Current Affairs
आशा भोसले यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर
- 19/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
मंगेशकर प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणाऱ्या लता मंगेशकर पुरस्कार आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार – 2023 जाहीर करण्यात आले आहेत.
लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार:
2022 या वर्षापासून लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ विशेष पुरस्कार देण्यात येत आहे.
यावर्षी (2023) ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला.
गेल्या वर्षी(2022) हा पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला होता.
मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार:
मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार प्रसिद्ध गजल गायक पंकज उदास यांना जाहीर झाला.
मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कारासाठी अभिनेता प्रसाद ओक, अभिनेत्री विद्या बालन यांची निवड करण्यात आली.
मंगेशकर प्रतिष्ठान तर्फे मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संगीत, नाट्य, कला, सामाजिक, पत्रकारिता, अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.