Current Affairs
राज्यातील दोन शहरांची नावे बदलल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याचा निर्णय घेतला. 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी चोंडी येथे जमलेल्या जनसमुदायासमोर अहमदनगर चे अहिल्यानगर नाव जाहीर करण्यात आले
जगभरातील आर्थिक अस्थिरता, युक्रेन युद्ध, अशा आर्थिक आव्हानांवर मात करून भारतीय अर्थव्यवस्थेने सन 2022- 23 या आर्थिक वर्षात 2% विकासदर नोंदवला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहित विकासदर 2% होता . अर्थव्यवस्थेचा एकूण आकार 3.3 लाख कोटी डॉलर झाला असून भारत आशियातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता बनला आहे. कृषी, उत्पादन, बांधकाम ,सेवा आणि […]
शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी भरपूर कॅल्शियम असलेले दूध अत्यंत महत्त्वाचे असते. दुधाचे हे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी 1 जून रोजी जागतिक दूध दिन साजरा केला जातो. डेअरी उद्योगाशी संबंधित क्रियाकलापांसाठी जागरूकता आणि समर्थनास प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा उद्देश आहे. जागतिक दूध दिनाचा इतिहास: दुग्ध उद्योग ओळखण्यासाठी आणि दुधाच्या फायद्यांबद्दल लोकांमध्ये जागरूकता […]
चीनने 30 मे रोजी शेंझोऊ- 16 या अवकाशयानाचे यशस्वी प्रक्षेपण केले. चीनच्या अवकाशस्थानकाच्या दिशेने झेपावलेल्या या अवकाशयानात तीन अंतराळवीर असून त्यापैकी एक जण सामान्य नागरिक आहेत. पाच महिन्यांच्या मोहिमेसाठी एका सामान्य व्यक्तीला अवकाशात पाठविण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुई हैचाओ असे या व्यक्तीचे नाव असून ते बीजिंगमधील बेहांग विद्यापीठात प्राध्यापक आहेत. चीनच्या […]
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री श्री. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत स्वच्छ मुख अभियानासाठी SMILE AMBASSADOR म्हणून भारतरत्न श्री.सचिन तेंडुलकरची यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वच्छ मुख अभियान हे एक ओरल हेल्थ मिशन आहे. वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत हा उपक्रम पुढील 5 वर्षांसाठी राबवण्यात येणार […]
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने गत विजेते गुजरात टायटन्सला पराभूत करत पाचव्यांदा IPL विजेतेपदाला गवसणी घातली. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सच्या पाच विजेतेपदांची बरोबरी केली विजेता :- चेन्नई सुपर किंग्स (5 वेळा – 2010, 2011, 2018, 2021, 2023) (कर्णधार – महेंद्रसिंग धोनी प्रशिक्षक – स्टीफन फ्लेमिंग) उपविजेता:- गुजरात टायटन्स कर्णधार […]
जगभर सर्वत्र आढळणारे पाणमांजर जलीय परिसंस्थेतील महत्वाचा दुवा आहे. ऑस्ट्रेलिया आणि अंटाक्र्टिक वगळता सर्व नद्या, तळी, दलदल, खाडय़ा आणि महासागरांमध्ये पाणमांजराच्या विविध प्रजाती आढळतात. पार्श्वभूमी: पाणमांजराच्या संरक्षणासाठी 1993 या वर्षी इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय पाणमांजर बचाव निधी (इंटरनॅशनल ऑटर सर्व्हायव्हल फंड) या संस्थेची स्थापना झाली. त्यातूनच पाणमांजराचे जतन आणि संवर्धन यासाठी जागतिक पाणमांजर दिवसाची सुरुवात झाली. 2014 […]
31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन (World No Tobacco Day) साजरा केला जातो. थीम:- “आम्हाला अन्न हवे आहे, तंबाखू नाही” (2023) तंबाखू: आपल्या पर्यावरणाला धोका” (2022) काय आहे इतिहास? खरे तर तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने 1987 मध्ये तंबाखू निषेध दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या वर्षी […]
महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने पायाभूत स्तर, शालेय शिक्षण, शिक्षक आणि प्रौढ शिक्षणात धोरणाच्या गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीसाठी 24 मे 2023 रोजी राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन केली. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली. या समितीत प्रधान सचिव हे सहअध्यक्ष तर शिक्षण आयुक्त हे उपाध्यक्ष असणार आहेत. यामध्ये शिक्षणतज्ञ, अभ्यासक असे 28 […]
प्रवीण कुमार श्रीवास्तव यांनी 29 मे रोजी केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना राष्ट्रपती भवनात शपथ दिली. श्रीवास्तव हे आसाम-मेघालय केडरचे 1988 बॅचचे निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत. सुरेश एन. पटेल यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर श्रीवास्तव डिसेंबर 2022 पासून प्रभारी केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कार्यरत होते. श्रीवास्तव यांनी […]