Current Affairs
नेपाळचा सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम | Nepal’s record for highest runs scored
- 29/10/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
नेपाळ संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये ट्वेंटी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात तीन जागतिक विक्रमाची नोंद केली.
300 हुन अधिक धावा करणारा नेपाळ हा पहिला संघ बनला.
त्यांनी मंगोलिया विरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली. त्यांनी 3 बाद 314 धावा केल्या.
नेपाळच्या 23 वर्षीय दिपेंद्रसिंह अरीने अवघ्या 9 चेंडूत अर्धशतक बनवले.
हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले.
दिपेंद्रने भारताच्या युवराज सिंगच्या विक्रम मोडीत काढला.
युवराजने 2007 मध्ये इंग्लंड विरुद्ध डर्बन येथे 12 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.
नेपाळचा 19 वर्षीय फलंदाज कुशल मल्लाने केवळ 34 चेंडूत टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान शतक झळकावले.त्याने डेविड मिलर आणि रोहित शर्माचा विक्रम मोडला.
मिलरने बांगलादेश विरुद्ध 2017 मध्ये 35 चेंडू शतक झळकावले होते, रोहितने 2017 मध्ये इंदूरमध्ये श्रीलंके विरुद्ध 35 चेंडूत शतक झळकावले होते
नेपाळने मंगोलियाविरुद्ध डावात 26 षटकार खेचले.
आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमधील एका डावातील हे सर्वाधिक षटकार ठरले.
याआधी अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजने डावात प्रत्येकी 22 षटकार खेचले