● महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने अमेरिकेतील पुरुषांच्या पाच हजार मी. धावण्याच्या शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला . त्याने स्वतःचाच विक्रम मोडीत काढला .
● लॉस एंजलिस येथे झालेल्या साऊंड रनींग ट्रॅक शर्यतीत अविनाशने 13 मिनिटे 19.30 सेकंद वेळ नोंदविली. याआधीची त्याची वेळ 13 मिनिटे 25.65 सेकंद होती. या शर्यतीती तो 12 व्या स्थानावर होता.
● 28 वर्षीय पारुल चौधरीने महिलांच्या पाच हजार मी. धावण्याच्या शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम रचला. पारुलने 15 मिनिटे 10.35 सेकंद वेळ नोंदवली.
● याआधी राष्ट्रीय विक्रम प्रीजा श्रीधरनचा होता. तिने 13 वर्षांपूर्वी 15 मिनिटे 15.89 सेकंद वेळ नोंदवली होती.