Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > ‘ऍडव्हान्टेज हेल्थकेअर इंडिया परिषद – 2023’
‘ऍडव्हान्टेज हेल्थकेअर इंडिया परिषद – 2023’
- 27/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे ऍडव्हान्टेज हेल्थकेअर इंडिया 2023 च्या 6 व्या परिषदेचे उद्घाटन केले.
● या कार्यक्रमाला 7 देशांचे (बांगलादेश, मालदीव, सोमालिया, आर्मेनिया, भूतान, नायजेरिया आणि इजिप्त) आरोग्य मंत्री उपस्थित होते
● आफ्रिका, मध्य पूर्व, CIS आणि SAARC सह 73 देशांमधील सुमारे 125 प्रदर्शक आणि 500 पेक्षा जास्त परदेशी प्रतिनिधींनी या शिखर परिषदेला आपली हजेरी लावली.
● फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) आणि अर्न्स्ट अँड यंग (EY) यांनी तयार केलेल्या “हेल्थकेअर बियॉन्ड बाऊंडरीज” नावाच्या धोरण मसुद्याचेही या कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले.
● सहाव्या AHCI परिषदेत देखील भागधारकांची चर्चा सत्रे आणि पॅनल चर्चा सत्रे आयोजित केली जाणार आहेत
● नवी दिल्ली येथे ही परिषद भरविण्यात आली आहे