Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > ‘एनसीईआरटी’च्या पाठ्यपुस्तक समितीत सुधा मूर्ती, शंकर महादेवन यांचा समावेश
‘एनसीईआरटी’च्या पाठ्यपुस्तक समितीत सुधा मूर्ती, शंकर महादेवन यांचा समावेश
- 14/08/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
● नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्यासाठी ‘एनसीईआरटी’ (NCERT- National Council of Educational Research and Training) ने स्थापन केलेल्या नव्या समितीत इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष सुधा मूर्ती ,संगीतकार शंकर महादेवन ,अर्थतज्ञ संजीव संन्याल आणि इतर 16 जणांचा समावेश आहे.
● राष्ट्रीय शिक्षण नियोजन आणि प्रशासन संस्थेचे कुलपती एमसी पंत हे एनसीईआरटीच्या या 19 सदस्यांच्या ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि अध्यापन शिक्षण साहित्य समिती’चे अध्यक्ष आहेत.
● ही समिती तिसरी ते बारावीपर्यंतच्या वर्गासाठी पाठ्यपुस्तके विकसित करतील.
● या समितीने पाठ्यपुस्तके आणि इतर अध्यापन साहित्य तयार करणे बंधनकारक आहे.
National Council of Educational Research and Training:-
● ही भारत सरकारची सर्वोच्च शैक्षणिक संस्था आहे.
● मुख्यालय : श्री अरविंद मार्ग, नवी दिल्ली
● शालेय शैक्षणिक मुद्यांवर केंद्र सरकारच्या मदतीसाठी 1961 या वर्षी या परिषदेची स्थापना करण्यात आली.
● संचालक : डॉ. दिनेश प्रसाद सकलानी