जपानची राजधानी टोकियो येथे 10 ते 17 जुलै 2023 या कालावधीत आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र(Physics) ऑलम्पियाड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
या स्पर्धेत 82 देशातील एकूण 387 विद्यार्थी सहभागी झाले होते.
भारतीय संघातील पाच पैकी पाच विद्यार्थ्यांनी पदकांची कमाई केली आहे.
भारताने तीन सुवर्ण व दोन रौप्य पदके जिंकली आहेत.
देशनिहाय पदतालिकेत रोमानिया आणि तैवानसह संयुक्तपणे भारत पाचव्या स्थानी आहे.
चीन, दक्षिण कोरिया आणि पाच रशियन विद्यार्थ्यांच्या संघाने पाच सुवर्णपदकांसह अव्वल स्थान पटकावले तर अमेरिका चार सुवर्ण आणि एक रौप्य पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
या स्पर्धेत एकूण 37 सुवर्ण 74 रौप्य आणि 103 कांस्य पदके देण्यात आली.