Current Affairs
आसियान – भारत सागरी सरावात नौदल प्रमुख ऍडमिरल आर. हरिकुमार यांची उपस्थित
- 03/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
भारताचे नौदल प्रमुख सिंगापूरच्या चांगी नौदल तळावर 2 मे 2023 रोजी आयोजित पहिल्याच आसियान- भारत सागरी सराव ‘AIME – 2023’ च्या उद्घाटन समारंभात सहभागी झाले.
नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरीकुमार आणि सिंगापूर नौदल प्रजासत्ताकाचे नौदलप्रमुख रियर ॲडमिरल सीन वट यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
भारतीय नौदल आणि सिंगापूर नौदल प्रजासत्ताक यांच्याकडे संयुक्त स्वरुपात एआयएमईच्या (AIME) ह्या उद्घाटनपर कार्यक्रमाचे यजमानपद आहे. या सरावात इतर आसियान देशांची जहाजे तसेच नौदल कर्मचारी सहभागी होत आहेत.
दिनांक 02 ते 04 मे – 2023 या काळात चांगी नौदल तळावर बंदराशी संबंधित सराव आयोजित करण्यात आला आहे तर 07 ते 08 मे – 2023 या काळात दक्षिण चीन समुदात सागराशी संबंधित सराव आयोजित करण्यात आला आहे.
सरावाचा मुख्य उद्देश
आसियान भारत सागरी सराव AIME-23 चा उद्देश सागरी सहकार्याला प्रोत्साहन देणे आणि आसियान आणि भारतीय नौदलांमधील विश्वास, मैत्री आणि आत्मविश्वास वाढवणे हा आहे.
सिंगापूर येथील बंदरात 02 ते 04 मे 2023 या कालावधीत सहभागी नौदलांमध्ये विविध व्यावसायिक आणि सामाजिक परस्परसंवाद होतील ज्यात क्रॉस डेक भेटी, विषयतज्ज्ञांचे विचारमंथन (SMEE) आणि नियोजन बैठकांचा समावेश आहे.
दक्षिण चीन समुद्रात 07 ते 08 मे -2023 या कालावधीत नियोजित सागरी टप्पा सहभागी नौदलांना सागरी क्षेत्रामध्ये समन्वय आणि परिचालनाच्या अंमलबजावणीमध्ये घनिष्ठ संबंध विकसित करण्याची संधी प्रदान करेल.