कोलंबिया येथील मेडलीन या ठिकाणी सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्मा याने (स्टेज थ्री) प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
जागतिक स्पर्धेत अभिषेक वर्माची कामगीरी:
अभिषेक वर्मा याने जागतिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पदकांची लई लूट केली आहे त्याने 2015 मध्ये पोलंड येथे झालेल्या जागतिक स्पर्धेमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले होते.
त्यानंतर अभिषेक ला 2021 मध्ये पॅरिस येथे झालेल्या जागतिक स्पर्धेमध्ये दुसरे सुवर्णपदक जिंकण्यात यश आले होते.
आणि आता कोलंबियातील स्पर्धेत त्याने तिसरे सुवर्णपदक पटकावले आहे.
जागतिक स्पर्धेत अभिषेकने आतापर्यंत तीन सुवर्ण पदकांसह दोन रौप्य पदक आणि एक कांस्यपदक देखील पटकावले आहे.