Current Affairs
निधन : जलबाला वैद्य
- 10/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिल्लीतील प्रसिद्ध ‘अक्षरा’ नाट्यगृहाच्या सहसंस्थापक जलबाला वैद्य यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले.
जीवन परीचय
- जलबाला या भारतीय लेखक आणि स्वातंत्र्य सैनिक सुरेश वैद्य व इंग्रजी शास्त्रीय गायिका मॅज फ्रॅंकीस यांच्या कन्या होत.
- जलबाला यांचा जन्म 12 ऑगस्ट 1936 या वर्षी लंडन येथे झाला होता.
- कार्य – जलबाला यांनी पत्रकारितेतून त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात केली.
- दिल्लीतील विविध राष्ट्रीय वृत्तपत्रे आणि मासिकांमध्ये त्यांनी लेखन केले आहे.
- त्यांचा नाट्यप्रवास 1968 मध्ये फुल सर्कल द्वारे सुरू झाला. हे कविता आणि कथांचे नाट्यमय सादरीकरण होते.
- जलबाला यांनी ‘रामायण’, ‘लेट्स लाफ अगेन’, ‘भगवद्गीता’, ‘काबुलीवाला’, ‘गीतांजली’, इत्यादी नाटकांमध्ये काम केले आहे . जलवाला वैद्य यांनी पती गोपाल शर्मन यांच्यासोबत नवी दिल्लीत “अक्षरा नॅशनल क्लासिकल थिएटर” ची स्थापना केली.
वैद्य यांना मिळालेले सन्मान
- संगीत नाटक अकादमीचा टागोर पुरस्कार
- आंध्र प्रदेश नाट्य अकादमीचा सन्मान
- दिल्ली नाट्य संघ पुरस्कार
- दिल्ली सरकारचा वरिष्ठ सन्मान