● अन्वरूल हक काकड यांची पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नेमणूक करण्यात आली.
● ते पाकिस्तानच्या सिनेटचे सदस्य आहेत.
● आर्थिक संकटाने ग्रस्त पाकिस्तानमधील पुढील सार्वत्रिक निवडणुका होईपर्यंत तटस्थ नेतृत्वाच्या हाती कारभार राहावा या उद्देशाने त्यांची नेमणूक झाली आहे.
● मावळते पंतप्रधान शहाबाज शरीफ आणि विसर्जित नॅशनल असेंबलीतील विरोधी पक्षनेते राजा रियाज यांच्यात चर्चेच्या अखेरच्या दिवशी काकड यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली.
● 52 वर्षांचे काकड हे बलुचिस्तान प्रांतातील पश्तुन वंशाचे असून ते बलुचिस्तान अवामी लिगचा भाग आहेत.
● पाकिस्तानचे अध्यक्ष अरिफ अलवी यांनी घटनेच्या कलम 224 अन्वये काकड यांच्या काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नेमणुकीला मंजुरी दिली.