Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > इस्रो चे स्वयंचलित लँडिंग यशस्वी
इस्रो चे स्वयंचलित लँडिंग यशस्वी
- 03/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
- भारतीय अवकाश संशोधन संस्थेने(इस्रो) ‘रियुजेबल लाँच व्हेईकल’चे ‘ऑटोनॉमस लँडिंग मिशन’ (आरएलव्ही एलईएक्स) यशस्वीपणे राबविले.
- कर्नाटक मधील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंज येथे चाचणी घेण्यात आली. या चाचणीद्वारे इस्रोने प्रेक्षपकाचे स्वयंचलित पद्धतीने लँडिंग करण्यात यश मिळवले आहे.
- तसेच यामुळे पुनर्वापर करता येणाऱ्या प्रक्षेपकाची निर्मिती करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने ‘इस्रो’ ने महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे.
- या चाचणीसाठी विविध उच्चतंत्रज्ञानाचा वापर केला गेला.
- त्यातील काही तंत्रज्ञान ‘इस्रो’नेच विकसित केले होते.
अशी केली चाचणी :
- ‘आरएलव्ही’ हे एक अवकाश विमान आहे. हे विमान हवाई दलाच्या चिनुक हेलिकॉप्टरच्या मदतीने जमिनीपासून 4.6 किलोमीटर उंचीवर नेण्यात आले.
- एका विशिष्ट कोनातून 350 किमी प्रतितास या वेगाने ते धावपट्टीच्या दिशेने सोडणे आवश्यक होते.
- त्यानुसार, योग्य उंची, कोन आणि वेग साध्य होताच ‘आरएलव्ही’ च्या मिशन मॅनेजमेंट कॉम्पुटरने दिलेल्या आदेशानुसार हे अवकाश विमान सोडण्यात आले.
काय साध्य करण्यात आले :
- प्रक्षेपक पृथ्वीच्या दिशेने परत येताना त्याचा असणारा वेग आणि इतर स्थितीनुसारच सर्व परिस्थिती निर्माण करून ही चाचणी घेण्यात आली.
- प्रेक्षपकाचा वेग, त्याच्या गिअर्सचा सिंक रेट, त्याचा जमिनीशी असलेला कोन आणि इतर प्रमाणे अत्यंत अचूकपणे पाळण्यात येऊन ही चाचणी यशस्वी करण्यात आली.
खालील उच्च तंत्रज्ञानाचा वापर :
- अत्यंत अचूक नेव्हीगेशन सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर
- सुडोलाईट सिस्टीम (हवेतील स्थान अचूकपणे निश्चित करण्यासाठी)
- का-बँड रडार अलटिमिटर
- नाविक रिसिव्हर
- स्वदेशी बनावटीचे लँडिंग गिअर
- एअरोफॉईल हनिकोंब फिन्स
- ब्रेक पॅराशूट सिस्टिम
- डिजिटल एली व्हेशन मॉडेल
ISRO :- Indian Space Research Org
(भारतीय अवकाश संशोधन संस्था)
- स्थापना :- 15 ऑगस्ट 1969
- संस्थापक :- विक्रम साराभाई
- मुख्यालय :- बंगळुरू
- अध्यक्ष :- एस. सोमनाथ (10 वे)