताही तांत्रिक शब्द नसून डिजिटल माध्यमातून दिल्या जाणाऱ्या माहितीचा भडीमार, निकृष्ट, अनुत्पादक आणि स्वस्तात उपलब्ध होणारी माहिती, असा आशय या शब्दातून प्रतीत होतो.

डिजिटल माध्यमाचे व्यसन लागून मानसिक क्षमता, विचार करण्याची शक्ती आणि एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो.यामुळे अशा व्यक्तिंना मानसिक थकवा व अस्वस्थता जाणवते.

हेन्री डेव्हिड थोरो या अमेरिकी लेखकाच्या 1854 मधील ‘वॉल्डन’ या पुस्तकामध्ये या शब्दाची उत्पत्ती झाली आहे.

ऑक्सफर्ड लँग्वेजेस’चे अध्यक्ष कॅस्पर ग्रंथवोहल म्हणाले, “ब्रेन रॉट’ हे आभासी जीवनातील धोक्यांपैकी एक आणि आपण आपला रिकामा वेळ कसा वापरत आहोत याबद्दलची भावना व्यक्त करतो.

निवड प्रक्रिया

‘काउंटडाउन’चे कोशकार सुसी डेंट यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीमध्ये चार तज्ज्ञांचा समावेश होता. त्यांनी काही नावे निश्चित केली होती.

अंतिम निर्णयासाठी नागरिकांचे मतदान, भाष्य आणि अतिरिक्त विश्लेषणाचा विचार ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ने केला. त्यानंतर 1 डिसेंबर रोजी शब्दाची निवड जाहीर करण्यात आली.

ऑक्सफर्ड विजेते शब्द

2021 : व्हॅक्स

2022 : गॉब्लिन मोड

2023 : रिझ

2024 : ब्रेन रॉट

नागपूर एलायटी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. अतुल वैद्य

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे (नीरी) संचालक डॉ. अतुल नारायण वैद्य यांची नागपूर येथील लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी डॉ. अतुल वैद्य यांची नियुक्ती जाहीर केली आहे.

त्यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची 65 वर्षे पूर्ण करेपर्यंत (यापैकी जे अगोदर असेल त्या तारखेपर्यंत) करण्यात आली आहे.

डॉ. अतुल वैद्य यांनी रसायन अभियांत्रिकी विषयात एलआयटी – नागपूर येथून एमएस्सी, तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून पीएच डी प्राप्त केली आहे.

डॉ. वैद्य यांना संशोधन, अध्यापन व प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे.

एलआयटी विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर नियुक्ती करण्यासाठी राज्यपालांनी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती.

जागतिक दिव्यांग दिन

दरवर्षी 3 डिसेंबर रोजी जगभरात जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो.

संयुक्त राष्ट्रसंघातर्फे सन 1992 पासून जागतिक दिव्यांग दिन जाहीर करण्यात आला.

तेव्हापासून 3 डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात जागतिक ‘दिव्यांग दिन’ म्हणून साजरा केला जातो.

जागतिक दिव्यांग दिनाच्या (World Day of Persons with Disabilities ) निमित्ताने दिव्यांग व्यक्तींबाबत सर्वसामान्य जनतेत (समाजामध्ये) जनजागृती निर्माण व्हावी, दिव्यांग बांधवांचा सन्मान व्हावा, त्यांचे शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसन करण्यासाठी समाजामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने दिव्यांग दिन साजरा करण्यात येतो.

तसेच समाजातील प्रत्येक घटकांनी दिव्यांगांच्या प्रति, सहानुभूती न दाखवता त्यांना संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रेरित करणे आवश्यक आहे.

जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने दिव्यांग व्यक्तींच्या समस्या समजावून घेता याव्यात याबाबत समाजात जनजागृती व्हावी, दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन, त्यांच्या उध्दारासाठी मदत मिळावी. म्हणून या दिवसाची योजना आहे.

या वर्षी 2024, दिव्यांग व्यक्तींच्या आंतरराष्ट्रीय दिवसाची थीम ” समावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी दिव्यांग व्यक्तींचे नेतृत्व वाढवणे ” आहे.

सर्वांसाठी अधिक समावेशक आणि शाश्वत जग निर्माण करण्यात दिव्यांग व्यक्तींची महत्त्वाची भूमिका ओळखण्यासाठी जागतिक आवाहन

महाराष्ट्र देशातील पहिले राज्य :

दिवसेंदिवस दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे.

2022 महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग 3 डिसेंबर पासून कार्यन्वित

महाराष्ट्र राज्य हे दिव्यान्गांसाठी स्वतंत्र विभाग निर्माण करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

दिव्यांगांचे शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसनाच्या योजना लाभार्थी पर्यंत सहज व सुलभ पणे पोहचवण्यासाठी या विभागाची मदत होणार आहे.

दिव्यांगासाठी सुगम्य भारत अभियान

सुगम्य भारत अभियान ही केंद्र सरकारची एक योजना आहे, जी दिव्यांग व्यक्तींसाठी भारताला मैत्रीपूर्ण देश बनवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत, दिव्यांग व्यक्तींना सर्व सार्वजनिक ठिकाणे उपलब्ध करून देण्यासाठी सरकार उपाययोजना करते.

सुगम्य भारत अभियान ही मोदी सरकारची योजना आहे.

ही योजना 3 डिसेंबर 2015 रोजी दिव्यांग व्यक्तींच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त सुरू करण्यात आली.

या योजनेचा उद्देश अपंग व्यक्तींसाठी सार्वत्रिक सुलभता प्राप्त करणे हा आहे.

