सॅम नुजोमा यांचे निधन Archives | The Officer

सॅम नुजोमा यांचे निधन
सॅम नुजोमा यांचे निधन

दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळवल्यानंतर नामिबियाचे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले पहिले अध्यक्ष बनलेले कार्यकर्ते आणि गनिमी नेता सॅम नुजोमा यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले

अल्प परिचय:

सॅम्युअल शफीशुना डॅनियल नुजोमा यांचा जन्म 12 मे 1929 रोजी ओंगांडजेरा , ओवाम्बोलँड , दक्षिण पश्चिम आफ्रिका (आता ओमुसाती प्रदेश , नामिबिया) येथे झाला.

राजकीय पक्ष : स्वॅपो

21 मार्च 1990 रोजी नुजोमा हे कमी लोकसंख्येच्या दक्षिण आफ्रिकन देशाचे प्रमुख झाले आणि 2005 च्या संसदेच्या कायद्याद्वारे त्यांना औपचारिकपणे “नामिबियाई राष्ट्राचे संस्थापक जनक” म्हणून मान्यता देण्यात आली.

1940 च्या दशकात नामीबिया असा काही देशच नव्हता आपण गुलाम आहोत याची जाणवे ही पुरेशी नव्हती त्या काळापासून प्रयत्न करून नामीबियाच्या  किंवा पूर्वीच्या साऊथ वेस्ट आफ्रिकाच्या स्वतंत्र्याची आकांक्षा नुजोमा यांनी चेतवली.

1990 मध्ये त्या देशाचे ते पहिले राष्ट्राध्यक्ष झाले आणि 2005 मध्ये चौथ्यांदा पद नको म्हणून पायउतार झाले.

दीर्घकाळ सत्तेवर असणाऱ्यांना हुकूमशाह ठरवणे सोपे असते पण नामीबियात राज्यघटना आणि आधारित लोकशाही प्रस्थापित करण्यात नुजोमा यांचा पुढाकार होता.

त्यांचे निधन झाल्यानंतर शोकसंदेशात लोकशाहीवादी असा उल्लेख आवर्जून होता.

नामिबियाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास ताजा आहे आणि तो रक्तरंजितही आहे. आधी पोर्तुगीज, मग जर्मन आणि पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिशांच्या ताब्यात आलेला हा नैऋत्य आफ्रिकेतला प्रदेश ब्रिटिशांनी वर्णभेदकारक दक्षिण आफ्रिकन राजवटीच्या आधिपत्याखाली ठेवला होता.

टोळीप्रमुखाच्या घराण्यातले असूनही दहा वर्षांचे होईपर्यंत गुरे वळणारे सॅम अखेर एका शाळेत गेले.

काळ्या आफ्रिकींना सहावीपर्यंतच शिकता येई, तिथवरचे सारे शिक्षण घेऊन वाल्व्हिस बे इथे कामासाठी आले.

देवमाशांची शिकार करण्यासाठी नॉर्वेजियनांनी उघडलेल्या या केंद्रात सॅम 17 वर्षांचे होते

दुसऱ्या महायुद्धानिमित्ताने आलेले अनेक युरोपीय देशांचे सैनिक तेथे असत, ते कसे जगतात ? त्यांचा देश कसा आहे ? तिथे पगार किती ? – वगैरे. याबद्दल त्यांना कुतूहल होते.पण या कुतूहलातून फुलली ती अन्यायाची जाणीव. मग सॅम नुजोमा रेल्वेत मजूर म्हणून लागले. इंग्रजी आलेच पाहिजे, म्हणून रात्रशाळेत शिकले आणि परिस्थितीच्या चटक्यांना वाचनाची जोड मिळाल्यामुळे कामगार-चळवळीचा अंगारही पेटू लागला.

1959 सालात ‘स्वापो’ (साउथ वेस्ट आफ्रिकन पीपल्स ऑर्गनायझेशन) मध्ये झाले आणि अत्यंत सनदशीर मार्गाने स्वातंत्र्यलढा सुरू झाला.

‘दक्षिण आफ्रिकेच्या प्रशासनाखालील नैऋत्य आफ्रिकेत युरोपीय 12 टक्के पण त्यांच्या शिक्षणासाठी वार्षिक तरतूद ७,८१,००० रॅण्डची (द. आफ्रिकेचे चलन), तर काळ्या नैऋत्य आफ्रिकनांसाठी मात्र अवघे १,९०,००० रॅण्ड’ असे मुद्दे ते मांडत होते.

१९६० मध्ये सॅम नुजोमा यांनी थेट् न्यू यॉर्क गाठले. संयुक्त राष्ट्रांकडे हा अन्याय आकडेवारीनिशी मांडण्याखेरीज वर्णभेद, शासक देशापासून अंतर आदी मुद्दे त्यांनी संयुक्त राष्ट्र आमसभेच्या उपसमितीपुढे मांडल्यावर, आमसभेने मागणीवजा ठराव केला – ‘१९६३ पर्यंत नामिबियास स्वातंत्र्य द्यावे’ या मागणीला सुरुवातीला विरोधच झाला त्यानंतर संघर्ष करीत शेवटी 1990 नंतर लोकशाहीची स्थापना होऊ शकली.

रशिया,चीन उत्तर कोरिया किंवा अशा डाव्या देशांकडून 1970 मध्ये शस्त्र मिळवणाऱ्या नुजोमांनी पुढे अमेरिकेसह अनेक देशांशी संबंध जोडले होते.

सन्मान :

नामिबिया स्वातंत्र्य पुरस्कार(1988) निश:स्त्रीकरण आणि विकासासाठी इंदिरा गांधी शांतता पुरस्कार(1988)

घानाचा कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार (घानाचा राष्ट्रीय सर्वोच्च पुरस्कार)(2004),हो ची मिन्ह शांतता पुरस्कार(व्हिएतनाम, 1988)

The post सॅम नुजोमा यांचे निधन appeared first on The Officer.