Current Affairs
अपूर्व चंद्रा यांनी भारताच्या जी 20 अध्यक्षतेवरील “पीपल्स G20” या ईबुकचे केले अनावरण | Apoorva Chandra unveils eBook “People’s G20” on India’s G20 Chairmanship
- 19/09/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी आज नवी दिल्ली येथे भारताच्या जी 20 अध्यक्षतेवरील “People’s G20” या ई-पुस्तकाचे अनावरण केले.
पत्र सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक मनीष देसाई आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच पत्र सूचना कार्यालयाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या पुस्तकात भारताच्या जी 20 अध्यक्षपदाचा संपूर्ण प्रवास मांडण्यात आला आहे.
या पुस्तकात तीन भाग आहेत, पहिला भाग 9-10 सप्टेंबर 2023 दरम्यान नवी दिल्ली येथे झालेल्या जी 20 शिखर परिषदेशी संबंधित आहे.
या पुस्तकात जी 20 चे स्वरूप आणि कामकाज समाहित असून भारताच्या अध्यक्षतेखाली हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली आहे.
दुसऱ्या भागात शेर्पा आणि वित्त ट्रॅक अंतर्गत झालेल्या विविध कार्यकारी गटांच्या बैठका आणि भारताने अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून गेल्या वर्षभरात देशभरात झालेल्या प्रतिबद्धता गटांच्या बैठकींचा सारांश दिला आहे.
ईबुकचा शेवटचा भाग गेल्या वर्षी देशभरात भारताच्या जी 20 अध्यक्षपदाचे लोक चळवळीत रूपांतर करणाऱ्या जन-भागीदारी कार्यक्रमांचे सचित्र वर्णन सादर करतो.