या योजनेतून अंगभूत पर्यावरण, प्रवेशयोग्य भौतिक वातावरण, परिवहन, सूचना आणि संप्रेषण पारिस्थितिकी तंत्र विकसित करण्यावर भर दिला जातो.

या योजनेतून शाळा, वैद्यकीय सुविधा, कामाच्या ठिकाणे, घरातील आणि बाहेरील सुविधांमधील अडथळे दूर करण्यासाठी उपाययोजना केल्या जातात.

सागरी कासवांची गणना करण्यात येणार

भारतीय वन्यजीव संस्थेकडून भारतातील पूर्व तसेच पश्चिम किनारपट्टीवरील सागरी कासवांची गणना करण्यात येणार आहे.

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या ‘व्यापक एकात्मिक वन्यजीव अधिवास विकास’ या योजनेचा भाग म्हणून संपूर्ण भारतभर सागरी कासवांच्या संख्येचा अंदाज घेण्यात येणार आहे.

‘राष्ट्रीय सागरी कासव कृती आराखडा 2021-26’ यातील तरतुदींनुसार भारतीय वन्यजीव संस्था ही गणना करणार आहे.

या गणनेचा एक भाग म्हणून कोकण किनारपट्टीवर विणीसाठी येणाऱ्या सागरी कासवांचे ‘फ्लिपर टॅगिंग’ (पंखावर सांकेतिक धातूची पट्टी) लावण्यात येणार आहे.

कासवांना ‘उपग्रह टॅग’ केल्यानंतर त्यांच्या निश्चित स्थानाची माहिती येण्यासाठी बराच कालावधी लागतो. अशावेळी कासवांना जर ‘फ्लिपर टॅगिंग’ लावल्यास ते कासव कितीही वर्षांनंतर पुन्हा किनाऱ्यावर आले तरीही टॅगवरील क्रमांकावरून त्याची सविस्तर माहिती मिळते.

या गणनेचा एक भाग म्हणून कोकणात यावेळेस सागरी कासवांच्या विणीच्या हंगामात सुमारे 500 कासवांचे ‘फ्लिपर टॅगिंग’ करण्यात येणार आहे.

सागरी कासव गणनेच्या प्रकल्पांतर्गत हे काम केले जाणार आहे

अ.भा. म. सा. सं. च्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार

‘दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद ज्येष्ठ नेते शरद पवार भूषविणार आहेत.

‘संमेलनाचे उद्घाटक, तसेच कार्यक्रम पत्रिका लवकरच निश्चित – करण्यात येणार आहे.

आजवर चार संमेलनाचे उद्घाटन पवार यांनी केले आहे

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढील वर्षी 21 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत नवी दिल्लीतील तालकटोरा  मैदानात होणार आहे.

नवी दिल्लीत सत्तर वर्षांनी संमेलन

सन 1954 मध्ये दिल्लीत 37 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते.

या संमेलनाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते.

काकासाहेब गाडगीळ स्वागताध्यक्ष होते. या संमेलनानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ मिळाले.

सत्तर वर्षांनी नवी दिल्लीत होत असलेल्या संमेलनाला राजकीयदृष्ट्याही महत्त्व आले आहे.

‘विंडफॉल कर रद्द

देशात उत्पादित होणारे कच्चे खनिज तेल आणि निर्यात केले जाणारे हवाई इंधन (जेट फ्युएल अर्थात एटीएफ) यांवर मागील 30 महिन्यांपासून सातत्याने लागू करण्यात येत असलेला ‘विंडफॉल’ कर  केंद्र सरकारने अखेर रद्द केला.

याचा सर्वाधिक फायदा ‘ओएनजीसी’, ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ आदी तेल उत्पादक कंपन्यांना होणार आहे.

केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी अधिसूचना राज्यसभेत सादर करून ‘विंडफॉल’ कर रद्द केल्याची घोषणा केली.

अधिसूचनेमुळे ‘विंडफॉल’ कर लागू करण्यासाठी 30 जून 2022 रोजी जारी केली गेलेली अधिसूचना आपोआपच रद्द झाली आहे.

या अधिसूचनेनुसार, देशात उत्पादित होणाऱ्या व शुद्धीकरण करण्यात येऊन त्याचे रूपांतर पेट्रोल व डिझेल या इंधनांमध्ये केल्या जाणाऱ्या कच्च्या खनिज तेलावर तसेच निर्यात होणाऱ्या एटीएफ वर अतिरिक्त उत्पादन शुल्क आकारले जात होते. याला विंडफॉल कर असे म्हटले जात होते.

तो रद्द करण्यासह पेट्रोल व डिझेलच्या निर्यातीवर लागू होत असलेला रस्ते व पायाभूत सुविधा उपकरदेखील (आरआयसी) रद्द झाला आहे.

देशात 1 जुलै 2022 रोजी सर्वप्रथम हा कर लावला गेला.

जगातील अनेक देश त्यांच्या ऊर्जा कंपन्यांकडून कमावल्या जाणाऱ्या नफ्यावर हा कर आकारत आहेत.

हा कर देशात लागू झाला, त्या वेळी कच्च्या खनिज तेलावर प्रतिलिटर सहा रुपये निर्यातशुल्क या स्वरूपात पेट्रोल आणि ‘एटीएफ’ वर आकारण्यात आला होता.

विंडफॉल कर हा नफ्यावरील उच्च कर दर आहे जो एखाद्या विशिष्ट कंपनी किंवा उद्योगाला अचानक झालेल्या विंडफॉल नफ्यामुळे होतो .

ऑस्ट्रेलिया,  इटली, आणि मंगोलिया ( 2006-2009) यासह जगभरातील विविध देशांमध्ये विंडफॉल कर लावण्यात आले आहेत .

The post नागपूर एलायटी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. अतुल वैद्य appeared first on The Officer.