Current Affairs
आयसर पुणे,च्या संचालकपदी प्रा. सुनील भागवत
- 13/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे प्रा. सुनील भागवत यांची पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर, पुणे) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
‘आयसर’ च्या संचालकांची नेमणूक राष्ट्रपतींकडून करण्यात येते.
प्रा. जयंत उदगावकर यांचा कार्यकाळ संपल्याने प्राध्यापक भागवत यांची संचालकपदी निवड करण्यात आली.
प्रा. के.एन.गणेश, प्रा. जयंत उदगावकर यांच्या नंतर प्रा. भागवत हे ‘आयसर’ चे तिसरे संचालक असतील.
प्रा. सुनील भागवत
प्रा. भागवत यांनी 1989 मध्ये ‘आयसीटी’ मधून केमिकल इंजिनिअरिंग विषयात पीएचडी पूर्ण केली.
इंटरफेशिअल सायन्स अँड इंजीनियरिंग, एनर्जी अँड एक्सर्जी इंजीनियरिंग, तसेच कम्प्युटर प्रोसेस सिम्युलेशन हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत. त्यांच्या नावावर बारा (12) पेटंट आहेत
‘आयसर पुणे’
भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे ही महाराष्ट्र येथील भारतातील एक स्वायत्त उच्च शिक्षण संस्था आहे.
पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीच्या शिफारसीवरून भारत सरकारने मानव संसाधन विकास मंत्रालया अंतर्गत सात भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थांची स्थापना केली. आयसर पुणे त्यापैकी एक आहे.
स्थापना : 2006
संचालक : सुनील भागवत
ब्रीदवाक्य : Where Tomorrow’s Science Begins Today
भारतातील एकूण 7 आयसर संस्था
-
- पुणे
- कोलकाता
- मोहाली
- भोपाळ
- बहरमपूर
- तिरुपती
- तिरुअनंतपुरम