केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत राज्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो.
त्याअंतर्गत राज्यात पुढील शैक्षणिक वर्ष 2024- 25 पासून ‘एक राज्य एक गणवेश’ धोरण राबविले जाणार असून विद्यार्थ्यांना समान रंगाचे दोन गणवेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत देण्यात येणार आहेत.
शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.