मुंबईचे माजी कर्णधार आणि देशांतर्गत क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अमोल मुजुमदारचे भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
सुलक्षणा नाईक, अशोक मल्होत्रा आणि जतिन परांजपे यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने काही महिन्यांपूर्वी महिला संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज केलेल्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या.
या त्री सदस्य समितीने महिला संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अमोल मुजुमदार यांच्या नावाची एकमताने शिफारस केली.
याआधी ऋषिकेश कानेटकर महिला संघाचे प्रशिक्षक सांभाळत होते.